१. चॉकलेट बिस्किटे - ४-५
२.बदाम - ८-१०
३.बटर/लोणी - १ टे स्पून
१. शहाळ्यातील मलई -२ कप
२.साखर- ५-६ टे स्पून
३.कॉर्न स्टार्च/ कस्टर्ड पावडर -२ टे स्पून
१.लिंबाचा रस - १-२ टे स्पून
२.कॉर्न स्टार्च -१ टे स्पून
३.बटर/लोणी - १ टे स्पून
४.पाणी - १/२ कप
5.लिंबाच्या सालीचा बारीक कीस - १ टे स्पून
सजावटीसाठी - लिंबाची फोड,पुदिना
बदाम - बिस्कीटे थर:
१. मिक्सर मध्ये बदाम आणि बिस्किटे ह्यांची भरड करून घ्यावी.
२. त्यात १ चमचा वितळलेले बटर मिसळा. मिश्रण थोडे ओलसर झाले पाहिजे.
३. ह्या मिश्रणाचे ४ समान भाग करा म्हणजे थर लावताना कमी -जास्त होणार नाही.
४. आवडीच्या सर्विंग बोल मध्ये तळाला पहिली मिश्रणाचा थर लावा.
५. आता हे बोल फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा.
मलई पुडिंग
१. १ १/२ कप मलईमध्ये थोडे पाणी एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
२.उरलेल्या १/२ कप मलईचे बारीक काप करून घ्या.
३. गँसवर एका पँनमध्ये वरील मलईचे मिश्रण कमी आचेवर गरम करायला ठेवा.
४. त्यात साखर टाकून मिश्रण ढवळा.
५. कॉर्नस्टार्च २-३ चमचे पाण्यात नीट एकत्र करा. ते आता गँसवरील मिश्रणात टाकून सारखे मिश्रण ढवळा जेणेकरुन गाठी होणार नाहीत.
६.मिश्रण दह्याइतपत घट्ट्सर झाले की गँस बंद करा व गार करण्यास बाजूला ठेवा.
७. आता ह्यात १/२ कप मलईचे तुकडे हलक्या हाताने एकत्र करा.
लेमन सॉस
१. अर्धा कप पाण्यात कॉर्नस्टार्च मिसळून घ्या.
२. गँसवर पँनमध्ये बटर वितळायला ठेवा.
३.लिंबाचा किस त्यात एकत्र करा.
४.बटर वितळले की त्यात वर मिसळलेले पाणी टाका.
५.२-३ मिनिटांत मिश्रण थोडेसे घट्ट होऊ लागेल. त्यात लिंबाचा रस मिसळा.
१. आता फ्रिजमधल्या बोल मध्ये सावकाश मलई पुडिंग ओता.
२. बोल पुन्हा फ्रीजमध्ये १५-२० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा.
३. त्यावर बिस्किटे-बदामाच्या मिश्रणाचा थर द्या. बोल पुन्हा फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवा.
४. पुन्हा बोल मध्ये सावकाश पुडिंग ओता आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
५. सगळ्यात वर आता लेमन सॉसचा थर द्या.
६.सजावटीसाठी लिंबाची फोड /पुदिन्याचे पान खोचा.
मलई बदाम मटका विथ लेमन झटका तयार...
१.थोडे मलईचे तुकडे आणि बदामाचे तुकडे खातांना मस्त लागतात.
२.मलईचे मिश्रण जास्त आचेवर गरम केल्यास त्यातील फँट आणि पाणी वेगळेवेगळे होईल.
३. अमेरिकेतील मायबोलीकरांनो चूकूनही शहाळे आणून ते घरी फोडण्याचे कष्ट घेऊ नका ( नाहीतर घेतलेल्या शहाळात मलई न निघाल्यास परत दुकानात फेरा घालावा लागेल - स्वानुभव)आशियाई दुकानातून फ़्रोजन किंवा कँन मधले आणा.
झटका मस्तच सजावट आणि डिश
झटका मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सजावट आणि डिश सुंदर आहे....
अग्गग्ग! रेकॉर्डतोड पाकृ! काय
अग्गग्ग! रेकॉर्डतोड पाकृ!
![Eating](http://www.sherv.net/cm/emoticons/yellow-face/eating-smiley-emoticon.png)
काय अफाट कल्पना आहे बघूनच पोट भरलं
मस्तं!
मस्तं!
मस्त सजावट.
मस्त सजावट.
मस्तं दिसतय. एक एक थर १५-२०
मस्तं दिसतय. एक एक थर १५-२० मिनीटे फ्रीज करायचाय तर.
मस्त!
मस्त!
सुपर्ब!!
सुपर्ब!!
मस्त!
मस्त!
मस्तच.
मस्तच.
झकास
झकास
मस्तच !!
मस्तच !!
मस्त! फोटो ही सुरेख!
मस्त! फोटो ही सुरेख!
अहाहा .. मस्त मस्त.
अहाहा .. मस्त मस्त.
हटके पाकृ.सुपर्ब दिसतंय.
हटके पाकृ.सुपर्ब दिसतंय.
मस्त फोटो आणि रेसिपी.
मस्त फोटो आणि रेसिपी.
भारी दिसतंय! हटके डेझर्ट आहे.
भारी दिसतंय! हटके डेझर्ट आहे.
मस्त पाकृ. छान दिसत आहे मटका!
मस्त पाकृ. छान दिसत आहे मटका!
जबरदस्त...नाव ही एकदम
जबरदस्त...नाव ही एकदम हटके...हा झटका एकदातरी करायलाच हवा.
अहाहा..... क्या बात है.. सगळे
अहाहा..... क्या बात है.. सगळे लटके झटके जब्बरदस्त.. सुपर लाईक
छान पाककृती, सजावट आणि फोटो
छान पाककृती, सजावट आणि फोटो एकदम टेंम्टींग. पण लागणारा वेळ ४० मिनिटे .... मला वाटते जास्त वेळ लागेल.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
हटके पाकृ.सुपर्ब.
हटके पाकृ.सुपर्ब.
मी आधी नावाच्या प्रेमात पडले.
मी आधी नावाच्या प्रेमात पडले. मग फोटो बघुन ते प्रेम वाढले.
आता कृती वाचते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा.. रात्रीतून एवढे
अरे वा.. रात्रीतून एवढे प्रतिसाद![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
रेसिपी आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्द्ल धन्यवाद.
लागणारा वेळ - बदल केला आहे
रविवारी नारळाने दगा दिला आणि मग पार शेवटचा दिवस उगवला लिहायला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अप्रतिम !!! बरीच खटपट आहे
अप्रतिम !!! बरीच खटपट आहे गं पण!! एन्ड प्रॉडक्ट खतरनाक दिसते आहे!!
छान दिसतय !! टेस्टी असणार
छान दिसतय !! टेस्टी असणार
मस्त रेसिपी .
मस्त रेसिपी .
बापरे, अतिप्रचंड प्रोफेशनल
बापरे, अतिप्रचंड प्रोफेशनल दिसतंय. फोटो रेसिपी सगळंच
वा काय मस्त दिसतंय !! एक
वा काय मस्त दिसतंय !!
एक शंका: लेमन झटक्यात अजिबात साखर नाहीये ना ?
हायला खतरा आहे हे तर ..
हायला खतरा आहे हे तर .. जब्बरदस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटी स्वयंपाक म्हणजे बाईमाणूसच
धनि, साखर- ५-६ टे स्पून आहे
धनि, साखर- ५-६ टे स्पून आहे की मलई पुडिंगमध्ये..
Pages