कवडसा

Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 14 September, 2016 - 08:53

तो लढत राहिला कसा होता?
उमटला नेहमीच ठसा होता !

ध्येय केव्हाच ठरवले आम्ही
पावलांचा कुठे वसा होता ?

पावसाशीच वैर धरले मी
पाळला एक कवडसा होता !

हे वयाचेच सोहळे होते
लाजला आज आरसा होता !

भेट वाटेत नेमकी झाली
तो नियोजीत हादसा होता ?

सोबतीने तुझ्या कुठे आला ?
तो तुझा काय राजसा होता !
.......
ऋषभ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users