http://www.maayboli.com/node/60080 भाग १
"तुम्हाला माझ्या गाडीमुळे छोटासा अपघात झाला.. तुमची शुद्ध हरपली होती...पण आता एकदम नॉर्मल आहात आपल नाव….”
"मी अपर्णा ….. अपर्णा अशोक काळे."
"मी सोहम….. सोहम म्हात्रे.. चला तुम्हाला घरी सोडतो.."
"बाय द वे.. इतका कसला विचार करत होता तुम्ही"
"मी.... असच आपलं." सांगू का ह्याला .. ह्याच्या आत्ता पर्यंतच्या वागण्यावरून तरी हा इसम मला सभ्य
वाटतोय….अपर्णा मनातल्या मनात विचार करत होती.
"अहो मिस.. आता पुन्हा कसला विचार करताय.. तुम्ही मला सांगू शकता.. तुमचा प्रॉब्लेम माझ्या कडून काही करण्यासारखं असेल तर मी नक्की काहीतरी करेल"
"खर सांगायचं ...मला पैशांची नितांत गरज आहे..काही महिन्यापूर्वी आम्ही एक घर घेतलं...आमच्या बजेटच्या बाहेरच होत खरतर पण… ते घर मला इतकं आवडलं..मला नाही म्हणताच आलं नाही .. त्या मालकाला हि घर विकायचं होत त्याने सहा महिन्यांच्या मुदतीवर आम्हाला हे घर दिल... आता फक्त एक महिना राहिलाय मुदत संपायला आम्हाला त्याचे उरलेले पैसे परत करायचेत..त्या माणसाला एक महिन्या नंतर कायमच दुबई शिफ्ट व्हायचंय म्हणून त्याला खूप घाई आहे पैशांची.."
"असं आहे तर...म्हणून तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये आहेत होय...तुमच्या घर मालकाचं नाव काय.. एक काम करा त्याचा फोन नंबर द्या मला मी आता बोलतो त्याच्याशी"
"तुम्ही काय बोलणार..."
"तुम्ही द्या तर खरं.. मी बोलतो त्याच्याशी ..विश्वास ठेवा तो तुम्हाला कधीच पैसे मागणार नाही "
"काहीही काय .. तो असे कसे स्वतःचे पैसे सोडून देईल"
"बघा हवं तर .. अजमावून"
अपर्णाने काहीश्या अविश्वासानेच सोहमला घर मालकाचा नंबर दिला.. सोहमने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तिच्या पासून थोडस लांब जाऊनच फोनवर बोलत राहिला...बोलून झाल्यावर अगदी हसमुख चेहऱ्याने तो अपर्णाकडे आला...
"मॅडम .... मला आता ट्रीट हवी.. झालं तुमचं काम तो परत नाही तुम्हाला त्रास देणार"
"क्काय ? खरं बोलताय तुम्ही...असं झालं तर मी खरंच माझ्याकडून तुम्हाला ट्रीट"
"प्रॉमिस ..."
"पक्क प्रॉमिस.."
"चला तुम्हाला घरी सोडतो"
सोहमने अपर्णाला घरी सोडलं... तिने त्याला आत येण्याची खूप विनंती केली...पण तो आता न येताच निघून गेला...
काहीवेळाने अशोक घरी आला...स्वारी फारच खुशीत दिसत होती,,,,आल्या आल्या त्याने अपर्णाला कडकडून मिठी मारली...
"अप्पू..अग आपलं टेन्शन संपल...आपले घर मालक त्यांचे उरलेले पैसे नका देऊ म्हतायेत.."
"का...म्हणजे असं कस पैसे नकोत म्हणतायेत.."अपर्णाला सोहंमने केलेल्या फोनची आठवण आली...पण तरीही ती गप्प बसली...
"अग काय माहित...त्यांनी मला मघाशी फोन केला...मला म्हणाले. कि मला उद्याच निघायचंय दुबईला ...तुम्ही माझे उरलेले पैसे नाही दिलेत तरी चालतील... मी पुन्हा नाही तुम्हाला फोन करणार.."असं बोलून त्यांची फोन कट केला ...आणि नंतर मी पुन्हा तीन - चार वेळा त्यांना कॉल केला पण ते उचलतच न्हवते.. नंतर म्हंटल नको म्हणतायेत ना पैसे.. त्यात माझा फोन पण घेत नाहीयेत ..मग जाऊदे आपलंच टेन्शन गेल.....”
अपर्णाच लक्षच न्हवत ती तर हरवली होती कुठे तरी...
"अप्पू..अग लक्ष्य कुठेय तुझं..आपलं टेन्शन गेलं.. पैसे नको म्हणतायेत मालक."
"अरे... मला खरतर विश्वासच बसत नाहीये..."
त्या दिवशी अपर्णाचं लक्ष कशातच न्हवत तिला सारखा सोहमच आठवत होता.
काय बोलला असेल सोहम मालकाला ...काही कळत नाहीये...आणि आपण इतके मूर्ख त्याचा नंबर पण मागितला नाही..आता ह्याला पुन्हा भेटायचं कसं त्याचे आभार कसे मानायचे…..
असेच दिवस जात होते...अपर्णा सोहमला नाही म्हंटलं तरी विसरलीच होती...पण त्याने तिला एकदा तरी भेटावं असं मात्र तिला मनोमन वाटत होत...
अशोक ची कामाची वेळ मात्र अजूनही तशीच उशिराचीच होती... अपर्णाने त्याला खूपदा सांगून पाहिलं...तिला त्याची फार काळजी वाटे...जास्त श्रमामुळे त्याला अपर्णाकडे लक्ष्य द्यायला जराही वेळ मिळत नसे...आणि आपल्याला नवरा वेळ देत नाही...आपल्याकडे लक्ष्य देत नाही...आपलं तो काहीच ऐकत नाही म्हणून अपर्णा सतत अशोक वर नाराज राहायची...
"अशोक आज नको ना जाऊस कामाला ..मी पण आज सुट्टी करते.. बऱ्याच दिवसात कुठे गेलो नाही...संबंध दिवस बाहेर फिरुया..चौपाटीवर जाऊ, मस्त एखादा सिनेमा बघू, बाहेरच जेऊ, कर ना रे सुट्टी..प्लिज अशोक माझ्यासाठी"
"वेडी झालीस का अप्पू...सुट्टी म्हणजे एक पूर्ण दिवसाचा पगार कापणार अजिबात नाही हा... मला कामाला जावंच लागेल..आपण ह्या संडेला जाऊ"
"राहूदे .. तू गेल्या महिन्यात देखील हेच म्हणाला होतास...ओव्हरटाईम मिळतो म्हणून तू संडे देखील सोडत नाहीस..अशोक तुला वाटत नाही का जरा विश्रांती घ्यावी"
"विश्रांती घेतो मी तिकडेच ..थोडी मध्ये मध्ये "
"त्याने काय होत..कितीसा आराम मिळतो.. आणि मुळात तुला माझं ऐकावंस.. माझ्या सोबत रहावस नाही का वाटत"
"हे बघ.. तू आता जास्त विचार करू नकोस आपण..ह्या येत्या संडेला नक्की आउटिंगला जाऊ"
"ठीकेय...आणि आपण जर नाहीना गेलो..तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही"
"अशी वेळच येणार नाही."अशोक इतकं म्हणून लगोलग घरातून बाहेर पडला ...
अपर्णाला खरंतर अशोकचा खूप राग आला होता....पण तिचा नाईलाज होता...तिला कामाला जायची पण इच्छा देखील होत न्हवती.....ती अशीच बराच वेळ विचार करत बसली.. एकटेपणाला कंटाळलेली.. खूप रडावसं वाटत होत...पण इतक्या शुल्लक गोष्टीसाठी रडायचं हे देखील तिला पटत न्हवत ....अशोकच आपल्याला वर नक्की प्रेम आहे ना ..आहे तर मग तो आपल्यापासून इतका लांब कसा राहू शकतो...माझ्या सारखंच त्याला नाही वाटत एकमेकांच्या सहवासात रहावस... लग्नानंतर अवघ्या तीनचार महिन्यात हा बदल.. आधी वाटलं थोडी परिस्तिथी सुधारली कि आहोतच एकमेकांसाठी..पण आता सर्व असून देखील हा पैशासाठी इतकी मरमर का करतोय.. स्वतःही थकतोय आणि माझी देखील फरफट करतोय...ह्या संडेला देखील स्वतःच प्रॉमिस पाळतोय कि नाही कुणास ठाऊक...
नाईलाजाने उठली.. थोडी फ्रेश झाली... तिला टीव्ही लावायचा देखील खूप कंटाळा आला होता..म्हणून ती सहज बालकनीत उभं राहून रस्त्यावर पाहू लागली....समोर दुकानाच्या कोपऱ्यावर कुणीतरी एकटक आपल्याच कडे पाहतंय, हे तिला जाणवलं..ती देखील मग त्या इसमाकडे एकटक पाहू लागली..अपर्णा त्याच्या कडे पाहू लागताच त्या इसमाने तिच्याकडे बघून हात हलवला..अपर्णा थोडी घाबरली.. पण तो इसम तिला स्पष्ट दिसेल असा उभा राहिला...:"अरे हा तर सोहम." अपर्णाने देखील त्याला हात हलवून प्रतिसाद दिला.. तिने त्याला खुणेनेच वरती ये असं म्हणाली...पण, तो नाही, तूच खाली ये असं म्हणाला..
अपर्णाने अशीही सुट्टी टाकलीच होती.. ती आलेच म्हणून लगेच तयारी करायला गेली...
"सोहम ..तुम्ही आणि इथे "
"काय करणार..तुमच्याकडून ट्रीट घायचीये ना "
"हो.. खरचं खूप आभारी आहे मी तुमची .. तुमच्या मुळेच आम्ही फार मोठ्या प्रसंगातून वाचलो... पण त्या दिवशी तुमचा नंबर देखील मी घेतला नाही.."
हो ना...खरतर त्या दिवशी मी देखील विसरलो..अर्ध्या रस्त्यात आल्यावर मला आठवण झाली..तुमचं घर माहित होत..म्हणून इथे उभा राहत होतो"
"राहत होतो.??.म्हणजे..तुम्ही रोज माझ्या घरासमोर उभे राहत होता.??."
"नाही नाही...अहो..काहीतरीच काय ..माझ्या जेव्हा केव्हा तुमच्या घराच्या जवळपास काही काम असायचं फक्त तेव्हा फक्त उभा राहत होतो.."
"अस्स...बर तुमची गाडी कुठय आज नाही आणली."
"सर्व प्रश्न तुम्ही इथे रस्त्यातच विचारणार आहात का ...चला ना जरा कॉफी घेऊ .."
"एका अटीवर..हि माझी ट्रीट असेल"
"नक्कीच"
दोघे एका कॉफी शॉप मध्ये गेले...कॉफी पितापित त्याच्या गप्पा सुरु झाल्या..
"काय मग..नाही केला ना त्या घरमालकाने पुन्हा फोन"
"तेच तर ... ज्यादिवशी तुम्ही त्याला फोन केलात त्या दिवशी अशोकला त्याचा शेवटचा फोन आला."
"पाहिलत ना.. मी म्हणालो होतो.."
"पण नक्की, काय म्हणालात तुम्ही आमच्या घर मालकाला."
"ते एक सिक्रेट आहे.. जे मी तुम्हाला आताच नाही सांगणार"
अपर्णा फक्त हसली..पण हा मनुष्य थोडा विचित्र आहे ह्याची तिला खात्री झाली..
त्या दिवशी दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंग केले...
क्रमशः
वाह....खुप सुंदर
वाह....खुप सुंदर लिहिलंय....दोन्ही भाग वाचलेत....डोळ्यासमोर चित्रपट उभा केलात तुम्ही.... पुढे वाचावी वाटतेय कथा....येऊ द्या !!!!!
म्हात्रे तिचा गैर फायदा
म्हात्रे तिचा गैर फायदा घेउन सोडून देणार. बॅड चॉइस टोटली.
बिल्डर ने पैसे सोडून दिले?
बिल्डर ने पैसे सोडून दिले? म्हात्रे ने यांना बिन व्याजी कर्ज देऊन फेव्हर केले असते तरी चालले असते
(संपादित)
टीसीएस अमाझॉन पटनी मध्ये
टीसीएस अमाझॉन पटनी मध्ये 'स्पाऊस बदफैलीपणा बेस्ट प्रॅक्टिसेस अॅडव्हाईस ब्यूरो' काढावा लागेल.) >>. आवरा
आवरले.संपादित केले. (परत
आवरले.संपादित केले.
(परत वाचल्यावर हे वाक्य त्या त्या ठिकाणी काम करणार्यांना कश्या प्रकारे वाटेल हे जाणवलं.मूळ मुद्दा 'नवरा/बायको बिझी असतो,वेळ देत नाही' हा शॉर्ट टर्म सिनारियो आहे का लाँग टर्म यावर दुसर्या नात्यात पडावे की नाही हा निर्णय घेतला जावा असं वाटलं.)
मूळ कथेबाबत: सोहम नक्की शेंड्या लावणार किंवा नवर्याचं सेटिंग असणार बायकोला प्रेमाची किंमत जाणववून द्यायला वगैरे.
Pls पुढील भाग लवकर टाका
Pls पुढील भाग लवकर टाका
चांगली सुरुवात
चांगली सुरुवात
प्रतिसाद्कर्त्यानाचे मनापासून
प्रतिसाद्कर्त्यानाचे मनापासून आभार...
अमोल परब .... तुमच्या कथा वाचायला खूप आवडतात