हे लिहायला खर तर उशीर झालाय . चित्रपट १२ ऑगस्टला रिलिज झाला . मीच बघायला प्रचंड उशीर केला , पण बेटर लेट दॅन नेव्हर
पण चित्रपट पाहिल्यापासून मनातून जात नाहीये , त्यातच तो माझ्या काही मित्राना रेकमेंड केला होता , त्यानाही प्रचंड आवडला . पण त्यामानाने मायबोलीवर त्याबद्द्ल काहीच लिहिलेल दिसल नाही , म्हणून हा प्रपंच. (एक धागा दिसला पण त्याला वेगळेच वळण लागल होत , त्यामुळे त्याला पास )
हा चित्रपट हा एका मध्यमवर्गीय , सरळमार्गी , भिडस्त माणसाचा प्रवास आहे . तशी चित्रपटाची कथा साधी आहे . एक साधा माणूस मोठया शहरात येतो , त्याला एक गुरू भेटतो अन मग त्याच्यात होणारे बदल .
पण सादरीकरण या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत अन त्याचवेळी चित्रपट प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगतही असतो अन ते जास्ती महत्वाच आहे.
माझ्या मते चित्रपटाची तीन बलस्थाने आहेत
पहिल म्हणजे सगळ्या कलाकरांचा अभिनय . सागरने अबब उर्फ गजाननच्या आयुष्यातले बदल अगदी सहजतेने पेललेत . आपण तर बाबा फॅन झालो त्याचे . सईला या रूपात पाहण हाच एक आश्चर्याचा धक्का होता , पण तिने अन "निरामय " ने धमाल आणलीय . मुक्ता इज मुक्ता , नो मोअर नीडेड टू से पर्ण पेठे अगदी रिफ्रेशिंंग अन आजच्या मुलीना अगदी छान रिप्रेझेंट करते . पण सगळ्यात धमाल केलीये अक्षयने . त्याला दिलेले संवाद्च धडाकेबाज असले तरी त्याचा वावर इतका सहज आहे की "बत्तीस " खरा वाटतो. सागरची मावशीही छोट्याश्या रोलमधे खासच . मुलीने सागरला स्कूटर वरून सोडायला नाही म्हटल्यावरचे "अग सो ड" परफेक्ट.
दुसर म्हणजे संवाद , अक्षय उर्फ बत्तीसचे ज्ञानकण तर जबरदस्त आहेतच उदा " हे म्हणजे १६ जीबी डेटा हार्ड डिस्क वर ठेवायचा अन सनी लिओनी दिसली की चॅनेल बदलायच " "नाय झाल तर वर्षभर ४जी नाही वापरणार"
पण काहीतरी शिकवून जाणारे आहेत , तो क्रुष्णार्जुन संवाद तर खासच . पण सागरचा मावशी बरोबरचा "इच्छा मरू देऊ नको" हा माझ्यामते सर्वात उच्च . केवळ त्या पाच मिनिटाच्या संवादासाठी मी चित्रपट पुन्हा पाहू शकतो.
अन तिसर म्हणजे गाणी , प्रत्येक गाण वेगळ , "काका" आजच्या पिढीच , संस्क्रुतमधल "प्रियकरा" , "मोहरले मी मोहरले" विथ "निरामय ", "अरे क्रुष्णा" , अन माझ फेवरिट "मीची मज व्यालो" . प्रत्येक गाण कथेला पुढे घेऊन जात , कुठेही हे कधी संपणार अस वाटत नाही .
मला स्वतःला मनापासून आवडलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाचा शेवट , वर वर साधी वाटणारी ही कहाणी शेवटी स्वतःच्या शोधाशी येऊन संपते . आपली प्रत्येकाची लहानपणी पाहिलेली काही स्वप्न असतात , पण जस जसे आपण मोठे होत जातो , तस तस इतराना आवडेल तस जगायला लागतो , जे मिळवायचा अट्टाहास आहे ते खरच मला हव आहे का ? हे विसरत अन "WHY " पेक्षा "HOW" महत्वाचा होतो , अन हेच चित्रपट सांगतो
मी अजिबात अबब सारखा नाहीय , इन फॅक्ट शेवटी तो बदलून जसा होतो तसा मी आहे , पण तरीही मी स्वतःला रिलेट करू शकलो अन हेच माझ्या मते चित्रपटाच यश आहे .
शेवटी एकच लिहू इच्छितो , शक्य असल्यास एकदा पहा , पैसे अगदीच वाया नक्की जाणार नाहीत .ज्याला नुसती धमाल कॉमेडी हवी त्यालाही आवडेल , हळव्या प्रेमकथा आवडत असतील तरी किमान पैसा वसूल होईल . पण जर चित्रपटाशी रिलेट करू शकला अन तुम्ही करालच तर मात्र अतिशय सुंदर अनुभव आहे , अगदी परत परत घ्यावासा वाटणारा
या शनिवारी किंवा रविवारी
या शनिवारी किंवा रविवारी मराठी चित्रपट पाहण्याचा प्लान करत होतो, हाच बघतो मग
मस्त लिहलत.. ह्याची लिंक
मस्त लिहलत..
ह्याची लिंक प्रसारित केली तर चालेल का?
आबासाहेब , नक्की बघा .
आबासाहेब , नक्की बघा .
धन्यवाद अवनी
मी बी अजुन नाही पाहिला...
मी बी अजुन नाही पाहिला...
केदार, मस्त लिहिले आहेत
केदार, मस्त लिहिले आहेत तुम्ही
मी ह्या वीकेंडला पाहिला. वेगळाच आहे. म्हणजे कथा खूप वेगळी आहे असं नाही पण तरी शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो चित्रपट. ओव्हरऑल ट्रीटमेंट आणि लेखक-दिग्दर्शकाचा सेन्स ऑफ ह्युमर भन्नाट आहे. गजाननने मध्यवर्ती भूमिका अतिशय सुंदर साकारली आहे, अर्थातच बत्तीसनेही. बाकी सगळेही मस्तच. सईचं काम आवडलं. एकदम बिलिव्हेबल वाटतं तिचं पात्र, तिच्या आत्तापर्यंतच्या इमेजशी विसंगत असूनही.
संस्कृत गाणं मस्त जमून आलं आहे.
धन्यवाद अगो
धन्यवाद अगो
बघायची उत्सुकता जागवणारे आहे
बघायची उत्सुकता जागवणारे आहे हे परीक्षण. मागच्या परीक्षणात बघितले तर ठीक असा फील होता आणि सईचा उल्लेखही नव्हता. ईथे त्र कौतुक आहे
असो. बघायची इच्छा आहेच. सवड कशी निघेल हे कठीण वाटतेय..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
आजच पाहिला हा चित्रपट. मस्त
आजच पाहिला हा चित्रपट. मस्त आहे . हलका फुलका. अबब उर्फ गजानन कुलकर्णीने धमाल आणलीये. बत्तिसचे तडका संवाद भारी जमलेत. सईने इमेजशी विसंगत भूमिका चांगली निभावलीये. मुक्ता बर्वे ठीक ठाक . पर्ण पेठेला अंतरा सूट होते. मध्ये मध्ये थोडा स्लो वाटला चित्रपट पण एकंदरीत दिगदर्शकीय पकड जाणवत राहते. गाण्याबद्दल बोलायचं तर प्रियकरा हे संस्कृत गाणं , आणि अरे कृष्णा आवडलं. अबबच्या नवीन घराचं नेपथ्यही सुरेख वाटलं. चित्रपटाची बलस्थान सांगायची तर कलाकारांचा अभिनय , चटपटीत संवाद आणि दिग्दर्शिकीय पकड . थोडक्यात मस्त हलकाफुलका चित्रपट आहे. एकदम एन्जॉयबल