थाई किंवा मलेशियन पदार्थांमधे कापी किंवा बेलाखन (Belacan) म्हणून एक श्रिंप पेस्ट वापरतात. थाई मधली थोडी ऑयली आणि ओली असते तर मलेशियातली थोडी ड्राय असते.
भारतात गोव्यामधे अशी श्रिंप्स ची पेस्ट लोकल पदार्थात वापरतात असे वाचले. (माहिती स्त्रोतः विकीपिडिया: Galmbo is a dried shrimp paste used in Goa, India, particularly in the spicy sauce balchao)
तसेच प. बंगाल मधे शुक्ती पण वापरतात, कोकणा मधे सुकट चा वापर होतो.
कुणाला या पैकी कशाही बद्दल, शुक्ती आणि सुकट च्या परस्पर संबंध (जर काही असेल ) बद्दल तसेच एकूणच भारतात विविध प्रांतात अजूनही काही अशा माशांच्या पेस्ट्स वापरल्या जात असतील तर त्या बद्दल काही माहिती असेल तर प्लीज द्या. धन्यवाद!
अल्पना | 30 August, 2016 - 14:31
बहूतेक मणिपुरमध्ये नागरी /नाग्री/ नग्री/न्गरी (ngari)अश्या काहीश्या नावाचा एक आंबवलेला की सुकवलेला माश्यांचा प्रकार (एकप्रकारची फिश पेस्टच असते ही) स्वयंपाकात वापरतात असं वाचलंय. कदाचीत इतर नॉर्थ इस्ट्रन स्वयंपाकामध्ये पण असा काही पदार्थ वापरत असतिल. पण इंटरनेटवर असलेल्या माहिती व्यतिरिक्त त्याबद्दल जास्त काही माहित नाहीये.
(हेसुद्धा गेल्या वर्षीच्या लेकाच्या हॉलिडे होमवर्कमधून कळालं होतं.)
https://www.researchgate.net/publication/230642003_Ngari_-_a_traditional... इथे याबद्दल थोडी माहिती दिसतेय.
एम्बी | 30 August, 2016 - 14:39
अल्पना, लगेच उतर दिल्याबद्दल धन्यवाद. या बद्दल पूर्वी कधी तरी ऐकले होते पण पूर्ण विसरले होते.अगदी हीच माहिती अपेक्षित होती. शोधून बघते अजून मी पण.
अजून पण कोणाला काही माहिती असेल तर नक्की द्या.
चिनूक्ष, दिनेश, भरत तुम्हाला नक्की काही माहिती असेल तर सांगा इथे.
फक्त भारतातच नव्हे तर
फक्त भारतातच नव्हे तर जगातल्या इतर अनेक देशात सुकवलेले मासे, त्यांची पेस्ट, सॉस, खवले असे काही फर्मेंटेड पदार्थ, चवीसाठी वापरले जायचे. नुसती चवच असे नाही तर हा एक साठवणीचा पण प्रकार होता.
हे असेच काही पदार्थः
प्रोहक/प्रोहाक : कंबोडिया
शुक्ती : बांग्लादेश
न्गापी : म्यानमार
बेलाखन : मलेशिया
नुआक माम (फिश सॉस) : व्हिएतनाम
कात्सुओबुशी (बोनितो फ्लेक्स): जपान
बागुंग/पातिस : फिलिपिन्स
तेरासी : ईंडोनेशिया
जेओत्गाल : कोरिया
सेल्योद्का : रशिया
आन्चोवी : स्कॅन्डेनेव्हिया
बलचाउ : ब्राझिल
शितो : घाना
श्रिंप पेस्ट : नायजेरिया
वरील माहिती चुकीची वाटत असेल तर दुरुस्त करा. उच्चार पण चुकीचे असू शकतील कदाचित. पण हे साध्रर्म्य मला फार मनोरंजक वाटत आहे.
नायजेरियात, सुकी कोलंबी ( आपण
नायजेरियात, सुकी कोलंबी ( आपण जवळा म्हणतो तो, पण तिथे त्याला जरा जास्त लांब मिश्या असतात ) आणि भोपळ्याच्या बिया एकत्र वाटून ती पेस्ट वापरतात. पण तो भोपळा वेगळा असतो. त्याला दोडक्याप्रमाणे धारा असतात. बिया खुप असतात पण खाण्याजोगा गर नसतो. या भोपळ्याची पाने त्रिदलीय असतात आणि ती पण खातात.
हे वाटण तिथे सुपमधे वापरतात. पेप्पे सुप ( पेपर सुप, म्हणजेच लाल मिरच्यांचे सूप ) काऊ टेल सूप ( गायीच्या शेपटीचे सूप ) वगैरे तिथले लोकप्रिय प्रकार.
श्रीलंकेत, मालदीव फिश या
श्रीलंकेत, मालदीव फिश या माश्याचे छोटे तूकडे स्वादासाठी वापरतात ( हा माशा शिजवून वाळवलेला असतो ) त्यांच्या प्रकारच्या संबळ, म्हणजेच ओल्या खोबर्याच्या चटणीतही ते वापरतात. त्याला फार उग्र वास येतो.
रीलंकेत, मालदीव फिश या
रीलंकेत, मालदीव फिश या माश्याचे छोटे तूकडे स्वादासाठी वापरतात >>+१. चांगली लागते ती. मला आवडली.
कोकणात माशांची पेस्ट कशात
कोकणात माशांची पेस्ट कशात वापरताना मी तरी पाहिली नाही.
भाज्यांत वगैरे सुका कोळिम(जवळा) /ओला कोळिम वगैरे घालतो पण ते मिक्स भाजा प्रकारात मोडेल.
कारण सुकटाची पेस्ट नाही करत.
कुर्ल्या करताना मात्र कुर्लीचे छोटे पाय पाट्यावर वाटून मग त्यातला रस गाळून घेऊन तो रस कुर्लीच्या सांबार्यात टाकतो.
खेकडा म्हणजेच कुर्ली ना? मी
खेकडा म्हणजेच कुर्ली ना? मी खेकड्यांच्या नांग्या पाण्यात वाटून, गाळून ते पाणी खेकड्यांच्या ग्रेवीत वापरतांना पाहिलंय.
हो योकु! तेच लिहीलंय मी.
हो योकु!
तेच लिहीलंय मी.
मी किमची बनवताना श्रिंप्स इन
मी किमची बनवताना श्रिंप्स इन सॉल्ट ब्राईन वापरले होते. पेस्ट पण चालते आणि फिश सॉसही चाल्तो. किमचीच्या नावाने तोंपासु झालेय.