बरेच दिवस चाललं होत या विषयावर एक धागा हवा. आधि सर्च करुन बघितलं आॅलरेडि आहे काय - सापडला नाहि, नंतर वाट बघत होतो कोण काढतोय का, शेवटि मीच ठरवलं काढायचा...
तर मंडळी, टेक्नाॅलाॅजीच्या क्रुपेने आता घराघरात हायस्पिड इंटरनेट आहे आणि त्याच्याबरोबर आॅन डिमांड, लाइव स्ट्रिमिंग सर्विस पुरवणारे बरेच प्रोवायडर्स आहेत. उदा: नेटफ्लिक्स, ॲमेझान विडियो, स्लिंग टिवी, यप टिवी इ. इ. या प्रोवायडर्सकडे प्रचंड प्रमाणात कांटेट उपलब्ध आहे; चित्रपट, सोप्स, डाॅक्युमेंटरीज, रिजनल/इंटरनॅशनल चॅनल्स च्या स्वरुपात. आणि त्यात सतत भर पडत असते. या खाणींतुन निवडक रत्नं शोधुन काढणं हे महाजिकिरीचं काम आहे, इथे टिमवर्कच हवं. हा पहिला हेतु.
त्याचप्रमाणे या सगळ्या प्रोवायडर्स मध्ये उत्तम कोण, चॅनल लाइनअप, सर्विस, वॅल्यु फाॅर मनी कोणाकडे चांगली, कोणता नविन कांटेट (चित्रपट, सोप) रिलिज झाला आहे, त्या कांटेटवर तुमचं मत काय इत्यादि बाबींवर चर्चा करुन आपल्याला सोयिस्कर असा निर्णय घेणं सोप्पं पडावं; हा दुसरा हेतु.
या पुर्वि अशा प्रकारची चर्चा इतरत्र वाहत्या धाग्यांवर होत/झाली असण्याची शक्यता आहे; या पुढे हि व्हावी पण सगळी माहिती एकत्र राहावी म्हणुन हा प्रपंच...
टिवो ही एक ऑप्शन आहे.
टिवो ही एक ऑप्शन आहे. एनहान्स्ड केबल बॉक्स + लाईव स्ट्रिमिंग
क्वालिटी चांगली आहे पण कस्टमर सर्विस फार रूड आणि अनप्रोफेशनल आहे.
रोकू+स्लिंग चा आजवरचा अनुभव चांगला आहे.
ईडियन रिजनल चॅनेल साठी यपची ऑफरिंग चांगली आहे पण क्वालिटीमध्ये यप स्लिंग कडून मार खाते. एक ना धड वगैरे.
पुन्हा रिजन वाईज ही मतं/अनुभव एकदम ऊलटीही असू शकतात.
सध्या स्लिंगचं प्रमोशन चालु
सध्या स्लिंगचं प्रमोशन चालु आहे - ४०% डिस्काउंट ॲपल टिवी ४ वर
घरी डिश इन्स्टॉल केल्यावर
घरी डिश इन्स्टॉल केल्यावर इंटर्नेट वर सेम कंटेट मिळणारे डीश एनीव्हेअर चालू आहे का?
अरे छान धागा.
अरे छान धागा.
डिश एनिव्हेरलाच स्पिनाॅफ करुन
डिश एनिव्हेरलाच स्पिनाॅफ करुन स्लिंग टिवी फाॅर्म केली आहे, बहुतेक.
पोलिटिकल ड्रामाज, ॲक्शन, थ्रिलर्सच्या भाऊगर्दित कधीकधी एखादा लाइट कथानक असलेला पण आत कुठेतरी शिवणारा, डोळ्यांच्या कडा ओलावणारा चित्रपट पहाण्यात येतो आणि रोजमर्राच्या घटना या आपल्या नकळत, आपल्या सभोवतालच्या माणसांवर बरा/वाईट ठसा उमटुन जात असतात याची जाणिव देउन जातो. बिल मरीचा "सेंट विंसेंट" हा असाच एक चित्रपट. नेटफ्लिक्सवर आहे, नक्कि बघा...
भारतातले लिहीले तर चालेल
भारतातले लिहीले तर चालेल का?
नेट फ्लिक्स
टीव्हीएफ. ( अॅप फोन वर आहे. )
हॉट स्टार,
सोनी टीव्ही
झी फॅमिली.
इरोस नाउ.
>>भारतातले लिहीले तर चालेल
>>भारतातले लिहीले तर चालेल का?<<
ॲब्सोलुटली! भारतात देखील केबल कंपन्यांची दादागिरी चालते का याची कल्पना नाहि. त्यावरहि लाइव स्ट्रिमिंग हा एक चांगला पर्याय आहे. केबल कंपन्यांना $१५०-$२०० दरमहिना देउन, बघत नसलेल्या प्रोग्रॅमसाठि पैसे फुकट घालवणे हा मुर्खपणा आहे.
ॲपलचं टिवी ॲप या वर्षाअखेर
ॲपलचं टिवी ॲप या वर्षाअखेर लाॅंच होतंय. विल दॅट बी ए लास्ट नेल आॅन केबल कंपनीज काॅफिन?..