Submitted by vishal maske on 23 August, 2016 - 11:36
कांदा पाच पैसे किलो
शेतकर्याला कांदा देताना
भाव भलताच वाढतो आहे
शेतकर्याचा विकत घेताना
भावाने कांदा पडतो आहे
वारंवार भेटणारं सांगा हे
दु:ख कुठवर भोगायचं
पाच पैसे किलोने कांदा
विकुन कसंच जगायचं,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेतकर्यांनी रडण्यापेक्षा
शेतकर्यांनी रडण्यापेक्षा लढण्याचे काम करावे.शेतीत फायदा होत नसेल तर शेती सोडावी.दुसरा जगण्याचा मार्ग शोधावा.मेहनती माणसांना मरण नाही. काळ्या मायची सेवा, अन्नदाता, पोशिंदा ह्या चतुरपणे अापल्या फायद्यासाठी शेतकर्यांना चिटकवलेल्या पदव्या याला भुलण्याचे दिवस गेले अाहेत. स्वताचा विचार शेतकर्यांना करावा.
कांद्याचा भाव वेगाने
कांद्याचा भाव वेगाने वाढतोय.आजचा भाव ६० पैसे.