पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली अन्यथा काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
http://www.dawn.com/news/1278
http://www.dawn.com/news/1278370
एकच प्रश्न :राजनाथसिंग मोड
एकच प्रश्न
:राजनाथसिंग मोड ऑनः
मेरे मित्रो.. दिल पे हाथ रख के सच्चे मन से एक प्रश्न का जवाब दिजिये.
जलते सुलगते काश्मीर को शांत करना या बलुचिस्थान गिलगिट को जलना. आप के हिसाब से सरकार की क्या प्राथमिकता होनी चाहिये??
:राजनाथसिंग मोड ऑफः
खरे आहे. मोदींनी डायरेक्ट
खरे आहे. मोदींनी डायरेक्ट बोलायला नको होते. हे पाकड्यांच्या हातात कोलीत देण्यासारखे झालेय. शांतपणे काट्याने काटा काढता आला असता. खरे तर मध्यंतरी पाकव्याप्त आणी आपल्या काश्मीर मध्ये पूर आल्यावर आपल्या लष्कराने प्रचंड मदत केली होती. त्यावेळी त्या लोकांचे मत आपल्या बाजूने झाले होते. पण पाकड्यांन्ना कुठुन न कुठुन दावा साधायचाच असतो. त्यामुळे त्यांनी बुरहान वनीचे प्रकरण पेटवले. एका साईडने आपले मुर्ख स्वयंघोषीत कट्टर हिंदुत्व वादी नेते आणी दुसर्या साईडने असेच मुर्ख कट्टर मुस्लिम नेते ( ह्या दोन्ही समाजाच्या नेत्यांनी सामान्य जनतेला आणी देशाला कधी गृहीत धरलेच नाही) अशा कात्रीत आपला देश सापडलाय.
देश हा धर्मापेक्षा मोठा असतो हे काय प्रत्येक वेळेस सैनिकांनी आणी पोलिसांनी आपला जीव देऊनच समजावायचे का?
मी अमि, फार सुंदर लिंक. दि
मी अमि, फार सुंदर लिंक.
दि डॉन नेहमीच संतुलित आणि वाचनीय असतो.
इथे भयंकर वैचारीक गोंधळ
इथे भयंकर वैचारीक गोंधळ झालेला दिसत आहे.
=====================================
>>>>Both leaders agreed that terrorism is the main threat to both countries<<<<
घराणेशाहीने पोखरलेले काँग्रेस कैक दशके ओरडत आहे की पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया होत आहेत. मग आता मनमोहनसिंगांना हा साक्षात्कार तिकडे जाऊन कसा काय झाला की दोन्ही देशांना अतिरेकी कारवायांची भीती आहे? पाकिस्तानला असली तर असली, आम्हाला तुमच्यापासून आहे हे ठणकवायला हवे होते ना? हे आले सही करून! बाकी, मी आधीच्या प्रतिसादात जे म्हणालो त्याचे सपोर्टिव्ह विधान दोन दिवसांपूर्वी छापून आलेले होते, ते मिळाले की लिंक देईन. मनी वसे ते स्वप्नी दिसे प्रमाणे मी येथे मनातले भकलेलो नाही.
अश्या रीतीने हा मुद्दा निकालात निघालेला आहे. लिंकसाठी अवश्य थांबावेत, थांबायचे असलेच तर! मनमोहन सिंगांनी नेहमीप्रमाणे बुळचटपणे सही केलेली स्पष्ट दिसत आहे व त्या उतार्यासाठी सातींचे आभार!
=======================
>>>>आपण सैन्य आणि शस्त्रास्त्र या बाबतीत पाकिस्तानला वरचढ असलो तरी युद्ध आपल्याला पण परवडणार नाहीच. शिवाय भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करायला चीन आहेच. <<<<
परिस्थिती युद्धापर्यंत पोचली आहे असा दावा ना उडन खटोलांनी केलेला आहे ना माझ्य अकोणत्याही प्रतिसादात आहे. आंतरराष्ट्रीय रणनीतिचा एक भाग म्हणून काही विधाने करावी लागतात, त्यापैकी मोदींचे हे विधान भारताची आक्रमक बाजू दाखवणारे आहे. तेव्हा, युद्ध परवडेल की नाही वगैरे अस्थानी मुद्दे येथे आ यावेत हे समजलेले नाही.
=======================
>>>>एक पाकिस्तान बोंबलत असला म्हणून त्याला एवढे महत्व द्यायचे काहीच कारण नाही.
काश्मीर तेथे कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल, तसा आपल्यासाठी बलुचिस्तान नाही, अन काश्मीर तर नाहीच नाही. <<<<
एक पाकिस्तान बोंबलतोय ही आपली समस्या नव्हे. माणसे आपली मरत आहेत ही समस्या आहे. त्यामुळे महत्व द्यावे लागत आहे. काश्मीर हा आपल्या सार्वभौमत्वाचा प्रश्न नक्कीच आहे. तो तसा नाही म्हणणे म्हणजे खूप्पच मजेशीर आहे. बलुचिस्तान हा आपल्यासाठी प्रश्न नाही, ह्याच (तर) कारणामुळे त्या बलुचिस्तानचा उल्लेख जिव्हारी लागणारा आहे. आपल्या जिव्हारी लागणार्या काश्मीर प्रश्नावर आजपर्यंतची अनेक सरकारे बरळत होती. त्यांच्या जिव्हारी लागणार्या प्रश्नावर आम्ही काही म्हणू इच्छितो / शकतो हा संदेश आंतरराष्ट्रीय समुदायाला जाणे हा एका मोठ्या कूटनीतिचा भाग आहे हे लक्षात यायला हरकत नसावी. तसेही, मोठमोठ्या तज्ञांनी हे सोप्या भाषेत अनेकदा सांगितले आहेच गेल्या चार दिवसांत!
===================
>>>>आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने याबाबत जाहीर कबुली दिली नव्हती, ती मोदींनी दिली. जिथे देवदूत पाय टाकत नाहीत, तिथे मूर्ख लोक हमखास जातात अशी काहीतरी इंग्रजी म्हण आहे. गेली तीस वर्षे सातत्याने या कारवाया चालू आहेत. पण ना कधी भारत सरकार आणि पंप्र पहिल्या पानावर झळकले, ना रॉ अथवा रॉचे मुख्य अधिकारी. रामेश्वर नाथ काव यांसारखे जागतिक दर्जाचे गुप्तहेरशिरोमणी कधीही प्रिन्ट मीडियात आले नाहीत. त्या सगळ्याचे फळ आता मिळत आहे. भाजपची आतापर्यंतची वागणूक अतिउत्साही, अननुभवी, नवशिक्या पहिलटकरणीसारखी आहे. (तरी बरे, सत्ता मिळण्याची ही दुसरी खेप आहे.) उगीच आरडाओरडा. खरे तर बोंबाबोंब.<<<<
पुन्हा तेच! हे सांगणे म्हणजे बाळबोध, अतीउत्साही पाऊल नव्हे. ही एक सोचीसमझी तरकीब आहे. ह्यातून संदेश पोचवायचा आहे जो पोचला आहे. चुकून, बावळटासारखी उच्चारलेली ती वाक्ये नाहीत. जाणीवपूर्वक केलेले उल्लेख आहेत ते!
=============
>>>खरे आहे. मोदींनी डायरेक्ट बोलायला नको होते. हे पाकड्यांच्या हातात कोलीत देण्यासारखे झालेय. शांतपणे काट्याने काटा काढता आला असता. खरे तर मध्यंतरी पाकव्याप्त आणी आपल्या काश्मीर मध्ये पूर आल्यावर आपल्या लष्कराने प्रचंड मदत केली होती. त्यावेळी त्या लोकांचे मत आपल्या बाजूने झाले होते<<<
अनेक बाळबोध विधानांचा हा संचय आहे. पाकड्यांच्या हातात कोलीत आपण दिले काय आणि नाही काय, ते केव्हाही असतेच. साठ, सत्तर वर्षे त्या कोलीताचीच तक्रार करण्यात आपल्या बुरसटांनी आणि बुळचटांनी घालवलेली आहेत. शांतपणे काट्याने काटा काढायचा म्हंटला तर अजून काही शतके अशीच संचारबंदी ठेवावी लागेल. लष्कराने केलेल्या मदतीमुळे कोणी आपल्या बाजूने बोलेल ही बाळबोध अपेक्षा ह्या कुजलेल्या आंतरराष्ट्रीय प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर कुचकामी आहे.
========================
राहता राहिले इतर प्रतिसाद, ते केवळ बिनडोक विजयोन्मादात लिहिल्याप्रमाणे आहेत. जे स्वतःला जमले नाही आणि ह्यापुढेही जमणार नाही ते झाले म्हणून निर्माण झालेली भडास काढणे आहे.
एक लिंक द्यायची राहिली आहे. मिळते का बघतो. नाही मिळाली तर 'अशी लिंक नव्हतीच, मनातले बोलतात' असे म्हणायला पूर्ण मुभा आहे.
-'बेफिकीर'!
हे वाचा आणि ठरवा: हे ज्यांनी
हे वाचा आणि ठरवा: हे ज्यांनी लिहिलेले आहे ते येथील स्वयंघोषित आणि तथाकथित विचारवंतांपेक्षा नक्कीच अधिक तज्ञ असावेत असे आम्ही भाबडे मानतो:
=============================
http://indiatoday.intoday.in/story/Mammohan+Singhs+Balochistan+blunder/1...
Mammohan Singh's Balochistan blunder
While explaining the joint statement, Manmohan Singh claimed that India was doing nothing in Balochistan " indeed nor should it be doing anything there. He claimed that India"s conduct was an "open book" and that he was "not afraid of discussing anything". Had this sentence or any similar clarification been added to the joint statement suggesting that India contested Pakistan"s claim, it would have been clear that India rejects Pak accusations about interference in Balochistan. No spin- doctoring after the event can mitigate the lacunae in the joint statement itself.
The accusation made against India in the joint statement extends beyond its alleged involvement in Balochistan " it says that Pakistan has "some information on threats in Balochistan and other areas". The reference to "other areas" gives Islamabad space to lay terrorist acts in any part of Pakistan at India"s door.
The government"s spin doctors claim that India has gained from the joint statement by the absence in it of the K-word.
However a crucial sentence says " "Prime Minister Singh said that India was ready to discuss all issues with Pakistan, including all outstanding issues." Anyone who is familiar with the India-Pakistan dialogue knows that "all outstanding issues" has for long been the code word for describing Kashmir.
>>>>Through this act of utter
>>>>Through this act of utter foolhardiness the Indian prime minister had transformed the Balochistan problem from being a festering wound of Islamabad"s own creation to one caused by alleged Indian meddling. <<<<
हे जगजाहीर आहे आणि येथील स्वयंघोषित विद्वान ते नाकारत आहेत. इतकी बुळी रणनीतीच आपल्या रक्तात भिनवणे हे काम आजवर मोठ्या मेहनतीने केले गेलेले आहे.
बेफिकीर, माझा प्रतिसाद हा
बेफिकीर,
माझा प्रतिसाद हा सुनटूण्या यांनी मांडलेल्या प्रश्नांवर होता. ☺
बेफी, अगदी अचुक प्रतिसाद
बेफी,
अगदी अचुक प्रतिसाद !!
<<<< हे जगजाहीर आहे आणि येथील स्वयंघोषित विद्वान ते नाकारत आहेत. इतकी बुळी रणनीतीच आपल्या रक्तात भिनवणे हे काम आजवर मोठ्या मेहनतीने केले गेलेले आहे. >>>>
अनुमोदन !!
काही लोक स्वतः हसे का करून
काही लोक स्वतः हसे का करून घेतात तेच कळत नाही.
अर्थात इतकी अक्कल भक्तांना भाजपाला असती तर इतक्यावर्षात अवघी २ टर्म सत्ता दिली नसती
मस्त मनोरंजन झाले
म्हणे सोची समजी रणनिती. जोक ऑफ द डे.. बुडाला आग लागली असेल तर आधी ती विझवावी इतरांकडे लागलेल्या आगीची शेकोटी करू नये.
खरतर मोदी आणि त्याचे भक्त यांचे विचारच इतके बाळबोध आहे की आता त्यांच्यावर किव सुध्दा येत नाही.
स्वतःच्या अविचारी कृत्यामुळे शांततेत असलेला काश्मीर परत पेटवला आणि आता त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून बलूचिस्थानाकडे बोट दाखवत आहे.
खुळचट लोकांचे खुळचट विचार
बाकी यांचे पाळीव डुआयडी ट्रोल्स लगेच मागे मागे शेपटीसारखे अनुमोदन द्यायला आले. त्याशिवय जेवन जात नाही वाटते
कि कोणी विचारत नाही ?
बाकी स्वातंत्र्यसंग्रामात
बाकी स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा झेंडा हाती घेणारे बांग्लादेशाची फाळणी करणार्यांना बुळबुळीत म्हणतात यातच त्यांच्या अकलेची मर्यादा आणि पात्रता दिसून आली.
अंतरंगी, ओके
अंतरंगी, ओके
अकलेचे तारे तोडणे काय असते हे
अकलेचे तारे तोडणे काय असते हे प्रात्यक्षिक वरती एकाने दिले आहे. वाचून करमणूक करून घ्या
साठ, सत्तर वर्षे त्या
साठ, सत्तर वर्षे त्या कोलीताचीच तक्रार करण्यात आपल्या बुरसटांनी आणि बुळचटांनी घालवलेली आहेत. >>
बेफी त्यात वाजपेयी सुध्दा येतो. राहिले बुरसट आणि बुळचट ते तुझ्या वाजपेयींनी "अतिरेकी सोडून" स्वतःचा बुळचटपणा दाखवला होता. त्याचे परिणाम आपण अजुन भोगत आहे.
अतिरेकी सोडणे आणि बस चालू करणे, आणि न बोलवता त्यांच्या देशात जाऊन बिर्याणी खाणे हा बुळचटपणा आहे. जो भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.
भारताने बलुचिस्तानच्या
भारताने बलुचिस्तानच्या भानगडीत पडु नये हा आपल्या सारख्यांचा विचार/मत असणं स्वाभाविक आहे. कारण तुम्हा-आम्हाला अजीत डोवाल, राॅ सारख्या संस्था इंटेल पुरवत नाहि. वर बेफिकीर यांनी म्हटल्याप्रमाणे, हे सगळं प्रकरण मोदि प्रशासनाच्या कूटनितीचा भाग असु शकतो.
आता मोदि हे एकवेळ एंजल नसतील पण फूल तर डेफिनेटली नाहित...
मी कुठल्याही पक्षाची नाही,
मी कुठल्याही पक्षाची नाही, मला धाग्याच्या विषयाबद्दल काहीही लिहायचे नाही पण जवळपास प्रत्येक बीबीवर हा असाच प्रकार चालू आहे.
उदय८२ या आणि इतरही काही आयडीच्या पोस्ट्स वाचून मायबोलीचाच कंटाळा आलेला आहे. अतिशय घाणेरड्या वैयक्तिक आणि काहीही विचार नसलेल्या केवळ शिवीबाजीच्या या पोस्ट्सचा माझ्यातर्फे निषेध!
पाकिस्तान आता सगळी कडुन
पाकिस्तान आता सगळी कडुन घेरला गेलेला आहे.
अफघाणीस्तान सुद्धा आता पाकिस्तानच्या दबावाला आता जुमानत नाही.
ड्युरँड लाईन वर तोरखम जिथे पाकिस्तान व अफघाणीस्तानची बॉर्डर आहे तिथे अफघाणीस्ताननेच पाकिस्तानच्या
सैनिकांवर हल्ला केला व काही सैनिकांना मारले,
http://thediplomat.com/2016/06/the-torkham-incident-why-afghanistan-and-...
भारताने बलुचिस्तानच्या
भारताने बलुचिस्तानच्या भानगडीत पडु नये>>>>>
भारताने बलुचिस्तानच्या भानगडीत उघडपणे पडु नये असे आमचे म्हणणे आहे
धन्यवाद. नंदिनी काहींना काही
धन्यवाद. नंदिनी काहींना काही विशिष्ट भाषाच समजते या समजुतीचा मी आहे.

उघडपणे पडणे हीच एक (नवीन)
उघडपणे पडणे हीच एक (नवीन) नीती आहे.
आणि ती आपल्याला धोकादायक आहे
आणि ती आपल्याला धोकादायक आहे
बेफींनी दिलेली लिंक त्यांच्या
बेफींनी दिलेली लिंक त्यांच्या म्हणण्याच्या विरुद्ध माहिती देत आहे.
हे असं त्यांनी का केलं असावं हे कळण्यास मार्ग नाही.
एकच कारण त्यांना चिखलफेकित
एकच कारण त्यांना चिखलफेकित जास्त रस आहे
आपल्यात आणि अमेरिकेने इतर
आपल्यात आणि अमेरिकेने इतर ठिकाणी केलेल्या ढवळाढवळीत फरक आहे. आपले काश्मीर जळते, अमेरिकेच्या भूमीवर प्रत्यक्षात काहीच होत नसते. काही प्रमाणात आक्रमक भूमिका घेऊ शकतो हा संदेश जाणे हे तूर्त (काहींना) धोकादायक वाटणे अगदी साहजिक आहे कारण एक तर आपण तुलनेने अशक्त देश आहोत आणि आपल्यात रुजवली गेलेली मानसिकता ही 'आपण नेहमी चांगलेच वागावे' अशी आहे. ह्या मानसिकतेपासून डेव्हिएट झाल्यावर गदारोळ हा होणारच! पण आपण एक प्रचंड मोठी बाजारपेठ असल्यामुळे हल्ली असे बोलणे आपल्याला थोडेफार शोभतेही!
'आम्ही तुम्हाला काही विकू शकत नाही पण तुमचे बरेच काही खरेदी करू शकतो' ह्या तुलनेने कमीपणा घेणार्या भूमिकेत एक सामर्थ्यही दडलेले आहे. 'आमच्याकडे येऊन काही विकायचे असेल तर आमचे स्पष्ट विचारही ऐका' हे ते सामर्थ्य! हे केव्हाही दाखवता आले असते. पण कठपुतळीसारखे सर्वोच्च नेते आणि भारताच्या भवितव्याशी एक्झॅक्टली काहीच देणेघेणे नसलेले हायकमांड ह्यांनी मिळून ते टाळले.
>>>> साती | 22 August, 2016 -
>>>> साती | 22 August, 2016 - 19:20 नवीन
बेफींनी दिलेली लिंक त्यांच्या म्हणण्याच्या विरुद्ध माहिती देत आहे.
हे असं त्यांनी का केलं असावं हे कळण्यास मार्ग नाही.
डोळा मारा
<<<<
हे अधिक स्पष्ट करावेत कृपया.
आपण तुलनेने अशक्त देश आहोत
आपण तुलनेने अशक्त देश आहोत आणि आपल्यात रुजवली गेलेली मानसिकता ही 'आपण नेहमी चांगलेच वागावे' अशी आहे. ह्या मानसिकतेपासून डेव्हिएट झाल्यावर गदारोळ हा होणारच>>>>
काश्मीर आणि बलुचिस्तान हे दोन वेगळे विषय ठेवायला हवेत.
ते काश्मीर मध्ये असं करत आहेत तर आपण पण बलुचिस्तान मध्ये तसेच करावे असे नाही. आपण आपली प्रतिमा स्वच्छच ठेवावी.
आपला सशाक्तपणा काश्मीर मध्ये होणारे बंड मोडून काढण्यात, सीमा बळकट करण्यात, कारवाई करण्यात दाखवायला हवा.
>>>>आपण आपली प्रतिमा स्वच्छच
>>>>आपण आपली प्रतिमा स्वच्छच ठेवावी.<<<<
तशीच ठेवत आलो आजवर. नाही झाले काम! प्रतिमेला जगात कोणी विचारत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहिले.
>>>>आपला सशाक्तपणा काश्मीर मध्ये होणारे बंड मोडून काढण्यात, सीमा बळकट करण्यात, कारवाई करण्यात दाखवायला हवा.<<<<
ते सगळे सुरूच आहे. औषधोपचार सुरू आहेत. रोगाचे निदानही झालेले आहे. 'काट्याने काटा काढायचा प्रयत्न करणे' राहिले होते, 'ते आम्हीही करू शकतो' इतके 'फक्त सुतोवाच' झालेले आहे.
>>>>काश्मीर आणि बलुचिस्तान हे दोन वेगळे विषय ठेवायला हवेत.<<<<
बलुचिस्तान हा आपला विषयच असता कामा नये. पण 'तोही आम्ही आमच्या आजवरच्या माणुसकीयुक्त वागणुकीनुसार आमचा विषय आहे असे जगासमोर आणू शकतो' हा संदेश दिला गेला आहे.
भारताने नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. बलुचिस्तानमधील अन्यायाविरुद्धही आम्ही आवाज उठवू शकतो असे म्हणण्यात काही गैर तर नाहीच, उलट ती एक रणनीती ठरते.
>>>> साती | 22 August, 2016 -
>>>> साती | 22 August, 2016 - 19:20
बेफींनी दिलेली लिंक त्यांच्या म्हणण्याच्या विरुद्ध माहिती देत आहे.
हे असं त्यांनी का केलं असावं हे कळण्यास मार्ग नाही.
डोळा मारा
<<<<
ह्यावर थोड्या अधिक प्रकाशाची अपेक्षा ठेवत आहे. हा प्रतिसाद समजला नसल्यामुळे!
>>>>आपण आपली प्रतिमा स्वच्छच
>>>>आपण आपली प्रतिमा स्वच्छच ठेवावी.<<<<
प्रतिमा स्वच्छ ठेवुन या पुढे काय गवसणार आहे जे अगोदर साधलेल आहे ?
Mammohan Singh's Balochistan
Mammohan Singh's Balochistan blunder !!
Gilani"s allegations regarding India"s role in Balochistan were legitimised by a statement jointly issued by him and Prime Minister Manmohan Singh on the sidelines of the Non- Aligned Movement summit in Egypt.
हे ईतक स्वच्छ असताना अजुन काय प्रकाश टाकण्याची अपेक्षा करताहेत बेफी ?
Pages