मॅनेजमेंटच्या कचाट्यात
कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. :- 9730573783
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच,जीवाचं केलंय चुर्ण
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||धृ||
कित्तेकांचं भविष्य आम्ही
आमच्या हातानं घडवलं
अहो कित्तेकांचं मनोधैर्य
सहज सहजच वाढवलं
विद्यार्थ्यांच्या जीवनाला,बांधलेत यश तोरणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||१||
आमच्या शिक्षण देण्यानं
अनेकांचं दारिद्र्य हरवलं
आमच्या वर्तमानात मात्र
आमचं स्वातंत्र्य हिरावलं
तरी देखील ऊमेदीने,आमचं सुरू आहे जगणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात, जीणं झालं जीर्ण,...||२||
हे जिवंत असं वास्तव आहे
ऊगी रचलेला मनसुबा नाही
कोणताही निर्णय घेण्याची
आम्हाला कधीच मुभा नाही
गपगुमान त्यांचे जाचक आदेश,सुरू आहे पाळनं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||३||
त्यांचे आदेश पाळता पाळता
नको तो मनस्ताप होतोय
शैक्षणिक होणार्या नुकसानाचा
विद्यार्थ्यांना पश्चाताप होतोय
कितीही झाला त्रास तरी,मान्य करणार नाही हरनं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात, जीणं झालं जीर्ण,...||४||
असहाय्य या यातना आहेत
मना-मनात पोचवा हो
मॅनेजमेंटच्या जाचापासुन
शिक्षकांना वाचवा हो
एवढंच सांगुन झालं नाही, बोलायचं आहे पुर्ण
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||५||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी
* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
छान... मोठी कविता लिहिलीत
छान... मोठी कविता लिहिलीत
छान लिहितायेत।।।
छान लिहितायेत।।।
(No subject)
छान!
छान!