"हे काय चाललय..??"

Submitted by Abdul Hamid on 2 August, 2016 - 06:51

जी लोक एखाद्या कथेचे भाग करुन पोस्ट करत असतील तर, त्याना माझी एक कळकळीची विनती आहे कि, त्यानी शक्य तेवढ्या लवकर आपल्या कथेचे भाग पोस्ट करावे, उगीच कथा वाचनार्याचा वेळ वाया घालवु नये. जर हे शक्यच नसेल तर एकाच किवा दोन भागात कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा. प्रथम एखाद्या कथेची मस्त सुरुवात करायची, आणि पुढील भागासाठी वाचकाना वाचनातला मुड जाइ प्रयन्त वाट पहायला लावणे, हे कितपत योग्य आहे...?? एखाद्याला एक नावाजलेला लेखक बनायचा असेल तर अश्या चुका शोभतील का...?? आज मायबोली वर अश्या कित्येक कथा आहेत जे अजुन अपुर्ण आहेत, किती तरी दिवसापासुन अश्याच अर्धवट स्तिथीत पडुन आहेत...!! विचार करा...!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

@ गिरीकद, सस्मित..., मी इथे कथा लिहायला बसलेलो नाहीये. त्यामुळे मी किती लिहलोय, माझा कथेचा पुढचा भाग येणार का...??, या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे नाहियेत.
@ अनिल.., हो, मी मिरजेचा आहे आणि 'वालेकुम अस्सलाम'....!!!
@ उमेश्प..., धन्यवाद....!!

झालं! मायबोलीकरांना नवीन बकरा सापडला.:दिवा: म्हणजे टेक इट लाईटली!

अब्दुल, मायबोलीवर आधी तुमचे स्वागत. तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला माहीत नाहीये. आम्ही सगळे इथे सर्व चांगल्या लेखकांना सांगुन थकलो की अर्धवट कथा आधी पूर्ण करा. पण ते काही ऐकत नाहीत. आता त्यांना कधी वेळ मिळणार देव जाणे!

झालं! मायबोलीकरांना नवीन बकरा

झालं! मायबोलीकरांना नवीन बकरा सापडला.

अब्दुल, मायबोलीवर आधी तुमचे स्वागत. तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला माहीत नाहीये. आम्ही सगळे इथे सर्व चांगल्या लेखकांना सांगुन थकलो की अर्धवट कथा आधी पूर्ण करा. पण ते काही ऐकत नाहीत. आता त्यांना कधी वेळ मिळणार देव जाणे!

>> +१

रणगाडा कुठे आहे तुमचा ? >>> काहीही हं श्री. Lol

छान.... मिरज मेडिकल आमचं क्वालेज... >>> खाजगी गप्पा खाजगी विपुत मारा, Proud Wink

धन्यवाद अब्दूल तूमच्याकडून मला खूप पोत्साहन मिळतंय
माझ्यासारख्या नवोदीत लेखकासाठी तुमचा सल्ला खूप महत्वाचा आहे.
पून्हा धन्यवाद

काही गोष्टी अशा असतात, ज्यांचा शेवट व्हावा/करावा असं कधी वाटतच नाही..
सगळ्या अपुर्ण कथालेखकांना माझा जाहीर पाठींबा Wink