Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2016 - 11:52
शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !
या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !
पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही..
ऑल द बेस्ट !!!!!!
लिंक - http://www.konhoeelmarathicrorepati.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी त्या जीवांपैकी एक आहे
मी त्या जीवांपैकी एक आहे ज्यांनी सीजन एक पासून बिगबॉसचा एकही शो पाहिला नाही. सीजन वन मध्ये काय आहे हे बघायला एकदोन भाग पाच-दहा मिनिटांसाठी पाहिले असतील तेवढेच.
तर अश्या फालतू कार्यक्रमात आपले लाडके मराठी कलाकार न जातील तरच बरे..>>> +१०००
ए ए ए मी पण. मी पण.
ऋ अरे फार trp असेल को हो म क
ऋ अरे फार trp असेल को हो म क ला असं वाटत नाहीये एकंदरीत, आत्ता तर ऑक्टोबरमध्ये सुरु झाला शो आणि बंद करतायेत 3 महिन्यांनी.
ते कलर्स मराठीच कोणी बघत नाही
ते कलर्स मराठीच कोणी बघत नाही फारसे. निदान ते नाव चारचौघांना समजले. मुळात आपला मराठमोळा टीव्ही बघणारा प्रेक्षक झी मराठी वरच्या सिरीअल बघणारा आहे. त्याच्या गॉसिपिंग मध्ये रमणारा आहे.
तुझ्या विधानात थोडी तथ्यता
तुझ्या विधानात थोडी तथ्यता आहे, तरीपण स्वप्नील वळवेल प्रेक्षक तिथे, असं वाटलं असेल कलर्स मराठीला पण नाही झालं तसं. मीपण बघितला तर रिपीट बघायचे. बुधवारी मात्र त्याच वेळी बघायचे. अर्थात च ह ये द्या पण मी येता जाताच बघते म्हणा. कोण आलंय वगैरे एवढंच.
च ह ये द्या माझे सुद्धा
च ह ये द्या माझे सुद्धा अध्येमध्येच बघणे होते. तो खूप आवडायचा त्या काळातही अध्येमध्येच बघणे व्हायचे. कारण ते डेलीसोप नाही. कुठूनही अध्येमध्ये बघितले तरी चालते. प्रत्येक एपिसोड वेगळा. त्यामुळे चुकला तरी चालतो. पुढे काय याची रोजची उत्सुकता नाही. वगैरे वगैरे. त्यामुळे मराठी पब्लिक तरी असा कुठलाच कार्यक्रम न चुकता बघत नाही. आणि त्या वेळेला झी मराठीवर ईतर दिवशी रोज बघितला जाणारा डेलीसोप आला की मग बोंबलले.
आणि तसेही कौबकचा फॉर्मेट आता फार म्हणजे फार जुना झालाय. त्यात ईंटरेस्ट कोण कश्याला घेणार.
तरी काही एपिसोड छान रंगतात.
तरी काही एपिसोड छान रंगतात. त्या दिवशी पायाने अपंग असलेला मुलगा बहिणीबरोबर आलेला. 40 लाख ऑपरेशनला गरज. तो 50 लाख जिंकला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढी कमाई स्पर्धकांची होत असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर तो कार्यक्रम फ्लॉप नसणार. एवढ्या बक्षीसाच्या रक्कमा वाटतात म्हणजे धंद्याचे गणित यात कुठेतरी बसत असणारच ना..
मी स्वप्निलवर जो धागा काढलेला
मी स्वप्निलवर जो धागा काढलेला त्यात 850+ पोस्ट झाल्यावर तो वाहता करण्यात आलेला. त्यानंतरही आलेल्या पोस्ट पाहता जवळपास हजार पोस्ट त्याने मिळवलेल्या.>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या स्वप्नीलला नाही तर "तुझ्या" धाग्याला मिळालेल्या पोस्ट होत्या. इतर कोणी स्वप्नीलवर धागा काढला तर तो (धागा) शंभरीही गाठणार नाही.
मी त्या जीवांपैकी एक आहे
मी त्या जीवांपैकी एक आहे ज्यांनी सीजन एक पासून बिगबॉसचा एकही शो पाहिला नाही. सीजन वन मध्ये काय आहे हे बघायला एकदोन भाग पाच-दहा मिनिटांसाठी पाहिले असतील तेवढेच.
तर अश्या फालतू कार्यक्रमात आपले लाडके मराठी कलाकार न जातील तरच बरे..>>> +१००००००.
मला पण घ्या तुमच्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी तर ज्यांना बिग बॉस आवडते
मी तर ज्यांना बिग बॉस आवडते अश्यांपासून चार हात लांबच राहतो. कारण ज्यांना ईतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत त्याबद्दल गॉसिपिंग करायची सवय असेल अश्यांनाच तो शो आवडत असेल असे मला वाटते. त्यामुळे अश्यांपासून दूर राहिलेलेच बरे. अर्थात माझा हा समज चुकीचाही असू शकतो. पण का रिस्क घ्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages