अंबाडे म्हणजे लहानपणीचा रानमेवा. लहान असताना अंबाडे म्हणजे आंबट कैरीसारखे तिखट मिठ लावून खाण्याचा एक टाईमपास खाऊ. ह्याचे मोठे झाड असते. जेव्हा अंबाड्याचा सिझन नसतो तेव्हा आम्ही लहानपणी ह्या झाडाचे देठ व कोवळी पाने खायचो. त्यालाही आंबाड्याचा वास व आंबटपणा असायचा. आंबाडे खाताना एक विशिष्ट गंध जाणवतो अंबाड्याचा. हे पिकले की बाठा तयार होऊन पिवळे होतात. गर मऊ होतो व थोडी गोडच चव व अंबाड्याचा विशिष्ट वास एकत्र झाल्याने खायला मजा येते. कच्चे अंबाडे मिठात मुरवूनही खातात. मिठाच्या पाण्यात अंबाडे टाकून ठेवायचे व साठवणूक करुन हवे तेव्हा खायचे. अंबाड्याची चटणी, रायते केले जाते. जुन-जुलै दरम्यान लोणच्यासाठी तयार होतात. शक्यतो बाठा धरण्यापूर्वीच लोणचे घालायला घ्यायचे. म्हणजे गरही जास्त मिळतो आणि कापायलाही सोपे पडतात.
आता आपण रेसिपी पाहू.
अंबाडे स्वच्छ धुवून त्याच्या उभ्या चार फोडी कराव्या.
मिठ भाजून घ्यायचे, थोड्या तेलावर मेथी परतायची. मिठ व मेथी एकत्रच मिक्सरमधे बारीक करून घ्या.
आता मोहरीचा गर, हिंग, हळद्, लाल तिखट, व बारीक केलेले मेथीसकट मिठ एकत्र करून घ्या.
हे मिश्रण अंबाड्यांच्या फोडींवर मिसळून घ्या.
कढईत तेल चांगले कडकडीत तापवून मग थंड करुन ह्या मिश्रणावर ओतुन एकजीव करा.
झाले लोणचे तयार. आठ दिवसांनी खायला काढा.
बरणीत भरल्यावर तेल फोडींच्या वरती राहील असे पहा म्हणजे खराब होणार नाही. जर तेल कमी पडत असेल तर अजून गरम करून थंड करून घाला.
लहान मुलांना हे लोणच जास्त आवडत.
मस्त लोणचं! गोव्यात
मस्त लोणचं! गोव्यात मंगेशीच्या देवळाजवळ हे आंबाड्याचं झाड पाहिलं होतं आम्ही:
आंबाड्याला इंग्रजी नाव काय
आंबाड्याला इंग्रजी नाव काय आहे कळेल का?
मी जे गोंगुरा पिकल खाल्ले आहे ते आंबाडीच्या भाजीचे लोणचे होते. ती भाजी आणि इथे वर्णन केलेले आंबाडे यांचा काही संबंध दिसत नाही. त्या लोणच्यात कुठलीही फोड नव्हती.
हर्ट
तुम्ही थायलंडमधे पाहिलेत त्या फळाला तिकडे किंवा सिंगापूरात काय म्हणतात?
मी जे गोंगुरा पिकल घेतलं होत
मी जे गोंगुरा पिकल घेतलं होत त्यात अख्ख्या बाळ कैऱ्या होत्या! ही रेसिपी वाचेपर्यंत माझा गोंगुरा म्हणजेच बाळ कैऱ्या असाच समज होता.
गोंगुरा म्हणजेच अंबाडे का? नेटवर तर फक्त झाडाचा पाला दिसतोय, फळ नाही ?
हे फळ पहिल्यादाच पाहिले मला
हे फळ पहिल्यादाच पाहिले मला बाळकैर्याच वाटल्या, लोणच मस्त दिसतय.
ताज घरच लोणच खाण्यासारख सुख नाही
नेटवर ही एक लिंक मिळाली.
नेटवर ही एक लिंक मिळाली. त्यात याला Hog Plum असे म्हटले आहे. पण इथे शास्त्रीय नाव Spondias dulcis दिले आहे.
http://gardentia.net/2015/06/08/ambada-hog-plum-fleshy-hog-plum/
यासारखेच दिसणारे पण वेगळे शास्त्रीय नाव असणारे अजून एक फळ सापडले. इथे शास्त्रीय नाव Spondias mombin or Spondias purpurea दिले आहे. हे उत्तर अमेरिका, मेक्सिको मधे मिळते म्हणे
https://en.wikipedia.org/wiki/Spondias_mombin
याच पानावर वेगवेगळ्या भाषेत याला काय म्हणतात तेही लिहिले आहे. रच्याकने ब्राझीलीयन मधे त्याला ambaló ,पनामा मधे mangotin आणि पेरू मधे mango ciruelo म्हणतात.
जवळजवळ सारख्या दिसणार्या , एकाच कुळातल्या पण भिन्न असणार्या बर्याच अंबाड्याच्या जाती दिसतात.
https://en.wikipedia.org/wiki/Spondias_dulcis
पण गोंगुरा म्हणजे हे नक्की नाही.
गौरी यांनी जो फोटोदिलाय तेच
गौरी यांनी जो फोटोदिलाय तेच अंबाडे.
आम्ही लहानपणी शाळेत येता जाता खात असू.
पिकले की काळे होतात. आणि जरा आंबटगोड लागतात.
ऋषिपंचमीच्या भाजीत म्हणजे
ऋषिपंचमीच्या भाजीत म्हणजे कंदमुळात (ह्या भाजीला बरेच लोक कंदमूळच म्हणतात कारण ती पूर्वींचे ऋषिमुनीं खात असत त्या प्रमाणे कंदमुळांचीच केलेली असावी अशी अपेक्षा असे.) हे आंबाडे आवर्जून घालण्याची पद्धत आहे.>>>>>>>> ऋषिपंचमीच्या भाजीत घालण्यासाठी आंबाडे जिकीरीने मिळतात.आई ,आम्बाड्याची आमटी,रायते करायची.जयवंत दळवींच्या एका लेखात कोलंबी आणली त्याबरोबर आंबाडे आमटीत घातले जात अशा तर्हेचा उल्लेख आहे.
लोणचे सुरेख दिसतय.जागू, मोहारीची डाळही वाटून घ्यायची का?
सगळ्यांना धन्यवाद. गौरीने
सगळ्यांना धन्यवाद.
गौरीने टाकलेला फोटो अंबाड्याच्या झाडाचा आहे.
देवकी जर गर बारीक हवा असेल तर डाळ घ्यायची वाटून.
काय जादू आहे. एकसारख दिसणार्या फळाची दोन प्रकारची झाडे.
मला तर
मला तर https://en.wikipedia.org/wiki/Spondias_mombin या लिंकवर उजव्या बाजूला दाखवलेले झाड आणि त्याची पाने मी पाहिलेल्या आंबाड्या सारखी दिसताहेत. पानांची रचना खोडावर एकावेळी दोन पाने की एक पान होते हे आता आठवत नाही. पण पाने गडद हिरवी आंब्याच्या पानांसारखी दिसत हे नक्की.
अजय, मी दोन्हीकडे म्हणजे
अजय, मी दोन्हीकडे म्हणजे थायलंड आणि सिंगापुर दोन्ही देशात ही फळे पाहिली आहेत. हो तुमचे बरोबर आहे Spondias dulcis हेच नाव मलाही ठावूक होते.
Spondias dulcis ची पाने मला कडूनिंबासारखी वाटली. फक्त ती कातरलेली नाही इतकेचं पण बाकी पानांचे दिसणे तसेचं वाटते.
फळांची खरी मजा मी कंबोडियामधे चाखली आहे. लदाबदा झांडाना पिकलेली फळे येताजाता दिसतात आणि पैसे न देता कधीही खा ही मजा इतर ठिकाणी अनुभवता येणे शक्य नाही. मी पोटभर जांभळे थेट झाडाला लगडलेल्या घोसातून पाडली आणि खाल्ली. अजून बरीच फळे तिथे होती त्यांनी नाव आठवत नाही. पण कंबोडियामधे फळांची मौज आहे.
Pages