तुला वैषम्य नक्की वाटते आहे कशाचे ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 July, 2016 - 08:01

दिसेना चिन्ह कोसळत्या सरींच्या थांबण्याचे
कसे होणार ओल्याचिंब भिजल्या पाखराचे ?

प्रयासाने अखेरी पोचल्यावरती स्वतःशी
तुला वैषम्य नक्की वाटते आहे कशाचे ?

नको बोलू कुणापाशी नको बोलूस काही
निघू शकतात लाखो अर्थ साध्या बोलण्याचे

नको मांडूस दावा तू कुणाला जाणल्याचा
तुझे तर राहिले आहे स्वतःला जाणण्याचे

तुझ्यावाचून कोणाचेच ना अप्रूप ह्याला
करावे काय समजेना खुळ्या-वेड्या मनाचे

बरोबर वा चुकीचे हे तुला कळणार केव्हा ?
'प्रिया' निर्धास्त मांडावेस तू म्हणणे स्वताचे

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मक्ता सोडून सगळे शेर आवडले. मात्र दुसरा शेर सलग वाचला तर एक विधान वाटत आहे. तेवढी काळजी घेतली जावी.

मतल्यात वेगळ्या प्रकारची गझलीयत आहे.

होय !

बऱ्याचदा असे होते आहे खरे !

विचार करते बेफिजी त्या शेरावर !

अरविंदजी आपलेही धन्यवाद !

सुप्रिया

नको बोलू कुणापाशी नको बोलूस काही
निघू शकतात लाखो अर्थ साध्या बोलण्याचे>>>> किती साधे लिहितेस पण अफाट लिहितेस....कमाल आहे तुझी ताई