कलमुही -२

Submitted by kalyanib on 19 July, 2016 - 01:11

कलमुही -२
तर मित्रांनो प्रियाला आता तो दिसायला लागला रोज...ती रोज घरी गेली की त्याचा विचार करत भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असते. अशातच ती घरी असतांना एक ओळखीचा आवाज येतो... तो असतो तिच्या बाबांच्या मित्राचा जे चिखलदरा येथे सोबत आले होते...ती मग उगाच त्यांच बोलणं ऐकत बसते आणि एका वाक्यानि तिचा मूड खुश होतो ते काका म्हणतात मला mr वर्मांना एक call करायचंय करू का? अरे हो का नाही... तिच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो वर्मा म्हणजे त्याच आडनाव... आता ती अजून लक्ष देऊन ऐकते...ते call लावतात आणि काही तरी मीटिंग बद्दल बोलतात आणि फोन ठेवतात.... आता मी निघतो म्हणत निघतात आणि प्रिया चे वडील त्यांना सोडायला गेट जवळ जातात. इकडे प्रिया caller ID वरून त्याचा नंबर बघते आणि पाठ करते आज त्याला call करायचाच असा ठरवून आपल्या कामाला लागते... आज call नक्की करायचा असं ठरवून दुसऱ्या दिवशी कॉलेज करता तयार होते STD वर जाते पण भीती पोटी तशीच परत कॉलेज ला पळते आता तिचा एक पण लेक्चर मध्ये लक्ष लागत नाही सतत कॉलेज संप्याची वाट बघत असते आणि खिडकी बाहेर बघत असते तेवढ्यात तिला रोड वर दिसत कोणी तरी ती निरखून बघते आणि तिला लक्षात येत हा दुसरा कोणीही नसून तो आहे तिचा पहिला प्रेम...त्याला माहीत नसता ती त्याला खिडकीतून बघतेय हे... तो त्याच्या ४-५ मित्रां सोबत उगाच हिच्या college समोर काही तरी बोलत असतो...आणि कॉलेज च्या आत बघत असतो हिला काळात हा कोणाला बघतोय ते... आणि लेक्चर संपत आता हिला उगाच भीती वाटत असते... खाली मान घालून गाडी काढते आणि त्याला बघते आरेई बापरे हा माझ्याच कडे बघतोय असा म्हणत फास्ट गाडी चालवत घरी येते... आणि असा आता रोज घडत तो कॉलेज समोरून जाताना बघतो ही मात्र लपून बघत असते त्याला असेच काही दिवस उडून जातात आणि एक दिवस हिला सहन होत नाही... कसा मुलगा आहे येऊन बोलत का नाही मुली का कुठे जाऊन बोलतात मुलाला की बाबा मला तू खूप आवडतो असा कसा हा त्याला इतका पण कस नाही कळत मूर्ख कुठला... असा म्हणत STD जवळ येऊन थांबते करावा का call ? तो काय विचार करेल?अस म्हणत त्याच्या घरी फोन करते.... आणि तिकडून आवाज येतो तो एक बाईचा....हॅल्लो....कौन chahiye...helloooo...अरे बात नही करनी तो फोन क्यू करते... असा म्हणत असतांनाच ही फोने पटकन ठेवते आणि घरी येते...
क्रमश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठे भाग टाका हो.. अस इतके छोटं वाचून मजा येत नाही. इथल्या कथा वाचल्या नाहेत का तुम्ही. कमीत कमी २ पाने तरी लिहायला हवेत वाचकवर्ग पाहिजे तर. नाहीतर आधीच्या भागात ... असो . तुम्ही सुज्ञ असाल तर यातून योग्य तो बोध घ्यालच. Happy

नाही ग, रागावले नाही.. तसे वाटले असेल तर सॉरी. पण तू लिहायचा प्रयत्न करते आहेस अन तुझे हसे होऊ नये म्हणून लिहीले. Happy

kalyanib

चांगला प्रयत्न सुरु आहे, वरिल सर्व प्रतिसादांना अनुमोदन्...एक रिक्वेस्ट करतो, शक्य असल्यास कथा लिहिताना कथेचा काळ Tense बदला, वाचायला सोपे जाते, आणि तुम्हाला कथा फुलवायला ही सोपे जाईल.. >>तर मित्रांनो प्रियाला आता तो दिसायला लागला रोज...ती रोज घरी गेली की त्याचा विचार करत भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असते. अशातच ती घरी असतांना एक ओळखीचा आवाज येतो... तो असतो तिच्या बाबांच्या मित्राचा जे चिखलदरा येथे सोबत आले होते...ती मग उगाच त्यांच बोलणं ऐकत बसते आणि एका वाक्यानि तिचा मूड खुश होतो<< हेच तुम्ही असे ही लिहु शकता..
तर मित्रांनो, प्रियाला तो रोजच दिसू लागला. रोज घरी गेल्यावर प्रिया फक्त त्याचा विचार करत असे, आणि आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असे. अशातच एकदा काय झाले, ती घरी असतांना तीला एक ओळखीचा आवाज आला, पाहते तर तिच्या बाबांचे मित्र चिखलदर्याहून घरी आले होते. प्रिया मग त्यांच्या गप्पा ऐकत बसली, आणि अचानक एका वाक्याने तीचा मूड भलताच खुष झाला..