स्नाईपर रिलोडेड -1

Submitted by Abhishek Sawant on 17 July, 2016 - 11:01

स्नाईपर रिलोडेड- १
स्नाईपर - एक अतिशय चाणाक्ष, मेहनती आणि प्रचंड ताकद असणारे सैन्यातील एक रेजीमेंट. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा आणि त्याला टेक्नॉलॉजी ची साथ असं स्नाईपर रेजीमेंटला म्हंटल तर चूकीच ठरणार नाही. शत्रुच्या भागात घुसून त्याच्यावर लपून हल्ला करत राहणे स्नाईपर रेजीमेंट चे खास वैशीष्ठ. अनेक स्नाईपर सैनीकांनी आत्तापर्यंत युद्धाचे मैदान गाजवलेल आहे. लांबच्या पल्ल्यावरून आपलं सावज अचूकरित्या टिपण्यासाठी स्नाईपर या अदभूत रसायनाचा शोध लावण्यात आला.

भारतीय सैन्यात किंवा ईतर कोणत्याही सैन्यात स्नाईपर बनण्यासाठी फार मोठ्या परिक्षेतून, कष्टातून जावे लागते. आज ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मी स्नाईपर होऊ शकलो. प्रत्येक तरूणांप्रमाणे माझेही स्वप्न होते भारतमातेची सेवा करावी, देशासाठी मरावे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात जन्माला आल्यामुळे जन्मापासूनच लाल मातीशी नातं जुळले होते. ऐन तारुण्यात शरिर कमविण्याचा नाद लागला. जिम मध्ये तालिमीत घाम गाळून स्वत:ला अगदी फिट ठेवणे महत्वाचे होते. लवकरच भरतीची बातमी आली, एक दोन वर्ष अथक प्रयत्न केल्यानं भरतीमध्ये फारसा त्रास झाला नाही. सैन्यात निवड झाल्याची बातमी आल्यानंतर बाबांच्या डोळ्यातील आनंदाश्रु पाहताना जिवनाचं सार्थक झाल्यासारख वाटत होतं.

पण खरा प्रवास तर ईथून चालू झाला होता. सैन्यातले पहिले ट्रेनींग चे दिवस तर आयुष्यातील सगळ्यात कणखर काळ होता. कधी कधी वाटायचं सोडून द्यावं सगळं. आईने बसल्या जागेवर आणून दिलेला, तो सकाळचा गरम गरम चहा, ते दूपारी मस्त जेऊन ताणून काढलेली झोप, तो मित्रांसोबत पाहिलेला सिनेमा हे सगळं आठवले की रडू यायच. पण तरीही मी हिम्मत सोडली नाही सोबत छत्रपती शिवाजी महाराज होतेच प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या गाथा वाचून, त्यांचे पोवाडे ऐकून स्वतःला मोटीवेट कारायचो.

ट्रेनिंग नंतर स्नाईपर बनण्यासाठी इंफॅंट्री मध्ये पुरेसा अनूभव असणे अनिवार्य असते. इंफॅंट्री म्हनजे सैन्यातील प्रायमरी फोर्स. याच्यात प्रवेश मिळवण्यासाठी ASVAB मध्ये कमीत कमी ९० गुण मिळणे आवश्यक असते. इंफॅंट्री ट्रेनिंग ही १४ महिण्यांची अतिशय थकवणारी आणि अक्षरशः कस काढणारी असते, जी अगदी बंदीस्त वर्गापासून ते युद्धातील मैदाना पर्यंत असते. या ट्रेनिंग मध्ये शस्त्रांच्या हाताळणीपासून ते निशश्त्र लढ्णे, अतिशय तणावाच्या परिस्थीत डोकं शांत ठेवणे, जास्तीत जास्त दिवस उपाशी राहणे, फीटनेस इत्यादी वैगेरे गोष्टींसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पडताळण्यात येते. तुम्हाला तुमच्या शत्रुबरोबरच युद्धाच्या मैदानाची, त्याच्या भौगोलीक परिस्थीतीची किती माहिती आहे याची सुद्धा परीक्षा घेण्यात येते.

या महाकठीण ट्रेनिंग मधून गेल्यानंतरही स्नाईपर म्हणून निवड होण्यासाठी तुमचा रॅंक कोणता आहे ते महत्वाचे ठरते, MOS-11B ईनफॅन्ट्रीमॅन, 11D- कॅलवरी स्कॉट,18 सेरीजची E9 किंवा E3 रॅंक, ASI B4 अश्या रॅंकना प्राधान्य दिले जाते. तसेच स्नाईपर म्हणून सीलेक्ट होण्यासाठी विविध प्रकारच्या लेखी परिक्षांमध्ये ९०% च्या वर गुण मिळवावे लागतात. स्नाईपरला जे टास्क करावे लागतात जसे खूप दुर असलेल्या टारगेट्स ना अटॅक करणे, लांबच्या पल्ल्यावरून रंग वेगवेगळे ओळखणे वैगेरे वैगेरे त्यानुसार स्नाईपर ट्रेनिंगला सूरुवात करण्याआधी काही चाचण्यांमधुन जावे लागते.

आणि रायफल्स, शॉर्ट डीस्टंस वेपन्स आणि बाकीचे शस्त्र वापरण्यात तरबेज असणे आवश्यक असते. स्नाईपर ट्रेनिंग चालू झाल्यानंतर M4 रायफल शुटींग मध्ये फक्त सहा महिन्यांत “एक्सपर्ट” लेवल मिळवणे अनिवार्य असते. यात स्नाईपर्सना कित्येकवेळा ५०० मिटर्स अंतरावरील कॅट्च्या पत्त्याच्या आकाराच्या टारगेट्स ना शूट करावे लागते.

स्नाईपर चे फिजीकल प्रोफाईल A ग्रेडचे असणे अत्त्यावश्यक असते, कारण त्याला न हालचाल करता २०-२५ तासांसाठी आहे त्या पोझीशन मध्ये बसावे लागते. ऊंच डोंगरावर, नदीतून, घनदाट जंगलात, तर कधी ओस पडलेल्या शहरात शत्रुला कळू न देता चढाई करावी लागते. यात सैनीकाच्या मानसीक आणि शारिरीक मर्यादांच्या पलिकडे जाऊन काम करावे लागते. यानंतर शेवटला येते ती सायकॉलॉजीकल एक्झाम, यात तुम्हाला तुमच्या मनाची शक्ती कशी वापरायला येते ते पाहिलं जातं.

या सगळ्या अग्नीपरिक्षा पास झाल्यानंतर चालू होते ती स्नाईपरची ट्रेनिंग......

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू, सायो, ऑर्कीड धन्यवाद...पुढचा भाग लवकरच..
आपण आर्मी मध्ये आहात काय इनफंट्री कोर मध्ये?>>> नाही कॉलेज स्टूडेंट आहे...स्नाईपर गेम खेळताना ही कल्पना सुचली

चांगली सुरुवात.
पण स्नायपर रेजिमेंट? प्रत्येक युनिट मध्ये ठराविक स्नायपर्स असु शकतील. फक्त स्नायपर्सची रेजिमेंट म्हणजे ११ विकेटकीपर्स घेऊन खेळल्यासारखे होइल.

चांगली सुरुवात.
पण स्नायपर रेजिमेंट? प्रत्येक युनिट मध्ये ठराविक स्नायपर्स असु शकतील. फक्त स्नायपर्सची रेजिमेंट म्हणजे ११ विकेटकीपर्स घेऊन खेळल्यासारखे होइल.>>>>> यू. येस. आर्मी आणि इंडियन आर्मी च्या काही लिंक वरून स्नाईपर रेजीमेन्ट हा शब्द आढळला. आणि आजकाल स्नाईपर्सच युद्धाचे मैदान गाजवताहेत...काही स्नाईपर्सचे किलिंग्स तर हजाराच्या वर आहेत.

>>>>>यू. येस. आर्मी आणि इंडियन आर्मी च्या काही लिंक वरून स्नाईपर रेजीमेन्ट हा शब्द आढळला. आणि आजकाल स्नाईपर्सच युद्धाचे मैदान गाजवताहेत...काही स्नाईपर्सचे किलिंग्स तर हजाराच्या वर आहेत.

याबद्दल मलातरी काही लिंक सापडली नाही. असेल तर शेअर करा, वाचायला आवडेल. स्नायपर किल्स चा रेकॉर्ड ५०५ चा आहे. तो आणि त्यानंतरचे सगळे मोठे आकडे पहिल्या आणि दुसर्या महायुद्धातले आहेत. आजकालमध्ये क्रिस काईलच एक मोठा माहित आहे. त्याचे १६० किल्स आहेत.

छान कल्पना. पण कथा म्हणून लिहित असतांना, विकीपेडीयावरील माहिती स्वरूपात कथा मांडू नकोस, लिंक तुटल्यासारखी होते. त्यापेक्षा, ही माहिती कथेचा नायक कसा त्यातून जातोय, त्याच्या अनुभवकथनासारखी येऊ दे की. म्हणजे मग अजून मजा येईल Happy

.