नमस्कार मी मायबोलीवर नवीन आहे काही चुकल्यास माफ करावे ...खालील कविता माझे वडील शरद यांनी केलेली आहे.... कशी वाटते ते जरूर सांगा
माय मुलावर रुसली
माय मुलावर रुसली
माय मुलावर रुसली ऐसा, एक दाखला दाखवा //
पुत्राचे अपराध हजारो , एक आईचा दाखवा //
कुपुत्र झाले लाख हजारो , तयास नाही गणती किती
आई कुमाता कधी न झाली ,वेद पुराणे गाती स्तुती //
पुत्र घातकी होई परंतु , आई घातकी दाखवा
माय मुलावर रुसली ऐसा, एक दाखला दाखवा //
सहस्त्र अपराधांच्या राशी , पल्लावात तू घेशी ग
कोटी पातके जळून जाती ,कृपा तूझी जव होई ग //
क्रोध कटाक्षे पुत्रा जाळी ,जगी माउली दाखवा //
माय मुलावर रुसली ऐसा, एक दाखला दाखवा //
अनंत पुत्रामधे दयाळे ,मी ही तुझा गे पुत्र असा //
ब्रीद तुझे मज आहे ठावे , खरा करी तव तोच वसा //
पुत्र त्यागीला,माया मेली,ऐसी आई मज दाखवा //
माय मुलावर रुसली ऐसा, एक दाखला दाखवा //
आईची महती गाणारी चांगली
आईची महती गाणारी चांगली रचना...