कर्ण पिशाच्च
बांदिवडे गावात रामाचे जुने मंदिर होते. मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर होत्या . गावातील बाबू मेस्त्री हा सुतारकाम करायचा . त्याची रामावर फार भक्ति होती. पण त्याला मटक्याचा देखील नाद होता . रोज सकाळी रामाचे दर्शन घेवून बाबू कामावर जायला निघे आणि मग रस्त्यात समोर येणार्याो मुलांना थांबवून खाऊ /चॉकलेट द्यायचा अन विचारायचा की तुमचा आवडता अंक सांगा ... मग मुले जो अंक सांगतील तो आकडा तो लांज्याला मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन लावायचा ... जर आकडा लागला ,तर स्वारी खुशीत असायची .... मग रात्री राम मंदिरात भजन काय अन गाव जेवण काय ? सगळी धूमधमाल असायची ....
तर एक दिवस बाबू मंदिरातून दर्शन घेवून बाहेर पडला आणि त्याला कानात कोणीतरी बोलल्यासारख वाटलं ... त्याने आजूबाजूला पाहिलं ,कोणीच नव्हते ... म्हणून तो भास झाला असेल म्हणून दुर्लक्ष करून निघाला तेव्हा पुन्हा जोरात कानात आवाज आला की “आज सात नंबर लाव” ... मग मात्र बाबू ला वाटले की साक्षात रामप्रभूचा आदेश आहे, तर लावूया आज सात आकडा ... मग बाबूने अड्ड्यावर जाऊन सात आकडा लावला , आश्चर्य म्हणजे त्या दिवशी नेमका सात नंबर लागला आणि बाबू ला चक्क दहा हजार रुपये मिळाले !
बाबू मेस्त्री जाम खुश होता .... त्याच रात्री बाबूने गावातील भजन बोलावले ... आणि राम मंदिरात रात्रभर भजनाचे स्वर घुमत राहिले .... त्याच रात्री पुन्हा बाबू ला कानात आवाज आला ,”उद्या एक्का हाय बरका “...... बाबू एकदम खुश ..... दुसर्याब दिवशी लांज्याला जावून पुन्हा एक नंबर लावला ............. दुपारी एक नंबरच आला आणि पुन्हा बाबूला पाच हजार रुपये मिळाले .....
मग रोज बाबूला स्वप्नात किंवा कानात आकडे दिसू लागले.... नेमके तेच आकडे मटक्यात फुटत होते आणि बाबू ला रोज हजारात मिळकत होत होती.... मटक्या वाला रंगा सुद्धा आश्चर्यचकित झाला होता ... साल्या ह्या बाबूला रोज नंबर कसा लागतोय ? पण कुणालाच कोडे उलगडत नव्हते .... बाबूला विचारले तर तो “प्रभू रामाची कृपा “ म्हणून मोकळा होई....
बघता बघता बाबू लाखोपती झाला .... मग त्याला कानातल्या आवाजाने दारूचा गुत्ता चालू करायचा आदेश दिला ... मग त्याने गावात मोक्याच्या ठिकाणी एक बार चालू केला . आता बाबू चा बाबूशेठ झाला होता ... बार चांगलाच चालत होता कारण आसपास 10 गावात दारूचे दुकानाच नव्हते .
पण तेवढ्यात एक घटना घडली.... एक उनाड बैल रामाच्या मंदिरात घुसला आणि त्याने मंदिरातील मूर्ती ची नासधूस केली .... लगेच रात्री गावाने बैठक घेतली ... आणि मंदिरात नवीन मूर्ती बसवण्याचा विधी करण्याचा निर्णय झाला . बाबूने नवीन मंदिराला 5 लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले . सगळ्या गावाने वाहवा केली ...
त्याच रात्री बाबू ला एक विचित्र स्वप्न पडले . स्वप्नात एक माकड आले आणि म्हणाले , अरे मी रामभक्त हनुमानाच्या आदेशाने आलोय . तुला कानात जो आकड्याचा नंबर ऐकू येत होता ना, तो काही रामप्रभूचा आदेश नव्हता . भगवान रामप्रभू कधीच असे मटका लॉटरी खेळांनार्यांजवर कृपा नाही करत , तुला जो आवाज येतो ते एक भूत आहे... करणपिशाच्च आहे ... आता तर तू लोकांना दारू प्यायला बार पण चालू केलास ...चांगले नव्हे हे ....लक्षात ठेव याचे परिणाम चांगले होणार नाहीत ............
बाबू एकदम जागा झाला , अंग घामाने ओलेचिंब झाले होते ....... त्या रात्री काही त्याला झोप लागली नाही .... म्हणून तसाच बार मध्ये जावून एक बाटली घेवून बसला ..... बघता बघता बाटली संपवली आणि तिथेच आडवा झाला ....
त्या प्रसंगानंतर बाबूचे चित्त थार्या.वर नव्हते...त्या दिवसापासून तो कानात येणार्याल आवाजाकडे दुर्लक्ष करू लागला ... पण कानठळे आवाज वाढतच गेले .... त्यामुळे त्याचे कशातच लक्ष लागेना .... मग त्याला दारू प्याविशी वाटू लागली .......सारखा दारू दारू अन दारू ... 24 तास नशेत असायचा ... वर्षभरात लिव्हर डॅमेज झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले . डॉक्टर नी टेस्ट केल्यावर सांगितले की दारुमुळे हार्ट ला पण धोका आहे... बाबूची बायको ज्याम घाबरली . अनेक ज्योतीशांकडे जाऊन तिने बाबूची पत्रिका पाहिली ,पण उपाय सापडेना . मग शेवटी धामापूर गावचा प्रसिद्ध मांत्रिक धावजी बाबा याच्याकडे गेली आणि आपली सगळी रामकहाणी ऐकवली . धावजीबाबाने मग ध्यान लावून पाहिले आणि सांगितले की ,बाबुरावच्या पाठी जे भूत होते ते साधे सुधे नाही, एक कर्णपिशाच्छ आहे . त्याने तुम्हाला मदत केली त्यापाठी त्याचा काहीतरी स्वार्थ असणार ... आपल्याला मोठा कालिका देवीचा होम करून बलिदान करावे लागेल . भरपूर खर्च येईल .....बाबूची बायको म्हणाली कितीही खर्च येवूदे ,मी करीन .पण ही भानगड मिटवा ....
मग पन्नास हजार खर्च करून धावजी बाबाने होम केला . रेड्याचा बळी कालिका मातेला दिला . होम पूर्ण होताना धावजीसमोर कर्णपिशाछ उभे राहिले .... बोल तुला काय पाहिजे? का धरले बाबूशेठ ला? त्यावर ते भूत बोलले की माझे श्राद्ध करा . मी या गावात 100 वर्षापूर्वी होतो ....माझे नाव वामन ..... मला दारू प्यायचा शौक होता , पण बायको दारू पीवू देईना म्हणून मी आत्महत्या केली ..... मग भूत झालो आणि रामाच्या देवळाजवळ च्या पिंपळावर राहू लागलो ... हा बाबू माझ्या चुलत्याचा नातू .... त्याला मदत करावी म्हणून मी त्याला मटक्याचे नंबर सांगितले ... पण नंतर हा मला विसरला ... आणि म्हणून मी त्याच्या शरीराचा ताबा घेवून दारू प्यायला लागलो .......... मला मोक्ष हवा आहे ... नाशिक ला जावून माझे श्राद्ध करा म्हणजे मी मुक्त होईन...........
मग बाबूला घेवून बायको नाशिक ला गेली व तिथे विधिनुसार श्राद्ध घातले .... वामन ला मोक्ष मिळाला .... बाबू च्या प्रकृतीत फरक पडला आणि दारूची सवय सुटली ..... ! गावात नवीन राम मंदिर उभे राहिले आणि बाबूशेठ रोज संध्याकाळी मंदिरात भजन आरती ला जाऊ लागला .....आणि पुढे रामभक्त बनला !
(*"भुताटकी" या सुप्रसिद्ध फेसबुक पेज वर पूर्वप्रकाशित !)
बर्यापैकी साधी सोपी सरळ कथा.
बर्यापैकी साधी सोपी सरळ कथा.
बर्यापैकी साधी सोपी सरळ
बर्यापैकी साधी सोपी सरळ कथा.>>> हो ना
कडक ..मस्त लिहिलीये
कडक ..मस्त लिहिलीये
एकदा बाबु आजारी पडला, तापाने
एकदा बाबु आजारी पडला, तापाने फणफणला, दवाखान्यात गेला औषध घेतले मग ठिक झाला. हे जितके सरळ सोपे आहे तशीच कथा आहे.
कथाकथन नाही आवडले.
मला पण एक वेगवेगळा अनुभव
मला पण एक वेगवेगळा अनुभव आलेला आहे...जागेचा नाव नाही सांगत पण आम्ही भाड्यानी राहायचो तिथे एकदा बाथरूम चा दरवाजा आतून बंद झाला होता आपोआप. नवल म्हणजे तो दरवाजा वर उचलून काडी लावली तेंव्हाच लागायचा आणि त्या वेळेस घरी मी माझी मोठी बहीण आणि आजी होती. बरे मागून जायला पण जागा न्हवती कारण आम्ही १ ल्या माळ्यावर राहायचो आणि मागून चढायला पण काहीही न्हवते. कखाली जाऊन बघितले तर काचा पण बंद होत्या...नक्की काय झाले असेल ते आम्हाला अजून पण कळले नाही....
Kalyanib भयानक अनुभव.आहे
Kalyanib भयानक अनुभव.आहे तुमचा.