Submitted by savvy on 13 July, 2016 - 15:11
प्रश्नः मला रात्रीची झोपच लागत नाही काय कारण असावं याचं? डॉक्टर म्हणाले की तुम्हाला काहीच झालेले नाही. पण मला झोपच येत नाही. झोप का लागत नाही यावर तुम्ही मला काही उपाय सुचवू शकाल का?
zop ka lagat naahi? zop yenyasathi upay sanga.
धन्यवाद!
-savvy
savvy यांच्या प्रश्नाला मायबोलीकरांनी दिलेली उत्तरे संकलित.- वेमा
झोप न येण्याची कारणे व उपाय
उत्तरे:
- रटाळवाणी पुस्तके वाचा. अभ्यास करावा. रात्रीच्या वेळी अभ्यासाची पुस्तके वाचायला घेतली की हमखास झोप येते
- कसला विचार टिकिंग आहे का डोक्यात? आधी थोडावेळ चित्त शांत करण्याचा/ मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा.
- जेवल्यानंतर लगेच झोपू नका. संध्याकाळचं जेवण हलकं घेणे. झोपण्याआधी अर्धा-कप दूध त्यात आवडत असेल तर साजुक तूप इ. इ. प्रयोग करायला हरकत नाही.
- झोपण्याच्या ३० मिनीटे आधी मोबाईल, टेलिव्हीजन, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही स्क्रीनकडे पाहू नका.
- कपडे सैलसर असणे, गादी/ मॅट्रेस कंफर्टेबल असणे इ पाहीलं असेलच.
- लवेंडर ऑईलचाही वापर करता येईल
- रात्री झोपण्यापूर्वी १ तास चाला.
- तुम्ही दमतच नसाल तर झोप नाही येणार. प्रचंड थकेपर्यंत खूप कष्ट करा. शरीर दमले की आपोआप झोप येइल. दमत नसाल तर पटकन झोप नाही येत. आणि मग झोप येत नाही म्हणून डोक्यात विचार यायला लागतात आणि झोप अजूनच दूर पळते.
- आपले वय, प्रकृती नुसार व्यायाम
- दूध पचत असल्यास, व्यर्ज नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध घ्या साखर न टाकता. दुधासोबत बदाम किंवा केळं खाणेही फायदेशीर ठरू शकते. काही प्रकारचे हर्बल टी (थोडक्यात काढे) झोप आणायला मदत करतात.
- ठराविक वेळीच झोपत चला. हळूहळू शरीराला सवय होते त्या वेळेची.
- पंखा / एसीचा ब्लो सुखकारक ठेवणे (काहींना पंख्याखालीच झोप येते तर काहींचे पंख्याखाली डोके भणभणते)
- ध्यान जमले तर उत्तमच.
- भ्रामरी प्राणायाम (हा जाणकाराकडून शिकून घ्यावा)
- दोन्ही कानात मध्यमा (हाताचे मधले बोट) घालून प्रदीर्घ ओंकार (३-५ वेळा)
- आवडीचे पण सुदींग संगीत ऐकणे (सुदींग खूप महत्वाचे... नाही तर उलटा परीणाम व्हायचा)
- झोपण्या आधी दोन तास चहा/कॉफी/चॉकलेट/साखर पूर्ण टाळणे.ही सी एन एस आहेत.
- जास्त विचार्/ताण घेऊ नये.प्रश्न काही तास देवावर सोडावे.निराश विचार मनात येत असल्यास लाल चमकता स्टॉप लिहीलेला मोठा बॅरिकेड डोळ्यासमोर आणावा.
- रात्री लवकर जेऊन घ्या , आहार तेलकट , मसालेदार नको
- मेडीटेटीव sound असतात यु ट्यूब वर (पावसाचा , शेकोटीचा , बर्फाच्या वादळाचा , बांबूच्या बेटांचा , तिबेटींन गोन्ग्स चे ), खोलीत मंद आवाजात लाऊन ठेवायचे , अपोआप डोके शांत व्हायला लागते.
- झोपताना अर्धा कप दुध आणि त्यात जायफळ पावडर टाकून द्या हा अतिशय हुकमी इलाज आहे ,
- जागे असेपर्यंत आवडीच्या गोष्टी करत रहाणे . काहीच नाही केले तर झोप पण नाही येत. पण वर #४ विसरू नका
- शेती वाडी असेल तर नांगर हाकावा... कुळव हाकावे.. उस खंदावा कुदळी घेऊन.. आणि सणकून भाजी भाकरी खाऊन ताणून द्यावी..
- दिवसभर शक्य तितका वेळ सूर्यप्रकाशात काढा. रात्री झोप येण्यासाठी दिवसा सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश मिळणे मेंदूला आवश्यक आहे.
- जसे वय वाढते तशी शरीराची झोपेची गरज कमी होते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपताय का?
फोटो Claudio Scott-4913238 pixabay license
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संध्याकाळी भरपूर व्यायाम करा
संध्याकाळी भरपूर व्यायाम करा !
रटाळवाणी पुस्तके वाचा. उदा.
रटाळवाणी पुस्तके वाचा.
उदा. अकरावी बारावीची केमिस्ट्रीची पुस्तकं
शेळ्या मोजा. संपल्या तर म्हशी
शेळ्या मोजा. संपल्या तर म्हशी मोजा. येइल झोप. जातेय कुठे?

ऑन अ सिरिअस नोट - कसला विचार टिकिंग आहे का डोक्यात? आधी थोडावेळ चित्त शांत करण्याचा/ मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा.
बाकी - संध्याकाळचं जेवण हलकं घेणे. झोपण्याआधी अर्धा-कप दूध त्यात आवडत असेल तर साजुक तूप इ. इ. प्रयोग करायला हरकत नाही. कपडे सैलसर असणे, गादी/ मॅट्रेस कंफर्टेबल असणे इ पाहीलं असेलच. लवेंडर ऑईलचाही वापर करता येईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो
शुभरात्री!
@धनि- संध्याकाळी भरपूर
@धनि- संध्याकाळी भरपूर व्यायाम करावा म्हणजे वजनं वगैरे उचलावीत का?
@संशोधक- पुस्तकं वाचण्याने फायदा होत नाहीये.
@योकु- मेडिटेशन करणं हाही
@योकु- मेडिटेशन करणं हाही चांगला उपाय वाटतोय.
रात्रीची जेवण कमीच आहे माझं.
धनि, संशोधक, योकु धन्यवाद!
तुम्ही रोज थकता का? तुम्ही
तुम्ही रोज थकता का? तुम्ही दमतच नसाल तर झोप नाही येणार. प्रचंड थकेपर्यंत खूप कष्ट करा. शरीर दमले की आपोआप झोप येइल.
१ तास चाला रात्री. मस्त झोप
१ तास चाला रात्री.
मस्त झोप लागेल.
आपले वय, प्रकृती नुसार
आपले वय, प्रकृती नुसार व्यायाम
ध्यान
दूध पचत असल्यास, व्यर्ज नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध घ्या साखर न टाकता.
तुम्ही दमतच नसाल तर झोप नाही
तुम्ही दमतच नसाल तर झोप नाही येणार. >>> +१
म्हणजे दमत नसाल तर पटकन झोप नाही येत. आणि मग झोप येत नाही म्हणून डोक्यात विचार यायला लागतात आणि झोप अजूनच दूर पळते.
खालील उपाय करून बघा:
१. ठराविक वेळीच झोपत चला. हळूहळू शरीराला सवय होते त्या वेळेची.
२. पंखा / एसीचा ब्लो सुखकारक ठेवणे (काहींना पंख्याखालीच झोप येते तर काहींचे पंख्याखाली डोके भणभणते)
३. ध्यान जमले तर उत्तमच
४. भ्रामरी प्राणायाम (हा जाणकाराकडून शिकून घ्यावा)
५. दोन्ही कानात मध्यमा (हाताचे मधले बोट) घालून प्रदीर्घ ओंकार (३-५ वेळा)
६. आवडीचे पण सुदींग संगीत ऐकणे (सुदींग खूप महत्वाचे... नाही तर उलटा परीणाम व्हायचा)
झोपण्या आधी दोन तास
झोपण्या आधी दोन तास चहा/कॉफी/चॉकलेट/साखर पूर्ण टाळणे.ही सी एन एस आहेत.
जास्त विचार्/ताण घेऊ नये.प्रश्न काही तास देवावर सोडावे.निराश विचार मनात येत असल्यास लाल चमकता स्टॉप लिहीलेला मोठा बॅरिकेड डोळ्यासमोर आणावा.
अति विचार करू नका श्वसनाचे
अति विचार करू नका
श्वसनाचे प्रकार शिकून घ्या, प्राणायाम , योगासने ई.
रात्री लवकर जेऊन घ्या , आहार तेलकट , मसालेदार नको
मेदितेतीव ssound असतात यु ट्यूब वर (पावसाचा , शेकोटीचा , बर्फाच्या वादळाचा , बांबूच्या बेटांचा , तिबेटींन गोन्ग्स चे ), खोलीत मंद आवाजात लाऊन ठेवायचे , अपोआप डोके शांत व्हायला लागते.
झोपताना अर्धा कप दुध आणि त्यात जायफळ पावडर टाकून द्या हा अतिशय हुकमी इलाज आहे , झोप लागतेच लागते
झोपच येत नाही. तुम्ही मला
झोपच येत नाही. तुम्ही मला काही उपाय सुचवू शकाल का?
जागे असेपर्यंत चित्रपट पाहणे अथवा आवडीच्या गोष्टी करत रहाणे . काहीच नाही केले तर झोप पण नाही येत .....
किरण, अजिबातच झोप आली नाही तर
किरण, अजिबातच झोप आली नाही तर थकवा, पेंग, डोकेदुखी असे काहीच असे काहीच जाणवत नाही?
मस्त भरपूर दमावे! अंगातला घाम
मस्त भरपूर दमावे! अंगातला घाम निघायला हवा....
आणि दमणूक शारिरीक हवी मानसिक नको... नाही तर अजून झोप दूर पळेल...
शेती वाडी असेल तर नांगर हाकावा... कुळव हाकावे.. उस खंदावा कुदळी घेऊन.. आणि सणकून भाजी भाकरी खाऊन ताणून द्यावी.... काय बिशाद आहे त्या झोपेची "आता आम्ही नाही जा" असे म्हणायची!!
मेदितेतीव ssound असतात यु
मेदितेतीव ssound असतात यु ट्यूब वर (पावसाचा , शेकोटीचा , बर्फाच्या वादळाचा , बांबूच्या बेटांचा , तिबेटींन गोन्ग्स चे ) >>>>>>
असलं काही अस्तित्वात असतं हेच माहित नव्हतं. धन्यवाद.
मस्त वाटतंय ऐकायला.
जागे असेपर्यंत चित्रपट पाहणे
जागे असेपर्यंत चित्रपट पाहणे अथवा आवडीच्या गोष्टी करत रहाणे>>> +१
धन्यवाद अतरंगी
धन्यवाद अतरंगी
योगाभ्यासात ह्यावर दोन
योगाभ्यासात ह्यावर दोन चांगल्या क्रिया सांगितल्या आहेत आणि खरेच छान गाढ झोप येते:
१) जलनेती
२) त्राटक
असेल गरज तर तुम्ही नक्की शोधाल. शोधाल तर सापडेल! सापडले की सोडू नका!
अभ्यास करावा. रात्रीच्या वेळी
अभ्यास करावा. रात्रीच्या वेळी अभ्यासाची पुस्तके वाचायला घेतली की हमखास झोप येते.