६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन)
दोन वाट्या तांदुळ
दोन कांदे चिरुन
अर्धा वाटी दही
२ चमचे आल-लसुण पेस्ट
१ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट
फोडणीसाठी तेल
चविनुसार मिठ
कोरडा मसाला:
१ चमचा जिर
१ चमचा धणे
दालचिनी १ ते २ तुकडे
३ वेलच्या
४-५ लवंग
मी रेसिपी करताना उकडलेली अंडी तशीच पुलावात टाकली आहेत. थोडासा वातडपणा आला पण खाण्यायोग्य होती. म्हणून मायबोलीकरांनी सुचविल्याप्रमाणे उकडलेली अंडी थोडी मसाल्यात फ्राय करून मग पुलाव झाल्यावर त्यात मिक्स करावी.
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.
बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.
कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. (आहाहा मस्त घमघमाट सुटलेला ह्या मिश्रणाचा)
त्यावर दही व मसाला घालून परतवा. (कलर कॉम्बीनेशन छान दिसत आहे ना?)
आता मिश्रण ढवळून त्यात अंडी घालून हलकेच परतवा.
आता तांदुळ आणि मिठ घालून मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा. हा उपदेश अंड्याची चिरफाड होऊ नये म्हणून .
आता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. (हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?)
जर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा.
प्राजक्ता म्हात्रे
कृपया रेसिपी शेयर करताना नावासकट शेयर करावी.
घाबरू नका अंडी तुटली तरी आपल्याला खायचीच आहेत फक्त डेकोरेशन करता येणार नाही इतकच. त्यामुळे बिनधास्त.
हाच पुलाव मसाल्या ऐवजी आल-लसुण पेस्ट मध्ये मिरची घालूनही करता येतो.
रेसिपीखाली नाव मुद्दम टाकल आहे. कारण फेसबुकवर बहुतेक माशांच्या रेसिपीज नाव न टाकता चोरीला गेल्या आहेत. तसे हे नाव काढूनही चोरले जाऊ शकतात पण एक मानसीक समाधान स्वतःचेच.
मस्त फोटो! मी उभ्या चीरा
मस्त फोटो!
मी उभ्या चीरा दिलेली अंडी परतवून बाहेर काढून ठेवते आणि भात वाढताना त्यात घालते.
अंडी थोडी वातड झाली पण
अंडी थोडी वातड झाली पण खाण्यायोग्य होती. तुमच सजेशनच चांगल आहे. तो पुलावचा मसाला मुरावा म्हणुन मी एकत्र केली. पुलाव अर्धवट शिजल्यावर त्यात टाकली तर योग्यच होईल होईल.
काय मस्त रंग आहे मसाल्याचा!
काय मस्त रंग आहे मसाल्याचा! पुलावही भारीच दिसतोय.
आता प्रश्न तो ही नेहेमीचाच- यात आपले ते हे तळून घातले तर चालतील ना? की प** वापरायचं की मुटके?
छान फोटो. मसाल्याचा रंग तर
छान फोटो. मसाल्याचा रंग तर भन्नाट आलाय.
जागू, भूक लागली गं आता.. मी
जागू,
भूक लागली गं आता..
मी नॉनव्हेज पदार्थांमधे फक्त अंडी खात नाही पण शेवटचे फोटो कातिल चुम्मा आलेत गं
आता मला भूक लागली ना खुप.. तो मोकळा राईस कसला सॉल्लीड्ड दिसत आहे..
भूक भूक भूक..
जागूची रेसिपी आणि भाऊंचं
जागूची रेसिपी आणि भाऊंचं व्यंगचित्र १ नंबर
जागू , मी शाकाहारी आहे, पण तुझी रेसिपी नेहमी वाचते. ह्या प्रमाणाने मसाले घालून अंड्यांऐव्जी हे ते ढकल (वाचा पनीर बटाटे ) करून बघिन.
अंडी खूपच रब्बर होणार ! मी
अंडी खूपच रब्बर होणार !
मी मध्ये कापून मसाल्यात घोळवून एक दोनच मिनिटात काढते बाहेर.
भारी. अंडी नंतर टाकून असाच
भारी. अंडी नंतर टाकून असाच करतो.
योकु, अंडी नसतील टाकायची (घालायची म्हणू का? ) तर वर कोणीतरी सांगितलंय की. चिकन टाक. (घाल/ वापर)
पूनम
जागू , मी शाकाहारी आहे, पण
जागू , मी शाकाहारी आहे, पण तुझी रेसिपी नेहमी वाचते. ह्या प्रमाणाने मसाले घालून अंड्यांऐव्जी हे ते ढकल (वाचा पनीर बटाटे ) करून बघिन. >>> मी जागु
मस्त.. करून बघणार मी हे..
मस्त.. करून बघणार मी हे.. होऊ दे खर्च खुराडे आहे घरचं.. नाहीच जमले तर अंडी वेगळी काढत पावाबरोबर खाता येतील
मस्त फोटो आणि रेसिपी. >>> मन
मस्त फोटो आणि रेसिपी.
>>> मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता
हाच पुलाव पहावा करून
हाच पुलाव पहावा करून !!!
तेलावर रिफ्लेक्शन आलय.... मला वाचण्याआधी आधी जिलेटीन वाटलं होतं
मला पण भाऊंच्या सारखंच वाटलेलं ... माश्याचे पदार्थ संपले कि काय ??
यात १ मोठा चमचा मसाला लिहिलाय तो कोणता ???
फोटो मस्त आलेत ...
कोरड्या मसाल्याचे सामान
कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा << घाईच्या वेळी पण तु भाजुन मसाले बनवुन पदार्थ बनवतेस? कमाल आहे तुझी. शेवटचाफोटो मस्त..
पुलाव छान दिसतोय. झटपट आणि
पुलाव छान दिसतोय. झटपट आणि जास्त खटपटीची नसल्यामुळे उदया (प्रयत्न) करण्यात येईल.
भाऊ, लिहू द्या हो तिला. नेहमी
भाऊ, लिहू द्या हो तिला. नेहमी आम्ही तिच्या पाकृ नुसत्याच वाचतो. आमच्याकरता असे काही करून खाण्याजोगे पदार्थ कमीच लिहिते ती
जागू, लिही अजून बुधवारीय डब्याकरता पाकृ.
जागुतै पुलाव मस्तच. कालच
जागुतै पुलाव मस्तच. कालच बनवला. घरी सगळ्यांना आवडला. थॅंक्यु !!!
मस्त. महत्वाचे म्हणजे हा
मस्त. महत्वाचे म्हणजे हा साजूक तुपात करावा. अॅनिमल ओरिजिनचे पदार्थ अॅनिमल फॅट मध्ये जास्त खुलून येतात. मी अंडी उकडून साले काढून तळून घेते व बाजूस ठेवते. शेवटी सर्व्ह करताना घालते. मसाल्याची ग्रेवी थोडी वाटी भर बाजूला ठेवून वेगळी सर्व्ह करता येइल.
एक कला कुसर प्रकार म्हणजे एक दोन अंडी उकडलेली उभी धरून मधून व्ही च्या आकाराचे चिरे द्यायचे, धारदार सुरीने. नीट केल्यास फुलासारखे दोन भाग हातात येतात. ते वरून सजावटीस वापरावे. ( जावई भोजन असल्यास विशेष करून.)
जागुतै पुलाव मस्तच. कालच
जागुतै पुलाव मस्तच. कालच बनवला. घरी सगळ्यांना आवडला. थॅंक्यु !!! <<<+१११
पुलाव मस्तच. शुक्र्वारी
पुलाव मस्तच. शुक्र्वारी बनवला. घरी सगळ्यांना आवडला. मी भात व मसाला वेगवेगळा बनवून एकत्र केला. अंडी वातड होत नाही.
अंडी सॉफ्ट बॉईल करून घेतली
अंडी सॉफ्ट बॉईल करून घेतली तर? तरीही चिवट होतीलच का?
स्मिता, नँक्स, अनुराग जी
स्मिता, नँक्स, अनुराग जी फोटो असेल तर टाका प्लिज.
सगळ्यांच्या खट्ट्या-मिठ्या प्रतिसादांसाठीही धन्यवाद.
दोन-तिन दिवस नव्हते त्यामुळे आज पाहीले मेसेज.
भानुप्रिया चालू शकेल असे माझे मत. पण जर वातड होतील अशी शंका असेल तर सरळ इतरांनी सुचविल्याप्रमाणे ती नंतर मिक्स करा. मला थोडा वातडपणा जाणवला. पण तो जाणवण्यापुरताच.
Pages