२-३ बटाटे
२-३ कांदे (कॉस्कोतला असेल तर पाऊण)
आले
लसूण
मिरची
फोडणीचे साहित्य, तिखट, मीठ, कोथिंबीर इत्यादी
ब्रेड
हा पदार्थ लग्न झाल्यापासून मी खूप वेळा खाल्ला व करते. अहमदनगरच्या रॉयलच्या स्नॅक्स व मँगो मिल्कशेकची आठवण काढत काढत नवरा ताव मारतो. जनरली हे सँडविचेस उकडलेल्या बटाट्याचे करतात, पण मला समहाऊ तशी चव तितकी आवडत नाही. सो ही माझी पद्धत. बटाट्याच्या काचर्यांची भाजी टाकून केलेले सँडविचेस.
१) प्रथम मनसोक्त आलं, लसूण, मिरची व कांदा बारीक चिरून घ्या. (प्रमाण हवंच असेल तर १-१.५ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, ४ मिरच्या व कॉस्कोतला पाऊण कांदा - म्हणजे देशातील २-३ तर घ्याच!) आणि हो, बटाट्याच्या देखील पातळ काचर्या करून घ्या. मला बटाट्याची सालं ठेवायला आवडतात. मी सोलून घेत नाही.
२) फोडणी करून त्यात आलं, लसूण, मिरची जरा परतून मग कांदा ढकला. जरा परतले की लगेच चिरलेला बटाटा घालून शिजवा.
३) बटाटे हवे तसे शिजले की मीठ, लागल्यास तिखट, जर्राशी साखर, भरपूर कोथिंबीर व आवडत असल्यास लिंबू पिळून घ्या. वाफवलेले मटारही घाला. मग नंतर सगळे नीट मिक्स करून ब्रेडच्या स्लाईसवर पसरा.
४) अमूल बटर, किंवा तुमच्या आवडीचे फॅट लावून ब्रेडच्या दोन्ही बाजू भाजून घ्या. मी सध्या कोकोनट ऑयल वापरते. मस्त चव येते! ब्रेड भाजल्यावर मध्यातून किंवा डायगोनली कापून सॉसबरोबर खायला घ्या.
१) कांदा लसूण मसाला घातल्यास भन्नाट चव येते.
२) लिंबू पिळण्याच्या ऐवजी आमचूर पावडर घातल्यासदेखील भन्नाट चव येते.
३) धणे अर्धवट भरड करून मिसळल्यास... मस्त लागतात दाताखाली.. सारखं काय तेच तेच झाड!
४) सँडविच मेकर मध्ये सँडविचेस केली तरी चालतील. माझा सँ.मेकर बिघडल्याने मी प्रथमच गॅसवर भाजले अन प्रकरण जास्त छान झाले.
५) भाजायच्या आधी चीजची स्लाईस मिसळली तर अजुन भारी!
६) आज दही संपल्याने सॉसबरोबर वाढली आहेत. नेहेमी मी ह्याला दाण्याच्या कुटाची दह्यातली चटणी करते. म्हणजे दाण्याचा कूट, मीठ, तिखट व साखर हे दह्यात कालवून मग सँडविचेसबरोबर खाते. खूप मस्त लागतात!
७) टीपा बहुधा संपल्या. हॅव फन इटींग!
थँक्यू सर्वांना! इतर
थँक्यू सर्वांना!
इतर व्हेरिएशन्सही ट्राय करीन. समोसा ब्रेडमध्ये टाकून खाल्ला नाही -पण वाईट काय लागायचंय त्यात!
तसा आमच्याकडे भजीपावही फेमस आहे.
मस्त फोटो. खोबर्याचे तेल
मस्त फोटो. खोबर्याचे तेल कोणते खास कंपनीचे आहे का?
मी इथल्या ग्रोसरी स्टोअरमधून
मी इथल्या ग्रोसरी स्टोअरमधून (राल्फ्स/व्हॉन्स.किंवा होल.फुड्स) आणते ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल..
मस्तं फोटो. अनहेल्दी असेनात
मस्तं फोटो.
अनहेल्दी असेनात का पण ब्राऊन ब्रेडच्या तुलनेत व्हाईट ब्रेडची चव फारच अमेझिंग लागते.
समोसा वगैरे आलंच आहे चर्चेत तर अजून एक अनहेल्दी वर्जन 'ब्रेड पकोडा', म्हणजे बटाट्याची भाजी व्हाईट ब्रेड्मध्ये भरून ते सँडविच ग्रिल करण्याऐवजी भज्याच्या मिक्स मध्ये टाकून भज्यासारखंच तळायचं. युगं लोटली 'ब्रेड पकोडा' खाऊन.
अहाहा..कॉलेजच्या बाहेर ब्रेड
अहाहा..कॉलेजच्या बाहेर ब्रेड पकोडा तळून त्याचे तुकडे कापून लाल आणि हिरवी चटणी आणि कांद्यासोबत मिळायचं.
अहाहा..कॉलेजच्या बाहेर ब्रेड
अहाहा..कॉलेजच्या बाहेर ब्रेड पकोडा तळून त्याचे तुकडे कापून लाल आणि हिरवी चटणी आणि कांद्यासोबत मिळायचं. >> हे म्हणजे बिटरगावच्या कॉलेजापासनं आयआयएम आणि आयआयटी कुठल्याही कॉलेजच्या बाबतीत खपून जाईल हे विधान एवढा युनिवर्सल आयटम आहे तो.
आमच्या कॉलेजच्या बाहेर राजस्थानी चालवायचा हॉटेल, दोघे गेलो वडा घ्यायला की तो आत ओरडून सांगायचा 'ए मुकेस बेवडा लगा बाहर'
हे म्हणजे बिटरगावच्या
हे म्हणजे बिटरगावच्या कॉलेजापासनं आयआयएम आणि आयआयटी कुठल्याही कॉलेजच्या बाबतीत खपून जाईल हे विधान एवढा युनिवर्सल आयटम आहे तो.>> +१
सिन्डे! समोसा स्तफ व्हर्जन ट्राय करणेत येइल बॅक टु कार्ब आले की !
ओके बस्के. ते ब्रेड पकोडा
ओके बस्के.
ते ब्रेड पकोडा म्हणजे भ्यानक चविष्ट प्रकरण.
वॉव.. भार्रीच आहे हे
वॉव.. भार्रीच आहे हे इनोवेटिव सँडविच प्रकरण.. स्लर्पी रेसिपी
बरोबर दाण्याच्या कुटा ची दही घालून चटणी.., कांदा लसूण मसाला. आहाहा. मस्तं आहेत टिप्स...
कॉस्को तील पाऊण कांदा..
अगदी!! अगदी!!!!
आहा! मस्त दिसतंय गं कोणतंही
आहा! मस्त दिसतंय गं
कोणतंही ग्रील्ड सँडविच हे आवडतं प्रकरण आहे.
हायझेनबर्ग, ब्रेड पकोडा! वॉव! बिपिनचं पावपॅटिस आठवलं. भयंकर चविष्ट असतं. चिंचेची चटणी, कच्चा कांदा आणि ओलं खोबरं पखरून देतात. ह्या पावसाळी हवेत तर... जाऊ दे!
तोंपासु ............
तोंपासु ............
मस्तच...सोप्पी आणि सुटसुटीत
मस्तच...सोप्पी आणि सुटसुटीत रेसेपी...
मस्त कृती. टेस्टी होतात हे
मस्त कृती. टेस्टी होतात हे सँडविच.
ब्रेड पकोडा स्लर्प! पण खरंच ब्रेड + बटाटा + तळलेलं खावत नाही आता.
उकडलेल्या अंड्याच्या सँडविचची रेसीपी लिहावी कृपया. म्हणजे कृती कळलीय पण मसाले वैगेरे कोणते चांगले लागतात त्यात ते कळेल. आणि प्रतिसादात अॅडिशनलही काही मिळेल.
अगदी तोंडाला पाणी सुट्ल फोट
अगदी तोंडाला पाणी सुट्ल फोट बघुन. उद्याच करणार.
सिंडीने सांगितलेले समोसा
सिंडीने सांगितलेले समोसा सँडविच, गुडलक मधे बन समोसा नावाने मिळतात थोडा वेगळा प्रकार हिरवी चटणी असते, चिंगुची नसते फक्त.
स्लऽऽऽऽऽर्प ..........
स्लऽऽऽऽऽर्प ..........
माझ्या ऑफिस एरीयात- नरीमन
माझ्या ऑफिस एरीयात- नरीमन पॉइंटला - समोसा सँडविच फेमस आहेत. मी कधी खाल्लं नाहीये पण बरंच पब्लिक खातं. चीज वैगेरे वेरीएशन पण करतात त्यात.
ब्रेड पकोडा खावा तर बिपिनचाच.
ब्रेड पकोडा खावा तर बिपिनचाच. अजिबात तेलकट नसतो :स्लर्प :
मस्त पाकृ. फोटो लाळगाळू
मस्त पाकृ. फोटो लाळगाळू आहेत.
यात आणखी एक प्रकार म्हणजे उकडून कुस्करलेल्या बटाट्यांना बटरवर जरा परतायचं. त्यांत ठेचलेला लसूण, मिरची ठेचा / चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्ज किंवा ओरेगॅनो, मिरपूड, हवं असल्यास थोडं बटर व किसलेलं चीज, चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. कोथिंबीर आवडत असेल तर थोडी कोथिंबीर. फार घट्ट वाटत असेल तर थोडा दुधाचा हबका मारून सरसरीत करायचं. ब्रेड स्लाईसना लोणी फासून त्यात हे सारण भरून सँडविच करायचं व तव्यावर बटर / तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं.
आणखी एक प्रकार म्हणजे उकडलेला बटाटा मॅश करून जरा लोणी/ तेलावर खरपूस सोनेरी परतून घ्यायचा. त्यात मॅगी मसाला / लसूण चटणी / वऱ्हाडी ठेचा, चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर घालायचे. मॅगी मसाला घालणार असाल तर थोडा केचपही खपून जातो सोबत. ब्रेड स्लाईसात हे मिश्रण भरून तेलावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून सँडविच बनवायचे.
वा अकु मस्तच.
वा अकु मस्तच.
पाकृ. मस्तच आहे ☺ पण..सारखं
पाकृ. मस्तच आहे ☺
पण..सारखं काय तेच तेच झाड ने खूप हसवलं
मस्त रेसिपी . सगळी वेरिएशन्स
मस्त रेसिपी . सगळी वेरिएशन्स हि छानच .
फोटो दिसायलाच टेस्टी
फोटो दिसायलाच टेस्टी दिसतोय.
टोस्ट सँडवीच तर बटाटा भाजीचेच हवे. काही ठिकाणी टमाटर, बीट, कांदा, काकडी ईत्यादींच्या स्लाईसने वेज सँडवीज बनवत त्यालाच टोस्ट करतात.. ते बोअर होते
तसेच ग्रिल केलेले सुद्धा तितकेसे नाही आवडत. ते दांड्याला पकडून चुलीवर ठेवायचे टोस्टर हवे, आणि त्याच्या कडाही कश्या मस्त खरपूस भाजल्या गेल्या पाहिजे. पहिला चावा घेताच आतल्या गरमागरम भाजीचा अचानक भयानक मध्ये चटका बसायला हवा की फू फू करत आपण अर्धा घास पुन्हा तसाच ताटात ठेवायला हवा
गॅस टोस्टरला हे ग्रिल करायचे
गॅस टोस्टरला हे ग्रिल करायचे मग, मधुन कापुन त्यावर हिरवी आणि चिन्गु चटणि लावायची वरुन अग्दी बारिक कान्दा,कोथिन्बिर्,झिरो नबर बारिक शेव्,कोथिबिर... ज्याच नाव ते लागत हे!
अकुचे व्ह्रिरीएशन ईमॅजिन
अकुचे व्ह्रिरीएशन ईमॅजिन करुनच तोपासु झालय..
कसले मस्त प्रकार लिहीत आहात
कसले मस्त प्रकार लिहीत आहात सगळे.
प्राजक्ता, माझी एक वहिनी
प्राजक्ता, माझी एक वहिनी बटाट्याच्या मिश्रणात बाऽरीक चिरलेली सिमला मिरचीही घालते. (कटरमधूनच सि मि चिरून घेते)
त्याचीही वेगळी चव व पोत असल्यामुळे मजा येते सँडविच खायला.
Pages