२-३ बटाटे
२-३ कांदे (कॉस्कोतला असेल तर पाऊण)
आले
लसूण
मिरची
फोडणीचे साहित्य, तिखट, मीठ, कोथिंबीर इत्यादी
ब्रेड
हा पदार्थ लग्न झाल्यापासून मी खूप वेळा खाल्ला व करते. अहमदनगरच्या रॉयलच्या स्नॅक्स व मँगो मिल्कशेकची आठवण काढत काढत नवरा ताव मारतो. जनरली हे सँडविचेस उकडलेल्या बटाट्याचे करतात, पण मला समहाऊ तशी चव तितकी आवडत नाही. सो ही माझी पद्धत. बटाट्याच्या काचर्यांची भाजी टाकून केलेले सँडविचेस.
१) प्रथम मनसोक्त आलं, लसूण, मिरची व कांदा बारीक चिरून घ्या. (प्रमाण हवंच असेल तर १-१.५ इंच आले, १०-१२ लसूण पाकळ्या, ४ मिरच्या व कॉस्कोतला पाऊण कांदा - म्हणजे देशातील २-३ तर घ्याच!) आणि हो, बटाट्याच्या देखील पातळ काचर्या करून घ्या. मला बटाट्याची सालं ठेवायला आवडतात. मी सोलून घेत नाही.
२) फोडणी करून त्यात आलं, लसूण, मिरची जरा परतून मग कांदा ढकला. जरा परतले की लगेच चिरलेला बटाटा घालून शिजवा.
३) बटाटे हवे तसे शिजले की मीठ, लागल्यास तिखट, जर्राशी साखर, भरपूर कोथिंबीर व आवडत असल्यास लिंबू पिळून घ्या. वाफवलेले मटारही घाला. मग नंतर सगळे नीट मिक्स करून ब्रेडच्या स्लाईसवर पसरा.
४) अमूल बटर, किंवा तुमच्या आवडीचे फॅट लावून ब्रेडच्या दोन्ही बाजू भाजून घ्या. मी सध्या कोकोनट ऑयल वापरते. मस्त चव येते! ब्रेड भाजल्यावर मध्यातून किंवा डायगोनली कापून सॉसबरोबर खायला घ्या.
१) कांदा लसूण मसाला घातल्यास भन्नाट चव येते.
२) लिंबू पिळण्याच्या ऐवजी आमचूर पावडर घातल्यासदेखील भन्नाट चव येते.
३) धणे अर्धवट भरड करून मिसळल्यास... मस्त लागतात दाताखाली.. सारखं काय तेच तेच झाड!
४) सँडविच मेकर मध्ये सँडविचेस केली तरी चालतील. माझा सँ.मेकर बिघडल्याने मी प्रथमच गॅसवर भाजले अन प्रकरण जास्त छान झाले.
५) भाजायच्या आधी चीजची स्लाईस मिसळली तर अजुन भारी!
६) आज दही संपल्याने सॉसबरोबर वाढली आहेत. नेहेमी मी ह्याला दाण्याच्या कुटाची दह्यातली चटणी करते. म्हणजे दाण्याचा कूट, मीठ, तिखट व साखर हे दह्यात कालवून मग सँडविचेसबरोबर खाते. खूप मस्त लागतात!
७) टीपा बहुधा संपल्या. हॅव फन इटींग!
सह्हीच
सह्हीच
छानच !
छानच !
खूप सुंदर फोटो आणि एकदम खावेश
खूप सुंदर फोटो आणि एकदम खावेश पोत आहे सॅन्डविचचे.
एक दुसरी कृती पण जरा वेगळी आहे ती अशी:
बटाटे आवनमधे भाजून घ्यायचे. ते सोलून त्याची साल वायच जाईल. पण हे बटाटे अतिशय रवाळ लागतात खाताना त्यामुळे सॅडविचचे पोत एकदम छान लागते. ह्यात लाल मिरची पावडर, आमचुर पावडर, भाजून सोललेले दाणे घालायचे. मग मिठ साखर घालावी. सगळ काही एकत्रित मॅश करुन घ्यावे. मग हे सारण ब्रेडमधे भरुन खावे. तेल नाही की फोडणी नाही.
आहा! तोंपासु
आहा! तोंपासु
सगळे साहित्य, त्याच्या
सगळे साहित्य, त्याच्या स्टेप्सचे फोटो मिळुन अतीशय टेस्टी प्रकरण बनलयं. आत्तापर्यंत कुठल्याच सँडविचचा फोटो मला इतका आवडला नव्हता, जे हे आवडलेत. आणी भाजी अफाट चवदार दिसतेय. आणी हा प्रकार जास्त सही वाटतोय कारण मलाही उकडलेल्या बटाट्या पेक्षा त्याच्या काचर्याच फार आवडतात. टिप्स पण छान आहे. जरुर करुन बघणार.
छान.
छान.
मस्त मस्त! हर्ट, कृती छाने.
मस्त मस्त!
हर्ट, कृती छाने. थँक्स.
काही गोष्टी अजिबातच डोक्यात
काही गोष्टी अजिबातच डोक्यात येत नाहीत माझ्या
, त्या लक्षात आणून दिल्याबद्दल थँक्स 
१. नेहमी उकडलेलाच बटाटा वापरायला हवा असे नाही ( उकडलेला बटाटा नसेल तर मी सँडविच करत नाही किंवा त्यासाठी बटाटा उकडून घेऊन मगच सँडविच करते)
२. कांदा लसूण चटणी ह्यात सुद्धा वापरता येईल ( मी अनेक मसाले घालून करते पण कांदा लसूण मसाला घालायचे सुचलेच नाही कधी!)
सँडविच खल्लास दिसतायत! हा
सँडविच खल्लास दिसतायत! हा प्रयोग करून बघावा असं माझ्याही कधी डोक्यात नाही आलं. आता पावसाळ्यात नक्की करणार!!
तुझी सँडविचेस चविष्ट आणि
तुझी सँडविचेस चविष्ट आणि तोंपासु दिसतायत. शिवाय २-३ नेली डब्यातून तर लंचसाठी सब्स्टिट्युट पण आहेत.
गॅस वर ठेवायचा टोस्टर होता पुर्वी आमच्याकडे त्यात आम्ही अशी सँडविचेस करायचो
जबरी लागतात.
गॅस वर ठेवायचा टोस्टर होता
गॅस वर ठेवायचा टोस्टर होता पुर्वी आमच्याकडे त्यात आम्ही अशी सँडविचेस करायचो >>> माझ्याकडे आताही आहे आणि अधुन मधुन होतातच सँडविचेस
पण उकडलेल्या बटाट्याची भाजी असते कारण काचर्या कुरकुरीतच लागतात 
मस्त दिसत आहेत. भरपूर वेळा
मस्त दिसत आहेत. भरपूर वेळा वेगवेगळ्या पद्धतीने करून पाहिलेली आहेत. आता अशीही करून पाहू
गॅस वर ठेवायचा टोस्टर होता >> याबद्दल दक्षिणाला +१ लहानपणी हे सँडविच एक आवडता प्रकार होता
मस्तच दिसतायंत काचर्या
मस्तच दिसतायंत
काचर्या उरल्या तर सँडविचमध्ये भरुन टोस्ट केलेले आहे पण टो सॅ ची भाजी करताना कायम उकडलेले बटाटेच वापरते ( तसेच आवडते ) पण आता वरचे फोटो बघून तुझ्या पद्धतीने करुन बघावेसे वाटतेय.
टोस्टर मध्ये अशी सँडवीचेस
टोस्टर मध्ये अशी सँडवीचेस बनवायची, कुरकुरीत आणि चपटी.
मग टेमरूक भरून आपल्याला हवा तसा चहा बनवायचा. बाहेर मुसळधार पाऊस, खिडकीत बसायचं आणि ते सँडवीच चहात बुडवून खायचं. वाईट लागलं तर सांगा मला.
छान
छान
भारीच, भुक लागली आता.
भारीच, भुक लागली आता.
मस्तच !!
मस्तच !!
माझीही फेव्हरिट! मीही बटाटे
माझीही फेव्हरिट!
) भाजीची करते - आता अशीही करेन. 
मीही बटाटे उकडून केलेल्या (उरलेल्या
मला पण भयंकर आवडतात अशी
मला पण भयंकर आवडतात अशी सँडविचेस. माझ्याकडे भारतातून आणलेला नॉन-स्टिक टोस्टर आहे. त्यात केलेली सँडविचेस मस्त खरपूस लागतात.
उकडलेली अंडी बारीक चिरून त्यात तिखट-मीठ घालून केलेलं फिलिंग पण ऑटाफे आहे.
मस्तच!
मस्तच!
मस्त
मस्त
सोपी आणि मस्त पाकृ. चीज घालून
सोपी आणि मस्त पाकृ. चीज घालून अजून मस्त लागेल.
फोटो तोंपासू आलाय.
फोटो खतरा आलाय.
फोटो खतरा आलाय.
फोटो खतरा! माझे पण आत्यतिक
फोटो खतरा! माझे पण आत्यतिक आवडते सॅन्डविच, गरम आनी क्रिस्पी भारी लागतात, चिझ घालुन खुपच टेस्टी लागतात..यात एकदा तयार बटाटेवडे घालुन पण केले होते ... ते पण लय लय भारी लागले होते.
य्म्म्म्मी आहे हे! कधी तरी
य्म्म्म्मी आहे हे!
कधी तरी ट्राय करेन
मस्त आहे हे!
मस्त आहे हे!
मस्त फोटो. उकडलेल्या
मस्त फोटो. उकडलेल्या बटाटेवड्यांच्या भाजीची खाल्ली आहेत गॅसवर ठेवायच्या टोस्टरमध्ये घालून.
आमच्याकडे दुसर्या प्रकारचीही सँडविचेस होतात, झटपट एकदम. बटाटे उकडून मॅश करून त्यात चिरलेला कांदा, मीठ, लाल तिखट, किंचीत हळद आणि भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून ब्रेडच्या स्लाईसवर थापून मस्त तव्यावर खरपूस परतून खायचं. मस्त लागतात.
प्राजक्ता, तुला बवड्यांचं
प्राजक्ता, तुला बवड्यांचं सँडविच आवडलं असेल तर समोसे पण ट्राय कर.
एका स्लाइसला कोथिंबीर चटणी, दुसर्या स्लाइसला चिंच-खजूर चटणी, या दोन स्लाइसच्यामध्ये समोसा फोडून त्यात बटर. हा असा सगळा सरंजाम ग्रिल करून खायचा. अशक्य भारी लागतो.
ब्रेड, ग्रिल आणि बटर वगळता इतर सर्व जिन्नस आमच्या त्या ह्या ब्रॅन्डचे वापरावेत.
सायो, हा प्रकार तू सांगितला होतास का?
त्या ह्यांच्या ब्रॅन्डचे
त्या ह्यांच्या ब्रॅन्डचे म्हटल्यावरही सिंडी तुला हा प्रश्न कसा काय पडतो?
(No subject)
Pages