पाउस आणि ती

Submitted by मंदार खरे on 25 June, 2016 - 07:19

येणार म्हणता म्हणता
थोडा भुरभुरला पाऊस
तिच्या आठवणी सारखा
थोडा हुरहुरला पाऊस

खिडकीतून डोकावले तुषार
तिच्यासारखे तेही हुषार
काढून हलकेच खोड
मनाला लावलीच ओढ

पाने चिंबचिंब झाली
कशी मोहरून गेली
मिठी जशी तिची
कुंद आठवून गेली

हळुवार पाणी ओघळणारे
तिच्या केसांमध्ये थबकते
दवबिंदु जसे फुलावर
पहाटेच्या वेळी चमकते

पावसाचा गंध मातीस
आठवतो तीचा सहवास
ईंद्रधनु कमान नभी
तिच्या अलगद चाहुलीस

जसा भेटी धरणीस
तू मनमोकळ्या रात्री
भेट घडावी तिची
चंद्र चांदण्या रात्री

भरभरुन ये एकदाचा
होवू देत प्रलयकार
अशा पुसटश्या आठवणींना
करु देत हद्द्पार

© मंदार खरे
mandar.khare@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !