वाघाची बोबडीच वळली
एका गावात मोहन नावाचा एक मुलगा राहायचा . मोहनला लहानपणा पासून एक खोड होती . तो खूप बढाया मारायचा . सर्व मित्र त्याला फेकू म्हणायचे . म्हणजे थापाड्या . मोहनला त्याचे काही वाटायचे नाही . त्याला मजा वाटायची . खर तर ते वयच अस होत ना कि मुल खूप स्वप्न नगरीत विहार करीत असतात . त्यात मोहन तर फक्त सात वर्षांचाच होता .
एके दिवशी मोहन चे काका त्याच्या घरी आले . ते नेहमी शिकारीला जात असत . आता पन्नास साठ वर्षांपूर्वी लोक जंगली जनावर खूप उच्छाद मांडायचे म्हणून त्यांची शिकार करीत असत . मोहनचे गाव जंगलाच्या जवळच असल्याने त्यांनी दुसर्याच दिवशी शिकारीला जाण्याचा बेत आखला . काकांची भली मोठी बंदूक बघून मोहनला काकान बद्धल खूप मोठेपणा वाटू लागला . रात्री त्याने काकांच्या शेजारी झोपण्याचा हट्ट केला.
काकांनी मोहनला त्यांच्या शिकारीच्या भरपूर गोष्टी ऐकवल्या . त्या ऐकता ऐकता मोहनचा कधी डोळा लागला ते त्याला कळलेच नाही .दुसर्याच दिवशी मोहनने मित्रांना घरी बोलावले व काकांची भली मोठी बंदूक खांद्यावर घेवून दाखवली . एव्हड्या वर थांबेल तर तो मोहन कसा ? त्याने लगेच मित्रांना काकांचा पराक्रम सांगायला सुरुवात केली .
तो सांगू लागला, "एकदा त्याचे काका शिकारीला गेले होते . फिरता फिरता अंधार झाला . तेव्हड्यात अंधारात डोळे चमकले . काकांनी पटकन ओळखले कि तेथे वाघ आहे. मग काय काकांनी पटकन बंदूक उचलली आणली लावली डोळ्यांना , तेव्हड्यात त्या वाघाने काकान वर उडीच मारली . मग काय विचारता ? अशी दोघांची फायटिंग सुरु झाली कि बास . कधी वाघ वर तर कधी काका वर वाघावर . खूप वेळ अशी फायटिंग झाल्या वर वाघाला समजले कि आता त्याची काही खैर नाही. तो घाबरला व झाडावर चढू लागला.
मग काका काय घाबरताहेत ? छे , ते पण वाघाच्या मागे चढले कि झाडावर . वाघ घाबरून अजून उंच चढू लागला. आता काकांची सटकली , त्यांनी पटकन वाघाची शेपटी पकडली आणि वाघाला खाली पाडले. मग आपण पण त्यांनी वाघावर उडी मारली व त्याच्या तोंडात हात घालून त्याची शेपटीच त्यांनी तोंडातून खेचून काढली . "
सगळी मुल तोंडाचा आ वासून गोष्ट ऐकत होती , तेव्हड्यात मोहनच्या डोक्यात टपली बसली . त्याने मागे वळून पहिले तर मोहनचे काका त्याचा कडे रागाने बघत म्हणाले "अरे फेकड्या , एव्हड्या थापा मारतोस काय तू ? वाघाच्या तोंडात हात घालायला काय मला वेड लागलंय काय? पुन्हा अश्या थापा मारताना दिसलास तर तुलाच मी वाघाच्या पुढे नेवून ठेवीन , कळले ? "
हे ऐकताच मोहनची बोबडीच वळली व त्याने धूम ठोकली . पण नंतर मात्र त्याने थापा मारणे मात्र कायमचे बंद केले .
वाघाची बोबडीच वळली
Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 06:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा