
तुरीची डाळ, कढिलिंबाची पाने, गोडा मसाला, गुळ, चिंचेचा कोळ, तिखट, कोथिंबिर, ओलं खोबरं (ऐच्छिक), फोडणीचं साहित्य (तेल, मोहरी, हिंग, हळद)
प्रथम (छोटी) अर्धी वाटी तुरीची डाळ हिंग, हळद आणि तेल घालून शिजवून घ्यावी. एकिकडे चिंच गरम पाण्यात घालून कोळून घ्यावी व, चोथा टाकून द्यावा. काही लोक कोळासकट चिंच घालतात पण मग ती जेवताना घासात मध्ये मध्ये येते म्हणून मी फक्त कोळ घालते.
यातच गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला घालून घ्यावा.
दुसरीकडे कढणीमध्ये तेल घालून, मोहरी तडतडली की हिंग, हळद आणि कढिलिंबाची पाने घालून चरचरीत फोडणी करावी.
ही फोडणी डाळिवर ओतावी आणि कोथिंबीर घालावी, व थोडे पाणी घालून खळखळ उकळावी.
फायनल आमटी. वरून ओलं खोबरं घालून घ्यावं ते ऐच्छिक असल्याने मी घातलेलं नाही.
चिंचेचा कोळ घातल्याने आमटी काळपट लाल दिसते. मंद आचेवर उकळल्याने छान मिळून येते. सकाळची आमटी संध्याकाळी, किंवा संध्याकाळची दुसर्या दिवशी सकाळी जास्त छान लागते. आधी फोडणी करून मग वरून डाळ ओतून आमटी केली तरी चालते, मी मोस्टली वरूनच फोडणी घालते.
मस्त मस्त आमटी भात म्हणजे
मस्त मस्त
आमटी भात म्हणजे स्वर्ग सुख
मध्ये कुठेतरी अस विषय चालला होता कि जगबुडी तर तुम्हाला सगळ्यात शेवटी कोणता पदार्थ खावासा वाटेल तर माझे उत्तर आमटी भात असे होते
आहा, मस्त मस्त पावसाळी
आहा, मस्त मस्त
पावसाळी वातावरणाच्या मुहूर्तावर आली तुझी आमटी!
माझ्या पण आवडीची. मी तिखटा
माझ्या पण आवडीची.
मी तिखटा ऐवजी हिरवी मिरची आणि चिंचेऐवजी आमसुल घालते.
वरुन साजुक तूप MUST. मला बाकी गरम खाण्याचे वेड नाही. पण आमटी भात आणि मुडाखि वाफेचीच पाहिजे. पावसाळा आणि हिवाळ्यातले आवडीचे आणि अत्यंत समाधान देणारे रात्रीचे जेवण
माझे लग्न टिकून राहण्यात हया
माझे लग्न टिकून राहण्यात हया आमटीचा मोठा हातभार होता>> बापरे काय वाक्य आहे हे अगदी अफाट!!!
मला आमसुलाचे फक्त शरबत आवडते आणि आमसुलाची नारळाच्या दुधातली कढी. वरणात आमसुल नकोसे वाटते.
आमटी मस्त आहे ..
आमटी मस्त आहे ..
दक्षिणा, मस्त रेसिपी. एकदा
दक्षिणा, मस्त रेसिपी. एकदा ट्राय करेन.
मस्त......म्स्त मस्त ग....
मस्त......म्स्त मस्त ग....
एवढी तोंपासु कृती आहे आणी
एवढी तोंपासु कृती आहे आणी फोटो एवढे जळाऊ आहेत की काल प्रतीसाद देववेना.:अरेरे: आज उसळीचा बेत असल्याने ही आमटी उद्या करुन ओरपणार. सगळ्यांच्याही रेसेप्या एवढ्या चटकदार आहेत की बस्स!
व्वा दक्षिणा... क्या बात
व्वा दक्षिणा... क्या बात है... खूपच छान.. पोस्ट आता पाहिली. बाहेर रिमझिम पाउस चालू आहे. (वाशी)
आणि आणि आता... ऑफिस मधे काम काही होत नाही. चला घरी... आजचा बेत आमटीचा... फुल्ल वशीकरण...
मस्तं आहे रेसिपी. पण
मस्तं आहे रेसिपी.
पण एखाद्याने वाचून करायची म्हटली तर प्रमाण कुठे आहे.
अर्ध्या वाटी तूरडाळीला किती चिंचेचा कोळ, किती गूळ, किती गोडा मसाला हे तरी लिही की.
आमच्यासारखी एखादी बाई वाटीभर गूळ आणि पेलाभर चिंचेचा कोळ घालून आमटीचा सॉस करून ठेवेल.
घटकपदार्थांचे अंदाजे तरी प्रमाण लिहिले पाहिजे.
साती ताइ प्रमाण नका विचारु
साती ताइ प्रमाण नका विचारु सर्व काही अन्दाजाने, बाकी याला आमच्या नाशिककडे 'आम्बट वरण' म्हणतात. एक पुणेरी वहीनी जि आता नाशिककर आहे , तिला जाम पिड्तो आम्ही 'फोड्णीच्या वरणाला' 'आमटी' म्हणण्यावरुन.
आमच्या कडे 'आमटी' म्हणजे डाळ-दाण्याची, शेवेची, गोळ्याची, पातोड्याची (वाट्ण घातलेली)... आणी हे म्हणजे फोड्णीच्या वरण .. फोड्नी कधि लसणाची , तर कधी टोम्याटोची, तर खुप कोथिम्बीर आणी हिरव्या मिरच्या घालुन केलेली तिखट अशी.. अजुन एक ज्या फोड्णीच्या वरणाला चिन्च गुळ असेल त्याला लसुन्ण नाही, किन्वा उलट.
माझी आजी हे फोड्णीच्या वरण खुप छान करायची.माझी आइ मराट्वाड्यातति, तिला 'आम्बट वरण' प्रकार फारसा आवड्त नाही.(कदाचेत खुप तिखट खात अस्ल्याने),मात्र माझ्या मुलाला ही 'आम्बट वरण' आवड्ते. 'आम्बट वरण' चे फोटो पाहुन माझी काकु आजी आठवली.
दक्षे, आज तुझ्या पध्दतीने
दक्षे, आज तुझ्या पध्दतीने वरणाला वरून फोडणी घालून ही आमटी केली. मस्त झाली होती.
फोडणीचे वरण जरा दाट्सर असते.
फोडणीचे वरण जरा दाट्सर असते. आमटी जरा जास्त पात्तळ असते.
आमच्याकडे ही याला गोड आंबट
आमच्याकडे ही याला गोड आंबट वरण म्ह्णतात.
बाकी फोटो छान.!
मच्या नाशिककडे 'आम्बट वरण'
मच्या नाशिककडे 'आम्बट वरण' म्हणतात. एक पुणेरी वहीनी जि आता नाशिककर आहे , तिला जाम पिड्तो आम्ही 'फोड्णीच्या वरणाला' 'आमटी' म्हणण्यावरुन.
आमच्या कडे 'आमटी' म्हणजे डाळ-दाण्याची, शेवेची, गोळ्याची, पातोड्याची (वाट्ण घातलेली)... आणी हे म्हणजे फोड्णीच्या वरण .. >>>>
अगदी अगदी!! डाळीचे जे बनते ते वरणच!
दक्षिणा, माझ्या आवडत्या वरणांपैकी हे एक! मस्तयं आमसूल गुळाचे पण तितकेच आवडते!
चिंच गुळाचे वरणा सोबत बाजरीची शिळी भाकरी असेल तर एक नंबर!!!
मला आमसुला ऐवजी कधीही चिंच
मला आमसुला ऐवजी कधीही चिंच जास्त आवडते.
रश्मे - माझ्याकडे ये खायला.
साती - प्रमाण लिहिण्याची गरज मला वाटली नाही, कारण आमटी ही अत्यंत साधारण आणि नेहमीची पाकृ आहे, तुम्ही कितीही होतकरू स्वयंपाकी असलात तरीही पेलाभर चिंच आमटीत घातली तर काय होईल याची कल्पना नक्कीच करू शकता.
शेवटी काय आहे तर कुणाला आंबट कमी लागते तर कुणाला गोड कमी लागते, कुणाला अधिक तिखट तर कुणाला घट्ट. मला चिंच आणि गुळ दोन्ही समान (रादर चिंचेच्या दुप्पट गुळ) लागतो आणि तिखट पण बर्यापैकी.
त्या चहाच्या रेसिपीवर पाहिलेस ना मला साखरेवरून किती लेक्चर बसले आहे? म्हणूनच प्रमाण नाही लिहिले
अर्धी वाटि तुरीच्या डाळिला
अर्धी वाटि तुरीच्या डाळिला दोन पेर चिन्च कोळुन पुरेशी होइल...मि फोडणित चिन्च घाल्ते तेव्हा साधारण एवढ प्रमाण घेते. एक टेबलस्पुन गुळ पुरेसा होतो पण ते सापेक्ष आहे.
लेक्चर बसले?? विषयांतराबद्दल
लेक्चर बसले??
विषयांतराबद्दल क्षमस्व 
आमच्या कडे ही आणि अशीच आमटी
आमच्या कडे ही आणि अशीच आमटी करतात. तूर डाळ कुकरला लावायची. डाळीत हळद आणि थोडस तेल घालून. फोडणीला मात्र कांदा ,मिरच्या ,कोथींबीर असतेच वरून वरण घालायचं.आणि मीठ , गोड मसाला , चिंचेचा कोळ आणि गूळ की झाली आमटी तयार . मस्तच दक्षे
Pages