Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आतातर तिसरा धागाही आला तरीही
आतातर तिसरा धागाही आला तरीही गरीब बिचा-या प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे काय मिळाली न्याऽऽऽऽय.
आणी नाईकां च्या वाड्यासमोरुन
आणी नाईकां च्या वाड्यासमोरुन कोंबडी पळणे थांबले नाssssssय.
अरे व्वा! नवो धागो इलो पण.
अरे व्वा! नवो धागो इलो पण.
चार महिन्यात तीन धागे.
बंद नाही झाली पटकन तर रेकॉर्ड
बंद नाही झाली पटकन तर रेकॉर्ड करेल शिरेल धाग्यांचे
काल बर्याच दिसानी आमच्या
काल बर्याच दिसानी आमच्या ज्येष्ठ नागरिक टोळक्याक भेटूंक गेलंय. त्येतलो मालवणी मित्र उठून धांवतच इलो माझ्या स्वागताक. सगळां टोळक्यां देखील कधीं नाय तां मोठ्या कौतुकान बघताहा माझ्याकडे, दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात जणूं मीं मेरीटमधे इल्यासारखो. माकां शेजारीं बसवून मालवणी मित्रान मग मोठ्यान मालवणीतच गजाली सुरूं केले, जां मीं बिगर-मालवणी ग्रूपमधी टाळतंय. पण तो मित्र माकां मालवणीतच बोलूक भाग पाडताहा आणि बाकिच्ये कौतुकान ऐकतहत.
मग कळलां. ' रात्रीस खेळ..'वर त्येंची चर्चा चललेली आठवडोभर. माझ्या मालवणी मित्रान त्येंकां सांगलेलां " तां कसलां रद्दड मालवणी; भाऊ इलो कीं तुमकां ऐकवतंय अस्सल मालवणी " !
ही सिरीयल कायव धुडगूस घालीना पण मालवणी बोलीची चटक मात्र हीच्यामुळे लोकांक लागलीहा, ह्यां नक्की ! >>>>>>>> भाऊ हे मात्र भारी असां हां!:स्मित: मला मालवणी माहीत होती ती मामाच्या शेजार्यांमुळे. पुण्यात असले तरी काका नाही पण काकु मात्र मालवणीतच बोलुन पोरांना रागवायच्या. काकूंचे माहेर मालवणातलेच त्यामुळे घरात मालवणी भाषा आणी पदार्थांची रेलचेल होती. मराठा असले तरी कोकणातले त्यामुळे नॉनव्हेज पदार्थ मालवणी चवीचेच. मी नॉनव्हेज खात नसल्याने त्यांनी एकदा काळ्या वाटाण्याची उसळ आणुन दिली होती, पाट्या वरच्या वाटणामुळे काय जबरी टेस्ट होती, ती कधीच विसरले नाही.
नंतर मालवणी ऐकली ती स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी आणी राजा मयेकर यांच्या नाटका-सिरीयलीतुन. तुफान दिवस होते ते. आमच्या शेजार्यांनी आम्हाला एका नाटकाची कॅसेट ( माझ्या लहानपणी कॅसेटच, सिडी नव्हतीच) ऐकवली. ते नाटक होते राजा मयेकर आणी शाहीर साबळे यांचे नशीब फुटके सांधुन घ्या. हसुन आडवे व्हायची वेळ आणली होती या दोघांनी. राजा मयेकरांचे अस्सल मालवणी अतीशय हसवुन जाते. नंतर ऐकले ते कांबळींच्या तोंडी. पांडगो इलो रे बा इलो यात जनादर्न परब ( फार गुणी अभिनेते, गेले बिचारे ) आणी कांबळी यांनी धुमाकुळ घातला होता.
मग २००९ ला आली माझी फेवरीट सिरीयल मालवणी डेज. फार म्हणजे फारच आवडली मला ही सिरीयल. वैभव मांगले, भाऊ कदम, दिगंबर नाईक, रमेश वाणी आणी कुशल बद्रिके यांनी नुसता कहर केलाय या सिरीयल मध्ये.
चला आता राखेचा कडे वळु, नायतर वाचक माका हाणतीला.:फिदी:
अरे वा! नवीन धागा !! आज मला
अरे वा! नवीन धागा !!
आज मला ते पदराला आग लागने, अण्णा दिसणे वगैरे प्रकार पाहून, हिप्नोटिझम ची शंका आली. आमच्या सोसायटित एक जादूगर राहतात त्यानी हे सांगितले होते को मास होप्नोटिझम ने सगळ्या जमावाला एकच भास होतो.
तसंच काहिस असेल का हे ?
मास होप्नोटिझम ने सगळ्या
मास होप्नोटिझम ने सगळ्या जमावाला एकच भास होतो.
तसंच काहिस असेल का हे>>> असे असु शकेल प्रज्ञा, कारण मग अख्खी रेल्वेच गायब करण्यासारखे प्रयोग जे जादुगार रघुवीर करतात, ते खोटे कसे असेल.:अओ:
ठोकळ्योबायचे सारखे इनफ माधव ऐकुन तिला म्हणावेसे वाटले की आता तूच इनफ झालीस आमच्यासाठी.:फिदी: काय तो एकसुरी अभिनय, तिच्यापेक्षा दत्ती परवडली. ठोकळ्याचा अभिनय पण सुधरत चाललाय.
मास हिप्नोटिझमचा शिकार माझ्या
मास हिप्नोटिझमचा शिकार माझ्या सासुबाई आणि त्यांच्याबरोबरचा ग्रुप झालेला आहे. माझा नवरा आणि नणंद लहान असताना दिल्ली आग्रा पहायला गेल्या होत्या त्यांना घेउन तिथे ताजमहालाजवळ त्यांच्या अख्ख्या ग्रुपचे पैसे चोरीला गेले होते आणि कोणालाही काही कळल नाही.
जमावाला एकच भास होतो की नाही ते माहित नाही, पण असे प्रकार होतात अस ऐकल आहे.
नाईकांच्या घरातले पायाच्ये
नाईकांच्या घरातले पायाच्ये उलटे- सुलटे ठसे आतां जागतिक बाजारात 'नाईकां'च्या नांवांनच मोठ्या किंमतीत इकले जातहत !! -
ठोकळ्योबायचे सारखे इनफ माधव
ठोकळ्योबायचे सारखे इनफ माधव ऐकुन तिला म्हणावेसे वाटले की आता तूच इनफ झालीस आमच्यासाठी.फिदीफिदी>>>:हहगलो:
भाऊ काल ते देवळीच्या जवळ जे
भाऊ काल ते देवळीच्या जवळ जे काही होते ती पूजा नसुन काहीतरी पुरलेले वाटत होते. चिंगचा बाहुला तर नसेल ना तो? चिंग त्या बाहुल्याला घराजवळ लटकवुन काहीतरी पूजा करत असते, बहुतेक ते तिच्यावर उलटु पहात असेल. म्हणून तिने देवळीजवळ येऊन पुरले असेल.
अण्णा काय पण का बोलत नाहीत माईंशी? का नुसतेच नजरेचा धाक दाखवतास माईक? म्हणून माईंची साडी पेटली असेल?
रश्मी हि कोठून शोधून काढलीस,
रश्मी हि कोठून शोधून काढलीस, भारी आहे.
अंजू हे खालच्या साईटवरुन
अंजू हे खालच्या साईटवरुन ढापलेत. मागे मनालीने लिंक दिली होती. लई भारी आहेत.
http://www.sherv.net/bird-emoticons.html
क्लिने मागे दिलेली, बरोबर.
क्लिने मागे दिलेली, बरोबर. हेडरमधे टाकून ठेव रश्मी. पटकन मिळेल मग.
डी ३ सुरु होण्याची सध्या काही चिन्ह दिसत नाहीयेत.
<< म्हणून माईंची साडी पेटली
<< म्हणून माईंची साडी पेटली असेल? >> मागे एकदां नाईकांची सगळी माडीच पेटलेली दाखवल्यानी. दुसर्या दिवशी माडी जशीच्या तशी. मग अख्ख्या सुसल्याक जाळतान दाखवल्यानी; दुसर्या दिवशी सुसल्या जशाच्या तसां ! काल साडी पेटलेली दाखवल्यानी; आतां गाडी, वाडी, झाडी कायव पेटवतीत पण काळजीचां कारण नाय. नाईकांक पाण्यापासून भय आसा, तसां आगीपासून अभय असतलां !!!
नाईकांक पाण्यापासून भय आसा,
नाईकांक पाण्यापासून भय आसा, तसां आगीपासून अभय असतलां !!! >>
नाईकांक पाण्यापासून भय आसा,
नाईकांक पाण्यापासून भय आसा, तसां आगीपासून अभय असतलां, सही भाऊकाका .
भाऊ
भाऊ
नाईकांच्या घरातले पायाच्ये
नाईकांच्या घरातले पायाच्ये उलटे- सुलटे ठसे आतां जागतिक बाजारात 'नाईकां'च्या नांवांनच मोठ्या किंमतीत इकले जातहत !! >>>>>>:हहगलो:
कसे आहात मंडळी?
कसे आहात मंडळी?
हॅलो ! सावंतवाडी फायर
हॅलो ! सावंतवाडी फायर स्टेशनहून बोलताहास ? काय ? ह्या नंबरावरूनच फोन होतो,
'नाईकांच्या घराकडे ताबडतोब बंब पाठवा' म्हणान ?
भाऊकाका, बंब बाहेरच ठेवायला
भाऊकाका, बंब बाहेरच ठेवायला सांगा. दर काही दिवसांनी आग लागत असते व्यंगचित्र छानच.
भाऊकाका . भगवती करेक्ट.
भाऊकाका .
भगवती करेक्ट.
काल बायलेशी झालां भांडण . मग
काल बायलेशी झालां भांडण . मग रातीक तिच्या अंगांत एलिझाबेथ टेलर इली ! माकां घेतल्याशिवाय जावचंय नाय म्हणाली ! तिचो नववो घो होवचो चान्स आसा आतां माकां !!
'रात्रीस खेळ..'मुळे भांडण झालां कीं माझी बोळवण करूंक असले एकेक आयडीया बायलेक बरे सुचतत !!
(No subject)
भाऊ कालचा भाग पाहुन खात्री
भाऊ
कालचा भाग पाहुन खात्री पटली की भानामतीचे ( खड्ड्यात नारळाचे मुंडके पुरल्याचे ) प्रकार गुरव करताहां. आणी या बावळटांच्या हाती मोबाईल असुनही यांनी ठोकळीचे अंगात येण्याचे शुटिंग केले नाही. केले असते तर हा तिला दाखवुन तिचे तोंड बंद करता आले असते. पण एवढे यांना सुचले तर सिरीयली पुढे कशी चालेल?
बाकी ठोकळी घुमते भारी हां.
बाकी ठोकळी घुमते भारी हां. काल प्रोमोजमध्ये पाहिल.
नाईकांच्या घरातले पायाच्ये
नाईकांच्या घरातले पायाच्ये उलटे- सुलटे ठसे आतां जागतिक बाजारात 'नाईकां'च्या नांवांनच मोठ्या किंमतीत इकले जातहत !!>>>>>>>>>>हे हे हे.......
निलीमाच्या अंगात आधी शेवंता
निलीमाच्या अंगात आधी शेवंता आलेली ती भारी अॅक्टींग होती. कालची एवढी शेवंता स्टाईल नाही वाटली.
भानामतीचे ( खड्ड्यात नारळाचे
भानामतीचे ( खड्ड्यात नारळाचे मुंडके पुरल्याचे ) प्रकार गुरव करताहां>>>>>
असं वाटतंय की सिरीयल च्या शेवटी उलगडा करणार की हे सग्गळं सग्ग्ळं द्स्तुरखुद्द ठोकळीच करत होती, इतर सर्वांना पटवून द्यायला की हे सगळं खोटं आहे, मनाचे भास आहेत आणि असं काही नसतं !
Pages