पेपर क्विलिंग बद्दल बरिच उत्सुकता होती. सहप्रवासी, ऑफिसमधल्या मैत्रिणी पेपर क्विलिंगचे दागिने घालीत तेव्हा तर पेपर क्विलिंग शिकायची फारच ओढ लागली.
मागचा आठवडा सुटी घेतली. काही घरगुती कामांमुळे माझा घरी बसून बैठा सत्याग्रह होता. सर्वात प्रथम पेपर क्विलिंगचे सामान आणले.... रंगीत पट्ट्या आणि सुई. मग गुगलून पाहिले, यु-ट्युबवर शिकवणी घेतली.
पहीला धडा गिरवला...
मग लक्षात आले, अजुन काही गोष्टी हव्यात. शाळेत वापरले ते प्रो-सर्कल, मणी, कड्या, हूक.....
सगळे आणले. तोपर्यंत दहावीचा निकाल लागला. दोन विद्यार्थिनिंचे कौतुक करताना हे दिले..
जरा जमते आहे असे वाटल्यावर---- प्रयत्न कि प्रयोग??
पुन्हा खुमखुमी.. पुन्हा गुगल... पुन्हा यु-ट्युब.... पुन्हा नविन प्रयत्न....
अजुन बरेच काही शिकायचे आहे. रोज थोडा वेळ देईन म्हणते. ज्या दिवशी झुमका.. लटकन... छत्री... भोकरं ... अशा प्रकारचे कानातले करता येतील तो दिवस माझा. तो पर्यंत ईतकेच..
छान जमलय
छान जमलय
छानच जमलंय
छानच जमलंय
मस्त आहे.
मस्त आहे.
छानचं जमलयं नक्की वेगवेगळे
छानचं जमलयं

नक्की वेगवेगळे प्रयोग करत राहा.. एकदा हात बसला कि सार काही सुरळीत होत.. ऑनलाईन साईटस वर भरपूर सामान मिळेल क्विलींगचे.. प्रो सर्कल मीपन ट्राय केला होता पन करताना त्रास होतो.. आणि प्रत्येकाचा सरकंफरंस वेगळा असल्याने कधीकधी इकडलं तिकडं झाल कि माप चुकतात..
कानातले खरचं छान केले आहेत..
स्वतं बनवलेली वस्तु भेट देण्यात एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते.. पोरी खुष झाल्या असतिल ना
मस्त!
मस्त!
अप्रतिम, प्रयत्नांना आणि
अप्रतिम,
प्रयत्नांना आणि चिकाटीला पुन्हा एकदा सलाम ………… !!!!
या दिवशी झुमका.. लटकन... छत्री... भोकरं ... अशा प्रकारचे कानातले करता येतील तो दिवस माझा.>>>>>>>>> ज्या दिवशी तुमची कला भेट म्हणून माझ्या हातात पडेल तो दिवस माझा .
कलेच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ……. ……
छान आहेत. माझ्या आईने छोटे
छान आहेत.
माझ्या आईने छोटे फ्लॉवर पॉट बनवले आहे. नंतर फोटो टाकेन त्यांचा.
पेपर क्विलिंग - एक चांगला
पेपर क्विलिंग - एक चांगला प्रयत्न!
सुंदर जमलेत. डीझाईन्स पण
सुंदर जमलेत. डीझाईन्स पण वेगळीच आहेत. सातत्य ठेवा. हातात सफाई येत जाईल.
छानच.
छानच.
सगळ्यांना धन्यवाद. >> सातत्य
सगळ्यांना धन्यवाद.
>> सातत्य ठेवा. हातात सफाई येत जाईल., दा नक्कीच प्रयत्न चालू आहेत.
ईथे मिळणारे प्रोत्साहन खुपच मोलाचे आहे.
वॉव.. हा पहिला प्रयत्न आहे??
वॉव.. हा पहिला प्रयत्न आहे?? किती सुंदर आहेत सर्व ईअरिंग्स.. मस्तं गा!!!!
वाह, सुरेखच ...
वाह, सुरेखच ...
मस्त!
मस्त!
खुप सुंदर.
खुप सुंदर.
खुप सुंदर.
खुप सुंदर.
हे असंलं बघुन बिनकामाची
हे असंलं बघुन बिनकामाची खुमखुमी येते.

क्विलींग पेपर, मणी, बीड्स, सोनेरी चेन्स, सुई, इइ सगळं आहे घरी. डब्यात भरुन ठेवलेत.
काही खुप छान झालेत. रच्याकने
काही खुप छान झालेत.
रच्याकने भोकरं छत्री म्हणजे काय
खूपच छान गं.. पहिला प्रयत्न
खूपच छान गं.. पहिला प्रयत्न वाटतच नाही हा
रच्याकने भोकरं छत्री म्हणजे
रच्याकने भोकरं छत्री म्हणजे काय>>>> ज्याला सध्या झुमका म्हणतात त्यालाच मागच्या पिढित छत्री आणि त्या आधी भोकरं म्हणत.
हे असंलं बघुन बिनकामाची खुमखुमी येते. >>>>सस्मित, अशी खुमखुमी मला नेहमीच येते. काहीना काही चालूच असते.
सगळ्यांचे धन्यवाद.
माझी रिक्षा फिरवू का इथं?
माझी रिक्षा फिरवू का इथं?
मस्तच सगळं. टीना नेकी और पुछ
मस्तच सगळं. टीना नेकी और पुछ पुछ , फिरवं रिक्शा
छान जमलेत
छान जमलेत
मोती लावलेले केशरी कानातले
मोती लावलेले केशरी कानातले फारच आकर्षक दिसत आहेत. बाकीचे पण आवडले.
ओके हे बघा.. क्विलींग
ओके हे बघा..
क्विलींग हेअरक्लीप्स - http://www.maayboli.com/node/50236
क्विलींग आणि बरच काही - http://www.maayboli.com/node/54395
कानी कुंडल - कृतीसह (पाकृ नव्हे) - http://www.maayboli.com/node/56931
मधुरा,

तुला यातुन बर्याच कल्पना सुचतिल आणि गाईडन्स मिळेल अशी आशा करते..
तस मला काही खुप खास जमत नाही पण ठिक ठाक आहे
छानच जमलय... पहिली हेयर क्लीप
छानच जमलय... पहिली हेयर क्लीप आणि शेवटुन दुसरे कानातले जास्त आवडले.
टीना, तुमचे प्रकार छानच. या
टीना, तुमचे प्रकार छानच. या आधीही पाहिले होते.
तस मला काही खुप खास जमत नाही >>> हा तुझा साधेपणा.
सिंडरेला, बर्याच जणांना हे मोती लावलेले केशरी कानातले आवडले
धन्यवाद.