विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण.
आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते.
बर्याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात.
मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते.
(वरील माहीती मी माझ्या मागच्याच राड्याच्या धाग्यावरून पुन्हा इथे टाकत आहे. ) http://www.maayboli.com/node/54663
१) राड्याचे महत्वाचे पात्र आंब्याच्या फांदीवरून नारळाच्या दिशेने.
३) साहेब तरबेज नारळकाढ्णार्या माणसाप्रमाणे वेटोळे घालत वर चढताहेत.
६) राड्यासाठी आलेले हल्लेखोर की सैनीक? जे समजाल ते.
७) ह्या फोटोत पहा मुख्य पात्र नारळात आहे आणि शिपाई/हल्लेखोर त्याच्यावर हल्ला करण्याचा चान्स पहाताहेत.
८) सध्या खालूनच पाहू बाकीचे सैन्य काय करतेय ते.
९) नारळ पाण्याची मजाच काही और.
१०) या हू पाहूया कोण मला पकडतय. इमॅजीका पेक्षा भारी वाटतय राव.
१४) खारूताई मोठ्या धाडसी आहेत. चालल्यात धामणीशी युद्ध करायला.
१५) हिम्मत असेल तर ये बाहेर झावळ्यांखाली काय लपतोस?
१६) साळुंखी बाई सगळ्यात लढवैय्या कर्कश्य आवाज काढत डायरेक्ट वार करतात.
१८) आता काय म्हणाव ह्या खारुटलीला? डायरेक्ट आमने सामने करतेय. आपला जीव काय तो.
१९) साहेबांनी काहितरी बहुतेक गिळल आणि मॉडेलिंगसाठी माझ्या कॅमेर्यासमोर.
२३) माबोकरांना वेडावून दाखवताना फोटो टाक ग माझा.
ह्यावेळी धामण जास्त जखमी न होता पसार झाली.
छान
छान
लय भारी. खारुताई फार गोड, मला
लय भारी.
खारुताई फार गोड, मला आवडते ती.
राडा २०१५ आणि २०१६ तर
राडा २०१५ आणि २०१६ तर अप्रतिम...!!! २३ च्या २३ फोटो पुन्हा पुन्हा पाहिले....खुप खुप कौतुक...निसर्गाच्या इतक्या जवळ....खुप नशिबवान आहात....
मुग्धा, अंजूताई, उषा धन्यवाद.
मुग्धा, अंजूताई, उषा धन्यवाद.
जागू राडा मस्तच ....काय फोटो
जागू राडा मस्तच ....काय फोटो काढले आहेस ग!!! ग्रेट. नक्कीच तुझ्या हातात कॅमेरा बघून हे सगळे शेजारी खास तुलाच पोज द्यायला येत असणार. बाय द वे , हे फोटो टॅरेस वरून काढलेस का? खारुताई चा आमने सामने फोटो मस्तच टिपला आहेस. मजा वाटली बघायला.
हो सामी टेरेसवरून काढलेत
हो सामी टेरेसवरून काढलेत फोटो.
एक नंबर राडा घातलाय वर्णन तर
एक नंबर राडा घातलाय
वर्णन तर एकदम खास.
जबरदस्त राडा! एखाद्या
जबरदस्त राडा!
एखाद्या झाडाखाली उभा असताना वर असा राडा चालू असेल अाणि लांबडा राडेकरु वरुन खाली थेट गळयातच पडला तर...
जागु लैच भारी. लकी यु.
जागु लैच भारी. लकी यु.
सहीच आहे जागु
सहीच आहे जागु
जबरदस्त!
जबरदस्त!
जबरदस्त
जबरदस्त
Pages