नमस्कार
नमस्कार कधी आणि कोणाला करावा?
रोज सकाळ संध्याकाळ देवाला ,त्याच बरोबर घरातील सर्व मोठ्या मंडळीना , एखादे महत्वाचे काम करायला जात असू तर , परिक्षेला जाताना, रिझल्ट आणायला जाताना इत्यादी इत्यादी
अगदी रस्त्यात जात येत असताना दिसणार्या गाईला, हत्तीला. (अगदी आत्ता आत्ता पर्यंत पार्ल्यात हत्ती फिरायचा आणि मी त्याला नमस्कार करायचे.)
चूकून कोणाला पाय लागला तरिही नमस्कार करावा.
ही मला वंश परंपरेने मिळालेली शिकवण मी जशीच्या तशी नीलला pass on केली आणि एके दिवशी मला खूप गमतीशीर अनुभव आला.
एका दुपारी मी आणि नील अग्रवाल मार्केट मध्ये गेलो. बर्या पैकी शांतता होती. मी एका दुकानात खरेदी करत होते. अग्रवाल मार्केट मधे दोन्ही बाजूला दुकान आहेत आणि गिर्हाईक मधे उभे राहून शाॅपिंग करतात.बाजूला लागूनच फिश मार्केट आहे. कुत्र्या मांजरांचा मुक्त संचार चालू असतो.
तर मी खरेदी करत असताना चिरंजीव जवळच पहुडलेल्या कुत्र्याची ख्याली खुशाली विचारण्यात busy होते. मी जवळ गेल्यावर नील ने गुगली टाकली.
नमस्कार कर. माझ्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव. नीलने शांत पणे कुत्र्या कडे बोट दाखवले. मी विचारले का बुवा? नील पुन्हा शांतपणे, तू नाहीका मला रस्त्यातल्या गाईला, हत्तीला नमस्कार करायला लावतेस? तसेच कुत्र्याला.
माझी बोलती बंद. ही जागा आणि वेळ नव्हती समजवून सांगायची. एव्हाना आजूबाजूचे लोक, दुकानदार माझ्या next reaction ची वाट बघत असल्याचे मला जाणवले. नीलचे मन राखण्यासाठी मी कुत्र्याला हात जोडले.
पण पठ्ठ्या म्हणतो कसा, असा नाही वाकून कर. दोन चार दुकानदार फिदीफिदी हसले. नील निरागस पणे उभा होता. मला त्याचा अजिबात राग आला नाही. उलट कौतुक वाटलं. प्रसंग निभावून नेण्यासाठी मी वाकून कुत्र्याला नमस्कार केला. त्या क्षणी लोकांच्या प्रतिक्रीये पेक्षा मला नीलचे समाधान महत्वाचे होते.
नील चा हात धरून मी मार्केट मधून बाहेर पडले. मनात विचार घोळत होता, नीलला साष्टांग नमस्कार शिकवावा कि नाही?
सही..
सही..
नीलचं बोट धरून तुम्ही
नीलचं बोट धरून तुम्ही त्याच्या जगात शिरणं आणि त्याच्या जगाचा मान राखणं फार आवडलं.
तुम्ही नुकतंच आलेलं संदेश कुलकर्णींचं "माँटुकले दिवस' हे पुस्तक वाचलंय का? नसेल तर नक्की वाचा. त्यातही या तुमच्या नीलसारख्याच एका गोड मुलाची गोष्ट आहे. (त्याला माँटू म्हणत असले तरी त्याचंही खरं नाव 'नील'च आहे )
मस्त च ..
मस्त च ..
मस्त..
मस्त..
छान.
छान.
गोड एक्दम !
गोड एक्दम !
किती साधं.......आणि सुंदर!!
किती साधं.......आणि सुंदर!! वा!!
मस्त किस्सा.
मस्त किस्सा.
किती छान!!! नशीब सा.न. आधी
किती छान!!!
नशीब सा.न. आधी शिकवला नव्हतात.
माँटूच आठवला
माँटूच आठवला
मस्त किस्सा !
मस्त किस्सा !
छानचं आमच्याकडे पण मध्यंतरी
छानचं
आमच्याकडे पण मध्यंतरी असचं झाल, मी लेकीला सांगत असते की कधी झाडूला, पुस्तकाला किंवा कुणालाही चुकून पाय लागला तर चटकन नमस्कार करावा. त्या दिवशी मॅडमची शाळेची टिफीन बॅग (रिकामी) खाली पडली होती आणि तिच्या बाबाचा त्याला पाय लागला. झालं, तीने लगेच बाबाला सांगितल, "अरे बाबा तुझा पाय लागला ना त्याला, नमस्कार कर, आईने सांगितल आहे ना सगळ्यांत देव असतो म्हणुन......"
छान !
छान !
धन्यवाद मंडळी. अजून काही
धन्यवाद मंडळी. अजून काही किस्से आहेत. लवकरच लिहीन.
मस्त लिहिलयं एकदम.. मध्यंतरी
मस्त लिहिलयं एकदम..
मध्यंतरी माझी सवय इतकी अॅक्युट झाली होती की पायात नसताना चपलेला पायाचा धक्का लागला तरी हात लावून नमस्कार केलाय मी
खो खो .. हाहाहाहा
खो खो .. हाहाहाहा
हा हा भारी किस्सा
हा हा भारी किस्सा आहे..
तुम्ही वागलातही योग्यच. लहान मुलांबरोबर लहान होण्यातच मजा. आजूबाजुची दुनिया कौतुक करतेय की चिडवतेय हे त्यांच्या त्यांच्या स्वभाव वृत्तीवर सोडून द्यायचे. आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा
छान.
छान.
प्रसंग तर विनोदी आहेच, पण तो
प्रसंग तर विनोदी आहेच, पण तो खुलवून सांगण्याची तुमची हातोटी झकास आहे. लिहित रहा! आम्ही नक्की वाचू.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.