१) गव्हाचे पिठ (न चाळलेले)
२) एक चमचा तेल
३) चिमुटभर मिठ
४) कोमट पाणी
प्रमाणः
दोन सपाट वाट्यामधे ७ ते ८ फुलके होतात.
कणिक भिजवताना पाणी एकदम न ओतता थोडे थोडे ओतावे म्हणजे कणिक पातळ होणार नाही.
१) सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी कोमट करुन घ्या:
२) ह्यानंतर कोपरामधे गव्हाचे पिठ, त्यात थोडे मिठ, आणि अर्धा चमचा तेल घ्या आणि हे सर्व पाणी ओतल्या अगोदरच मिसळून घ्या.
३) पिठ मळवताना, हाताच्या मागिल बोटाचा ज्यावर आपण ३०/३१ चे महिने मोजतो आणि ईंग्रजी भाषेमधे ज्याला knuckles म्हणतात त्यांचा वापर करुन कणिक हाताच्या बोटाना पाणी लावत लावत मळा. खालिल चित्रामधे तुम्हाला knuckles चे ठसे आहे. त्यावरुन एक अंदाज येईल कणिक कशी मळायची.
४) फुलके फुलण्यासाठी कणिक शक्य तेवढ्या वेळ मळायची म्हणजे ती लाटायला मऊ तर होतेच शिवाय फुलके कोरडे होत नाही.
५-अ) लिंबाइतकी पिठाचा गोळा घ्या.
५-ब) हा गोळा पिठात छान घोळवून घ्या. नंतर त्याला लागलेले पिठ काढून टाका. जास्त झालेले पिठ काढण्यासाठी फुलक्याचा गोळा हाती झटकायचा आणि मग त्यावरुन बोटे फिरवली की रवाळ पिठ आपोआप खाली पडते.
६) आता, फुलक्याचा हा गोळा पोळपाटावर ठेवा.
७) आता फुलका काठाकाठाने लाटत जा. हा फुलका कुठेच दुमडणार नाही, मधेच त्याला घडी पडणार नाही, वा फाटणार नाही ह्याची काळजी घ्या. असे दुमडलेले, फाटलेले फुलके फुलत नाही. सहजा कणिक पातळ झाली की असे होते. किंवा पोळपाट ओला असेल तर असे होते. किंवा, तुम्हाला सवय नसेल फुलके लाटायची तर असे होते. पण अनुभवातून ह्या चुका टाळता येतात हे नक्की.
८) आता तापल्या ताव्यावर हा फुलका ठेवा. तवा थोडातरी तापलेला असायचा हवा. आच मध्यम पण मोठी नको.
९) वरची ही बाजू जरा कोरडी झाली की लगेच फुलका उलटून ठेवायचा. हे चित्र किती फुलक किती कोरडा असावा हे दर्शवते आहे. इतका कोरडा पुरे आहे. एक लक्षात ठेवा फुलक्यात moisture रहायलाच हवे नाहीतर तो फुलत नाही. moisture राहू देण्यासाठी पहिली बाजू कमीतकमी वेळ तव्यावर ठेवायची. अगदी ३० सेकंद पुरे आहेत.
१०) आता, दुसरी बाजू तव्यावर शेकायची/भाजायची. तीही अगदी ३० ते ४५ सेकंद. खाली चित्र दिले आहे. ते पहा. दुसरी बाजू इतपत भाजलेली पुरेशी आहे.
११) आता, लगेच हा फुलका हातानी किंवा सवय नसेल तर चिमट्यानी उचलून घ्यावा. पण चिमट्यानी फुलका उचलण्यापुर्वी तो मधेच चिमट्याची धार लागून फाटणार / अडकणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर हातानीच उचलावा. फार गरम नसतो.
आचेवर पहिली बाजू धरावी. जर दुसरी बाजू धरली तर फुलका फुलणार नाही. हे फुलक्याचे तंत्र आहे.
११-अ) हा ११-अ भाग मुद्दाम लिहित आहे. फुलका जर का आचेवर खूप वेळ ठेवला तर मधे तो जळतो. हे पहा. म्हणून फुलका फुलका की क्षणात तो दुरडीत ठेवायचा.
११-ब) जर तुम्हाला आचेवर धरुन फुलका भाजता येत नसेल तर तो तळहाता इतकाच लाटावा आणि थेट तव्यावर भाजावा.
१२) आता, फुलके असे चतकोर दुमडून ठेवावे. त्याला चार बोट तेलाचे लावू शकता.
१३) हे झाले पुर्ण कणकेचे फुलके
अरे वा, खुप सुंदर !!! अगदी
अरे वा, खुप सुंदर !!!
अगदी परफेक्ट जमलेत.
वा सुंदर . कृती ही सुन्दर
वा सुंदर . कृती ही सुन्दर आणि फुलके ही सुंदरच !
काय मस्त केलेत फुलके...
काय मस्त केलेत फुलके...
उत्तम दस्तावैजीकरण (हा शब्द
उत्तम दस्तावैजीकरण (हा शब्द बरोबर लिहिलाय ना?)
मस्तच
मस्तच
दस्ताऐवज हा मुळ शब्द. म्हणून,
दस्ताऐवज हा मुळ शब्द.
म्हणून, दस्ताऐवजीकरण शब्द होईल.
मस्त. स्टेप बाय स्टेप. कठीण
मस्त. स्टेप बाय स्टेप.
कठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही.
छान!
छान!
पाककृती आवडली.. शीर्षकासकट
पाककृती आवडली.. शीर्षकासकट
पर्रर्रफेक्ट रेसिपी!
पर्रर्रफेक्ट रेसिपी!
व्वा ! हर्टबी मान गये
व्वा ! हर्टबी मान गये तुम्हारे फुलकेको !
सॉलिड बनवलेत फुलके. आवडले.
सॉलिड बनवलेत फुलके. आवडले.
Vva ekdam dekhani
Vva ekdam dekhani paakkruti........subak tanch bandhani...!!!
तुम्ही जबरदस्त सुगरण आहात हे
तुम्ही जबरदस्त सुगरण आहात हे परत एकदा नमूद करावेसे वाटते .
.
.
Wow.. खुपच systematically
Wow.. खुपच systematically माहीती मिळाली.. खुप खुप धन्यवाद!
मस्तच आहेत ! परातीतले उचलावेत
मस्तच आहेत !
परातीतले उचलावेत आणि कांदा-बटाटा रस्सा भाजी बरोबर खावेत असं वाटते.
वा, फुलके मस्तच
वा, फुलके मस्तच
चपाती/पोळीची पण क्रमवार कृती
चपाती/पोळीची पण क्रमवार कृती सांगा न
अर्रे वा, बी , सुरेख झालेत
अर्रे वा, बी , सुरेख झालेत फुलके . फोटोतूनही मऊ मऊ पणा जाणवतोय आणी अगदी बारकाव्यांसकट लिहिलीयेस रेसिपी .. खूप छान !!!
सुंदर.
सुंदर.
कृती ही सुन्दर आणि फुलके ही
कृती ही सुन्दर आणि फुलके ही सुंदरच !>>>+१
खरंच तुम्ही सुगरण आहात.
मस्त जमलेत ! आता हे खायचे
मस्त जमलेत !
आता हे खायचे कश्याबरोबर ते ही येऊ द्या
मस्तच...
मस्तच...
सर्वांचे खूप खूप आभार. मी
सर्वांचे खूप खूप आभार. मी ग्रेटफुल आहे
मी आदी - हो घडीची पोळी साधी पोळी वगैरेची पाककृती लिहितो.
मस्तच लिहीलिये कृती.........
मस्तच लिहीलिये कृती.........
छान
छान
खूप छान लिहीली आहे कृती.
खूप छान लिहीली आहे कृती. नवशिक्यांना नक्की कामी येईल.
बी, खूप सुंदर करता तुम्ही
बी, खूप सुंदर करता तुम्ही फुलके !
मस्त. स्टेप बाय स्टेप. कठीण
मस्त. स्टेप बाय स्टेप.
कठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही.>>+१
अश्या बेसिक पाकृृचीच जास्त गरज असते.
Pages