नवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या.

Submitted by हर्ट on 30 May, 2016 - 08:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) गव्हाचे पिठ (न चाळलेले)
२) एक चमचा तेल
३) चिमुटभर मिठ
४) कोमट पाणी

प्रमाणः
दोन सपाट वाट्यामधे ७ ते ८ फुलके होतात.
कणिक भिजवताना पाणी एकदम न ओतता थोडे थोडे ओतावे म्हणजे कणिक पातळ होणार नाही.

क्रमवार पाककृती: 

१) सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी कोमट करुन घ्या:

२) ह्यानंतर कोपरामधे गव्हाचे पिठ, त्यात थोडे मिठ, आणि अर्धा चमचा तेल घ्या आणि हे सर्व पाणी ओतल्या अगोदरच मिसळून घ्या.

३) पिठ मळवताना, हाताच्या मागिल बोटाचा ज्यावर आपण ३०/३१ चे महिने मोजतो आणि ईंग्रजी भाषेमधे ज्याला knuckles म्हणतात त्यांचा वापर करुन कणिक हाताच्या बोटाना पाणी लावत लावत मळा. खालिल चित्रामधे तुम्हाला knuckles चे ठसे आहे. त्यावरुन एक अंदाज येईल कणिक कशी मळायची.

४) फुलके फुलण्यासाठी कणिक शक्य तेवढ्या वेळ मळायची म्हणजे ती लाटायला मऊ तर होतेच शिवाय फुलके कोरडे होत नाही.

५-अ) लिंबाइतकी पिठाचा गोळा घ्या.

५-ब) हा गोळा पिठात छान घोळवून घ्या. नंतर त्याला लागलेले पिठ काढून टाका. जास्त झालेले पिठ काढण्यासाठी फुलक्याचा गोळा हाती झटकायचा आणि मग त्यावरुन बोटे फिरवली की रवाळ पिठ आपोआप खाली पडते.

६) आता, फुलक्याचा हा गोळा पोळपाटावर ठेवा.

७) आता फुलका काठाकाठाने लाटत जा. हा फुलका कुठेच दुमडणार नाही, मधेच त्याला घडी पडणार नाही, वा फाटणार नाही ह्याची काळजी घ्या. असे दुमडलेले, फाटलेले फुलके फुलत नाही. सहजा कणिक पातळ झाली की असे होते. किंवा पोळपाट ओला असेल तर असे होते. किंवा, तुम्हाला सवय नसेल फुलके लाटायची तर असे होते. पण अनुभवातून ह्या चुका टाळता येतात हे नक्की.

८) आता तापल्या ताव्यावर हा फुलका ठेवा. तवा थोडातरी तापलेला असायचा हवा. आच मध्यम पण मोठी नको.

९) वरची ही बाजू जरा कोरडी झाली की लगेच फुलका उलटून ठेवायचा. हे चित्र किती फुलक किती कोरडा असावा हे दर्शवते आहे. इतका कोरडा पुरे आहे. एक लक्षात ठेवा फुलक्यात moisture रहायलाच हवे नाहीतर तो फुलत नाही. moisture राहू देण्यासाठी पहिली बाजू कमीतकमी वेळ तव्यावर ठेवायची. अगदी ३० सेकंद पुरे आहेत.

१०) आता, दुसरी बाजू तव्यावर शेकायची/भाजायची. तीही अगदी ३० ते ४५ सेकंद. खाली चित्र दिले आहे. ते पहा. दुसरी बाजू इतपत भाजलेली पुरेशी आहे.

११) आता, लगेच हा फुलका हातानी किंवा सवय नसेल तर चिमट्यानी उचलून घ्यावा. पण चिमट्यानी फुलका उचलण्यापुर्वी तो मधेच चिमट्याची धार लागून फाटणार / अडकणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर हातानीच उचलावा. फार गरम नसतो.

आचेवर पहिली बाजू धरावी. जर दुसरी बाजू धरली तर फुलका फुलणार नाही. हे फुलक्याचे तंत्र आहे.

११-अ) हा ११-अ भाग मुद्दाम लिहित आहे. फुलका जर का आचेवर खूप वेळ ठेवला तर मधे तो जळतो. हे पहा. म्हणून फुलका फुलका की क्षणात तो दुरडीत ठेवायचा.

११-ब) जर तुम्हाला आचेवर धरुन फुलका भाजता येत नसेल तर तो तळहाता इतकाच लाटावा आणि थेट तव्यावर भाजावा.

१२) आता, फुलके असे चतकोर दुमडून ठेवावे. त्याला चार बोट तेलाचे लावू शकता.

१३) हे झाले पुर्ण कणकेचे फुलके

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. स्टेप बाय स्टेप.
कठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही.

छान!

Vva ekdam dekhani paakkruti........subak tanch bandhani...!!!

.

Wow.. खुपच systematically माहीती मिळाली.. खुप खुप धन्यवाद!

अर्रे वा, बी , सुरेख झालेत फुलके . फोटोतूनही मऊ मऊ पणा जाणवतोय आणी अगदी बारकाव्यांसकट लिहिलीयेस रेसिपी .. खूप छान !!!

सर्वांचे खूप खूप आभार. मी ग्रेटफुल आहे Happy

मी आदी - हो घडीची पोळी साधी पोळी वगैरेची पाककृती लिहितो.

मस्त. स्टेप बाय स्टेप.
कठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही.>>+१
अश्या बेसिक पाकृृचीच जास्त गरज असते.

Pages