मिस्टरांचा वाढदिवस म्ह्णून गुलाबजाम केलेले. एकुलतं एक गीट्सच पाकिट खास या दिवसासाठी राखून ठेवलेलं.
दुसर्या दिवशी मी त्यांच्या सहकार्यांसाठी गुलाबजाम घेऊन गेले. तर तिथे एका अरेबिक सहकार्याने केक आणला होता. एरवी "indian food,indian food" म्हणून टोळधाड टाकणारे आज त्या अरेबिक केक च्या पण मागे होते. मला खूप जणांनी- 'खाउन बघ तुमच्या गुलाब जाम सारखचं लागतयं' असं सांगितला. तर खरचं थोड्फार चवीला तसाच लागत होता तो केक! मग काय? तसही इथे खवा किंवा गुलाबजामचे जिन्नस मिळत नाहीतच. मग हे आवडतयं का करून बघु म्ह्णलं.
Google केलं तेव्हा याचे बरेच प्रकार सापड्ले. हा केक रव्यापासून बनवतात. हे एक पारंपारीक middle eastern dessert आहे. इजिप्त मध्ये याला बास्बोसा (Basbousa) तर टर्की मध्ये रेवणी असं म्ह्णतात. हेरीसा, नामोरा इ. अशी नामावली आहे.
लागणारा वेळ:
साधारण २ तास
लागणारे जिन्नस:
साखरेचा पाक:
१ १/२ वाट्या साखर
२ वाट्या पाणी
१ मोठा चमचा लिंबाचा रस
गुलाब पाणी/ व्हॅनिला इसेन्स
केकसाठी:
३ वाट्या रवा
१ वाटी डेसिकेटेड कोकोनट
१/२ वाटी साखर
१ चमचा बेकिंग पावडर
१०० ग्रॅम बटर
१ वाटी दूध
८/१०बदाम (सोललेले)
क्रमवार पाककृती:
१. एका भांड्यात साखरेचा पाक करायला घ्या. त्यासाठी साखर आणि पाणी एकत्र करून गरम करण्यास ठेवा. साधारण एक उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी/ व्हॅनिला इसेन्स टाका. अजुन २ मिनीटांनी गॅस बंद करा.
२. दुसरीकडे एका भांड्यात रवा, डेसिकेटेड कोकोनट, साखर आणि बेकिंग पावडर घ्या. एकत्र करा.
३. त्यात बटर (वितळवून) आणि १ वाटी पाक घाला व नीट मिक्स करून घ्या.
४. त्यात कोमट दूध घालून सर्व एकजीव करून घ्या.(DO NOT OVERMIX).
५. नंतर केकच्या भांड्याला आतून बटर लाऊन घ्या व त्यात केक चे मिश्रण एकसारखे पसरा. त्यावर क्लिंग रॅप लाऊन ते १ तासासाठी फ्रिज मध्ये ठेवा.
६. बेकिंग करायच्या आधी हे मिश्रण २० मिनीटे बाहेर काढून ठेवा.
७. ओव्हन १८० से. ला प्रिहिट करा. केक आवडेल त्या आकारात कापा (मी डायमंड शेप ठेवलाय). त्यावर आवडेल अशी सोललेल्या बदामांची डिझाईन करा.
८. २०-२२ मिनीटे ओव्हन मध्ये बेक करा. मी नंतर ५ मिनीटे broil मोडवर ठेवला, मस्त ब्राऊन क्रस्ट येते वर.
९. ओव्हन मधून बाहेर काढल्यावर लगेच त्यावर थंड पाक घाला आवडेल तेवढा.
वाढणी/प्रमाण:
आवडेल तितका..
अधिक टिपा:
१. हा केक रेग्युलर केक इतका फुगत नाही.
२. रवा कुठलाही चालेल.
३. मूळ रेसिपी मधे साखरेचे प्रमाण खूप आहे, मी इथे कमी केले आहे. तसेच शेवटी पाक सुद्धा किती घालायचा ते प्रत्येकाच्या आवडीनुसार... केक मधून गळेल इतका पाक असतो पण - केक maximum absorb करेल इतकाच मी घातला आहे.
४. सर्व साहित्य मिक्स केल्यवर हे मिश्रण रेग्युलर केक सारखे पातळ होत नाही... हाताने थापता येईल असे असते.
५. फ्लेवर मध्ये ऑरेंज वॉटर/ झेस्ट किंवा लेमन झेस्ट वापरू शकता ...केक खाता-खाता इथे लिहीतीय त्यामुळे idea सुचली.
माहितीचा स्रोत:
फेसबूक (बदल करून)
छान
छान
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्त दिसतोय हा केक.
मस्त दिसतोय हा केक. कोणीतरी अरेबिक गोड पदार्थांचे फोटो कधीकाळी फॉरवर्ड केलेले त्यात असा एक पदार्थ पाहिल्याचे आठवतेय.
मस्त, गल्फ मधे खुप लोकप्रिय
मस्त, गल्फ मधे खुप लोकप्रिय आहे हा प्रकार.. आणि अगदी परफेक्ट जमलाय.
मस्त दिसतोय. माझ्या ऑफिसमधली
मस्त दिसतोय. माझ्या ऑफिसमधली एक ओमानी सहकारी बस्बुसा भन्नाट बनवते.
आता लवकरच रमदान सुरु होईल, त्या आधी बहुतेक तिने बनवलेला बस्बुसा चाखायला मिळायची शक्यता आहे
रेसिपी वाचुन क्लोज टुआपला
रेसिपी वाचुन क्लोज टुआपला रव्याचा केक वाटतोय!
सुंदर दिसतोय तयार केक.
सुंदर दिसतोय तयार केक.
मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय केक
वा! मस्त दिसतोय केक!!
वा! मस्त दिसतोय केक!!
मस्त दिसतोय!
मस्त दिसतोय!
छान दिसत आहे. ब्रॉइल करून छान
छान दिसत आहे. ब्रॉइल करून छान कॅरॅमलाइज् झाला आहे.
मला आपल्याकडे बिन अंड्याचा रव्याचा केक करतात तो अजिबात आवडत नाही. पण रोज वॉटर चा फ्लेवर किंवा लेमन झेस्ट छान लागेल असं वाटत आहे.
निसर्गा, या रेसिपीच्या
निसर्गा, या रेसिपीच्या संदर्भात तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं आहे. कृपया चेक करून उत्तर पाठवावे ही विनंती.
मस्त दिसतोय केक.
मस्त दिसतोय केक.
सुंदर !!
सुंदर !!
अरे..मस्त दिसतोय हा केक
अरे..मस्त दिसतोय हा केक
अर्रे व्वा.. किती परफेक्ट
अर्रे व्वा.. किती परफेक्ट जमलीये केक.. क्रस्ट ला एकदम टेंप्टिंग कलर आलाय!!मी पण हा प्रकार खाल्लाय..
छान आहे रेसिपी.. तेच इन्ग्रेडिएंट्स.. पण किती वेगळा प्रकार.. मस्तं..
केकच नाव इजिप्शियन आणला
केकच नाव इजिप्शियन आणला अरेबिक सकार्याने,तो पण इसराइल मधे,लेखिका भारतीय... कसली कॉस्मो रेसिपी आहे...
आम्ही भारतात करुन पाहू नक्की..
मस्त !
मस्त !
आभारी आहे... करून बघा...
आभारी आहे...
करून बघा... झटपट होतो आणि चविलाही मस्त...
खूप छान ! पारंपारिअक
खूप छान !
पारंपारिअक रव्याच्या केकसारखा आहे. थोडा फरक.
इथे माझी रेसिपी पहा ...
http://www.maayboli.com/node/2663
वर लिहिल्याप्रमाणे आज घरगुती
वर लिहिल्याप्रमाणे आज घरगुती बस्बुसा खायला मिळाला ऑफिस मधे:-
तुमची ही रेसिपी या
तुमची ही रेसिपी या महिन्याच्या तनिष्का मधे आली आहे पान क्र. ३० वर.
अभिनंदन!
बायडीस आवडली आहे रेसिपी, पुढच्या आठवड्यात करुन बघतो.
सुंदर.
सुंदर.
कालच केला हा केक. छान झाला
कालच केला हा केक. छान झाला होता. सगळ्या फ्रेंड्स ना आवाड्ला.
धन्यवाद
धन्यवाद