मना तुझे मनोगत - १ - http://www.maayboli.com/node/54052
मना तुझे मनोगत - २ - http://www.maayboli.com/node/54066
मना तुझे मनोगत - ३ - http://www.maayboli.com/node/56019
आधीच्या भागांनंतर परत एकदा मोठी गॅप झाली त्यामुळे आधीच्या भागांची लिंक देतो आहे.
फारसे प्रतिसाद न आल्यामुळे वाचकांना कथा आवडत नाहीये असं वाटतय.. काही सुधारणा हवी असेल तर प्लीज सांगा.
********************************************************************************************************
"आयला मग?"
"तो पोलीस नव्हताच रे. तिथलाच लोकल होता कोणीतरी. पण त्याच्याशी तिथे भांडण करण शक्य नव्हतं."
"तुला कसं कळालं?"
"बॅज नव्हता, पायात साध्या चपला घातल्या होत्या आणि मामा वेगळा कळतो रे.. त्यानी सुरुवातीलाच एकदम आवाज चढवला म्हणून आधी गडबडलो मी. मग जरा प्रकार ध्यानात आला. सरळ खिशातले ५० रुपये त्याच्या हातावर ठेवले आणि सॉरी म्हणालो."
"५० रुपये फक्त?"
"माझ्याकडे तेवढेच होते....तसे अबोली कडे असतात दोन चारशे नेहमी पण नशिबानी तिची पर्स अॅक्टीव्हा च्या डीकि मधे होती."
"आणि ते घेऊन तो गेला?"
"नाही. आम्हीच निघालो. नंतर जाऊन अजुन दोन चार टगे घेऊन आला असता म्हणजे? हल्ली काय काय चालतं वाचतोस ना पेपरात?"
"भेंडी... "
"मग काय.. दोघांचाही मूड गेला रे. अबोली तर रडतच होती अख्खा वेळ येताना."
"हम्म.. मी तुला सांगत होतो तुम्ही ग्रुप मधे सांगा म्हणून. हिंडा कि च्यायला काय ते सगळ्यांबरोबर. सगळे एकत्र असताना हे असले प्रकार होणार नाहीत. आणि तुम्हाला दोन चार दिवस चिडवतील मग नंतर समजून घेतील ना सगळे. आपले पब्लीक सेन्सीबल आहेत रे."
"राहुल्या, येडा झालायस का रे तू? ग्रुप मधे सरळ वाक्य बोललं तरी वाकडा अर्थ काढुन चिडवत बसतात. सगळ्यां बरोबर सतत आलो तर प्रायव्हसी मिळणार नाही कधीच."
योगेशच्या शेवटच्या वाक्यावर राहुलनी भुवया उंचावल्या!
"अरे म्हणजे... तसं नाही. पण प्रायव्हसी लागते रे थोडी. जाऊ दे, तुला नाही कळायचं."
"बरं बाबा. मग आता?"
"त्या दिवशी मी कानाला खडा लावला. म्हटलं हे असं परत झालं तर? आणि झालच तर एकवेळ खरच पोलीसात जाणं परवडलं. पण त्यासाठी घरी फिल्डींग पक्की पाहिजे. म्हणून मग त्याच दिवशी मी घरी अबोली बद्दल सांगितलं."
"काय म्हणाले सगळे?"
"अरे सगळ्यांना म्हणे अंदाज आला होता!"
"काय सांगतोस?"
"अरे हो ना. बाबा म्हणाले ते वाटच बघत होते मी कधी सांगतो ह्याची. आईनी पण आश्चर्य वगैरे वाटल्याचं दाखवलं नाही. आणि मुक्ता म्हणाली तिला अबोली नाही आवडत."
"हा हा हा. मुक्ता असं म्हणाली?"
"लहान आहे रे ती. लक्ष नाही द्यायचं तिच्याकडे."
"मग? झालं एवढ्यात?"
"छे! एवढ्यात कसं होईल? लेक्चर मिळालं ना मोठं. शेवटचं वर्ष आहे. कॉन्सनट्रेशन जाईल, प्रोजेक्ट, नोकरी, सगळं नेहमीचं रे. पण मी बाबांना म्हणालो, कि ते सगळं मी नीट जमवतोय. आणि कॉन्सनट्रेशन नाही जाऊ देणार मी."
"त्यांनी ऐकलं?"
"चक्क ऐकलं! बाबांचीच भीती होती. पण ते शांत होते. ठिके म्हणाले फक्त. पण मला खात्री आहे कि ते आता माझ्यावर जास्त लक्ष ठेवतील. आणि दॅट्स ओके. त्यांचा सपोर्ट आहे हेच खूप आहे माझ्यासाठी."
"ते ५० रुपयांचं प्रकरण पण सांगितलस?"
"छे रे! काहीही काय? त्याच्याबद्दल नाही बोललो. आणि बोलणारही नाही. स्पेशली आई असताना तर कधीच नाही."
"मग आता काय परत 'युनिव्हर्सीटी मधे भेटी' का?"
"हो.. नाहीतर घरी!"
"घरी? कोणाच्या?" राहुलला आपण काय ऐकतोय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.
"कदाचित तिच्याच. तिचे बाबा डॉक्टर आहेत. त्यांचं क्लिनीक असतं संध्याकाळी. आणि तिची आई कोचींग क्लासेस घेते. शेजारच्याच बिल्डींगमधे एक गाळा घेतलाय तिथे. त्यामुळे संध्याकाळी बर्याचदा अबोली घरी एकटीच असते."
"तिची बहिण?"
"ती आत्ताच बारावीला गेली आहे. ती कधी असते, कधी नसते. बर्याचदा तर म्हणे आईच्याच क्लासला जाते. घरी बसली कि टीव्ही बघत बसते म्हणून तिची आई तिला क्लासमधे नेते अभ्यासाला."
"वा! बरय मग तुम्हाला!"
राहुलच्या बोलण्यातला उपरोध योगेशच्या लक्षातही नाही आला कारण तो त्याच्याच विश्वात होता.
*************************************************************************************************************
स्थळ : युनिव्हर्सीटी च्या आवारातला एक बेंच
वेळ : संध्याकाळी ६.००
"काय म्हणाले मग आई बाबा?"
"आईला आवडलास तू. बाबा पण ठिके म्हणाले."
"ठिके??"
"बाबा आहेत ना ते माझे? ते काय असे लगेच इम्प्रेस होणारेत का?"
"म्हणजे अजून काही करायला हवं होतं का मी?"
"काही नाही रे. काल पहिल्यांदाच भेटले ना ते तुला. जरा अजून ओळख होऊदेत तुमची."
"माझी तर जाम फाटली होती."
अबोलीला हसू आवरेना.
"का रे?"
"आता असं मुलीच्या आईबाबांना भेटायचं म्हणजे टेन्शन नाही का येणार?"
"बाकि मुलींच्या घरी तर मस्त गप्पा मरतोस कि त्यांच्या आईबाबांशी. तसच समजायच. टेन्शन काय घ्यायचं त्यात?"
"ते वेगळं आहे. बर्याचदा गेलोय त्यांच्याकडे आधी आणि त्या मुलींशी माझं 'प्रकरण' चालु नाहीये. तू सांग, तुला माझ्या आईबाबांना भेटायचं असेल तर टेन्शन नाही येणार?"
"येईल. पण मी मुलगी आहे. तू मुलगा आहेस."
"त्याचा काय संबंध?"
"मुलीनी मुलाच्या आई बाबांना भेटण्यापेक्षा मुलाला मुलीच्या आईबाबांना भेटणं जास्त सोपं असतं"
"हे काय लॉजिक आहे?"
"हो मग. असच असतं."
"मला तर तुझ्या बाबांपेक्षा आईची जास्त भीती वाटते. बाबांशी जरा गप्पा होऊ शकतील असं वाटलं पण आईचं काही कळत नाही."
"खरच? आई??? असं का?"
"माहिती नाही. पण असं वाटलं."
"तू तर कॉन्फिडन्ट वाटत होतास. आई पण म्हणाली नंतर. तू ज्या प्रकारे आपल्याबद्दल बोललास ते आवडलं तिला."
"म्हणजे?"
"म्हणजे पुढे काय करायचय हे तुझं पक्क आहे हे तिला आवडलं. तुझ्या प्रायोरिटीज क्लीअर आहेत म्हणत होती."
योगेश स्वतःवरच खुश झाला. त्याला वाटत होतं कि अबोलीच्या घरी त्याची इमेज काही फारशी बरी झाली नव्हती. पण अबोली बरोबर उलटं सांगत होती.
"आता तू माझ्या घरी भेटायला कधी येणार आहेस?"
"भेटलिये कि मी तुझ्या आई बाबांना."
"अगं ते सगळ्या ग्रुप बरोबर. मी कसा आलो होतो तुमच्याकडे काल. तशी आता तू पण ये आमच्याकडे."
"हम्म.. येते."
"घाबरु नको. मी पोहे करणार नाही तेव्हा" योगेश हसत म्हणाला.
"म्हणजे काल पोहे चांगले नव्हते झाले?"
"मस्त होते एकदम."
खरतर थोडे कच्चे थोडे करपलेले असे ते पोहे योगेशनी कसेबसे घशाखाली ढकलले होते. पण अबोलीनी एवढ्या हौसेनी केले असल्यामुळे त्याला त्यांना वाईट म्हणायचं नव्हतं.
"कॉफी जास्त छान झाली होती. तुझ्या आईनी केली असेल ना?" योगेश हसत हसत म्हणाला तशी अबोलीनी त्याला जीभ कढुन दाखवली.
"सांग ना, कधी येतेस घरी?"
"येईन लवकरच कधीतरी."
"बरं. बाय द वे, तुमच्या प्रोजेक्टचं ठरलं का सगळ?"
"एकदम प्रोजेक्ट कुठुन काढलास?"
"अगं..काय सांगु आता! आमच्या प्रोजेक्टमधे सद्ध्या नुसते राडे चाललेत. कालच मी आणि विवेक आता पुढे काय करायच त्याबद्दल बोलत होतो. तेव्हा मला तुमच्या पण प्रोजेक्ट्ची आठवण झाली. म्हटलं आज भेटू तेव्हा विचारेन. ठरला का मग तुमचं सगळं?"
"नाही अजून."
"अजून नाही? अगं मागे आपण बोललो त्याला तीन चार आठवडे झाले आता."
"हो. कुहू ठरवणार आहे काहितरी. ती अजून काही बोलली नाहिये. बघू... ठरेल लवकरच."
"अबोली तूच जरा पुढाकार घे कि. तसही एक प्रोजेक्ट लीडर लागतो. आणि लीडर असलं कि एक्स्पोजर जास्त मिळतं सगळीकडे."
"नाही नको. कुहू बघतिये ना."
"अगं पण नंतर जॉब इन्टरव्ह्यू ला पण मग इमेज चांगली होते. ग्रुप डिस्कशनच्या वेळी फायदा होतो त्या अनुभवाचा."
"हम्म... बघू."
"बघू काय म्हणतेस नुसती? हो प्रयत्न करते असं तरी म्हण."
"बरं हो."
योगेशला माहिती होतं कि त्या होकाराला काही अर्थ नाहिये. अबोली काहीही करणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं.
"तू जी आर इ देणार होतीस ना ह्या वर्षी?"
"हो. डेट पण घेतली आहे. २७ डिसेम्बर ची."
"म्हणजे अजून फक्त ४ महिने? आधी कधी म्हणाली नाहिस काही डेट चं? मला वाटत होतं लास्ट सेमिस्टर मधे देणार आहेस."
"नाही म्हणजे, डेट बरीच आधी घेऊन ठवली होती. अजून अभ्यास अॅज सच सुरु नाही केला."
"अगं मग कधी सुरु करणार?. लोक एक एक वर्ष तयारी करत असतात. माझ्या प्रोजेक्ट टीम मधले स्वप्नील आणि धवल तर दिवस रात्र जी आर ई चाच विचार करतात. तो स्वप्नील तर लेक्चरला पण व्हर्बलचा अभ्यास करत असतो."
"करीन रे. होतं सगळं दोन तीन महिन्यात. आणि तू पण जी आर ई देणार होतास ना आधी? मग म्हणालास त्याआधी एक दोन वर्ष नोकरी करतो. मग मी पण तसच करीन."
"म्हणजे तू नक्कि काय करणार आहेस, जी आर ई का नोकरी?"
"बघू...."
"अबोली तुला काहितरी ठरवायला हवं आता. फार वेळ नाहिये तुझ्या हातात. दोन्हीपैकी एक काहितरी ठरवून त्या दिशेनी प्रयत्न नको का करायला?"
"तु आणि आई एक्झॅक्टली सेम कसं बोलता रे?"
"म्हणजे तुझी आई पण तुला हेच सांगत असते?"
"रोज!! कंटाळा आलाय मला आता तेच तेच ऐकायचा." वैतागून अबोलीनी मान दुसरीकडे फिरवली.
पहिल्या प्रमातलं पहिलं भांडण!! आज पहिल्यांदाच योगेश अबोलीवर चिडला होता. इतके दिवस त्याला तिचा जो साधेपणा वाटायचा तो आज त्याला खटकत होता. महत्वाच्या गोष्टींबद्दल ही अशी कशी उदासीन असू शकते हे त्याला झेपतच नव्हतं. आणी त्यामुळे येणारा हा नक्कि राग आहे का वैताग का अपेक्षाभंग का वेगळचं काही? त्याचा त्याचाच गोंधळ उडाला होता. त्यामुळे तो पुढे काही बोलला नाही.
दोन मिनिटानी अबोली उठली आणि म्हणाली, " चल, जाऊया."
योगेशचा राग, वैताग जे काही होतं ते अजून संपलं नव्हतं, त्यामुळे तो ही गुपचुप उठला.
पुढच्या दोन मिनिटात चेहर्यावर स्कार्फ बांधुन अबोली निघाली सुद्धा! जाताना हलकसं "बाय" म्हणाली. तो ही "बाय" म्हणाला आणि तिच्या लांब जाणार्या पाठमोर्या आ़कृती कडे पहात राहिला.
*************************************************************************************************************
नमस्कार ! फारसे प्रतिसाद न
नमस्कार !
फारसे प्रतिसाद न आल्यामुळे वाचकांना कथा आवडत नाहीये असं स्वतःचे स्वतःच ठरवू नका. चांगले लिहिताय तुम्ही.
यापुर्वी (मायबोलीवर) क्रमशः लिहिल्या जात असलेल्या काही कथा अर्धवट राहिलेल्या असल्याने बरेच वाचक कथा पुर्ण होण्याची वाट बघतात. शिवाय सगळे वाचणारे लगोलग प्रतिसाद देतातच असे ही नाही.
त्यामुळे प्रतिसादांच्या कमी संख्येवर जाऊन लिहायचे थांबवू नका.
लिहा, लिहून पुर्ण करा कथा.
हर्पेन + १
हर्पेन + १
छान चाललिये कथा........ लेखन
छान चाललिये कथा........ लेखन सुरु ठेवा.
चांगली चाललीये.
चांगली चाललीये.
छान चाललिये कथा........ लेखन
छान चाललिये कथा........ लेखन सुरु ठेवा. >>> +१
अतीच गॅप पडल्याने पुन्हा सगले भाग वाचावे लागले. आता तरी लवकर पूर्ण करा, म्हणजे लिंक लागते वाचताना.
फारच मोठी गॅप झाली कि हो..
फारच मोठी गॅप झाली कि हो.. हरकत नाही.. आता कथा पूर्ण करा..
कथा छान चालली आहे, तुमची लिखाणाची शैली सुद्धा चांगली आहे. प्रतिसाद नाही आले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. पु. ले.शु.
चांगली चाललीय कथा. गॅप न घेता
चांगली चाललीय कथा. गॅप न घेता पूर्ण करा आता.
कथा छान चालली आहे, तुमची
कथा छान चालली आहे, तुमची लिखाणाची शैली सुद्धा चांगली आहे. प्रतिसाद नाही आले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. पु. ले.शु.+१
हर्पेन + १
हर्पेन + १
हर्पेन + १ छान लिहिताय
हर्पेन + १
छान लिहिताय तुम्ही!