येत्या जुलै मध्ये ओहायो तुन मिशिगन मध्ये सॉकर गेम बघायला जायचे आहे. तसेच ऑगस्ट मध्ये लाफियाट Indiana मध्ये मित्राला भेटायला जायचे आहे . त्यादरम्यान वेस्ट कोस्ट ड्राईव्ह करायचा विचार आहे.
थोडक्यात प्लान असा आहे
१> ओहायो मधुन मिशिगन ( सॉकर मॅच)
२> मिशिगन ते शिकागो
३> शिकागो ते Salt Lake ( बायकोचा भाउ आहे)
४> Salt Lake to San Francisco
5> San Francisco ते LA
6> LA to Vegas
7> Vegas to Grand Canyon
8> Grand Canyon to Kansas City
9> Kankas City to Lafayette Indiana (मित्राला भेटायचे आहे)
10> Lafayette Indiana to Home
५५०० मैलाचा प्रवास आहे आणि २ ड्राईव्हर आहेत. २३ दिवसाची सुट्टी आहे. ६० तासाचा ड्राईव्ह आहे. जर दिवसाला १२ तास ड्राईव्ह केले तर ५ दिवस प्रवासात जातिल. उरलेल्या १८ दिवसातिल मॅच ला , Salt Lake आणि Lafayette Indiana ला प्रत्येकी १ दिवस खाजगी कामासाठी आहे. त्यामुळे sight seeing साठी १५ दिवस उरतात.
फ्लाईट नी जाण्याचा प्लॅन होत नाही आहे कारण कार रेंट केली तर १ ड्राईव्हर कमी होतो. ( १९ वर्षाचा मुलगा रेंटेड कार नाही चालु शकत आणी तो घरातिल long drive करण्यासाठी सेफ बेट आहे) . मी Salt lake ते वेगास एकटा ड्राईव्ह नाही करु शकत आणि मग वेस्ट कोस्ट ला जाण्याचा प्लॅन ड्रॉप करावा लागेल.
प्र्श्न असा आहे की कोणी कोस्ट तु कोस्ट टु वे कार नी प्रवास केला आहे का? आमच्या ऑफिस मध्ये काही स्थानिक लोकानी केला आहे त्याचाकडुन थोडीफार माहिती मिळाली मायबोलिकरानी हा प्रवास केला आहे का?
हा प्लॅन aggressive आहे का?
जर हा प्लान aggressive असेल तर Salt Lake पासुन Vegas ला आलो तर १००० मैल आणि १६ तास वाचतात. तर हा प्लॅन फिसिबल आहे का?
जर एवढ्या लांब नसेल जाउ शकत तर १५ दिवसासाठी Central USA किंवा Mountain झोन मध्ये काही साईट च्या जागा सुचवा
अगदीच फिजिबल आहे. मी
अगदीच फिजिबल आहे. मी भारतातील रस्त्यावर देखील दिवसातले १२ तास चालवली आहे त्यामुळे इथे तर प्रश्नच नाही ! जर तुम्हाला ड्राईव्हींग आवडत असेल तर करा ही रोड ट्रीप. मस्त अनुभव होईल हा. (बट अगेन मी ड्रायव्हर आहे. ओपन रोड मला आवडतो. )
१९ वर्षाचा मुलगा रेंटल का
१९ वर्षाचा मुलगा रेंटल का चालवु शकत नाहि? रेंटल आॅप्शन ठेउन साॅल्टलेक सिटी ते सॅनफ्रॅन प्रवास ॲमट्रॅकने करायचा विचार करा. इट्स वन आॅफ दि गाॅर्जस राउट.
दिवसाला १२ तास ड्रायविंग इज टू टायरसम, व्हेदर यु आर बिहाइंड द व्हिल आॅर नाॅट...
प्रचंड अॅग्रेसिव्ह आहे.
प्रचंड अॅग्रेसिव्ह आहे. माझ्या दोन मित्रांनी केले आहे असे ड्राइव्ह, पण साधारण दोन आठवड्यांत. कारण तुम्ही फक्त इकडून तिकडे जाणे या उद्देशाने जात नसाल हे गृहीत धरतोय. समर मधे या राज्यांत असंख्य ठिकाणे बघण्यासारखी आहेत. ती पाहात पाहात जायचे असेल तर आणखी वेळ ठेवावा लागेल.
मला यातले फक्त ५, ६ आणि ७ रिझनेबल वाटले. बाकी मी अंतरे मोजलेली नाहीत पण ४००+ असतील तर खूप अॅग्रेसिव्ह प्लॅन वाटतो.
४, ८ आणि ९ खूपच मोठे टप्पे
४, ८ आणि ९ खूपच मोठे टप्पे होतील. एक दिवसात कव्हर करणार का?
ब्रेक जर्नीचा विचार करू शकता. दुपारी निघून पाच-सहा तास ड्राईव्ह करून रात्री मुक्काम करायचा (मधल्या कुठल्याही गावात).
पूर्वेकडे येताना कोलोरॅडो सोडून कॅनसासमध्ये शिरलं की पुढे कॅनसास, मिसुरी आणि इलिनॉई पार करणं प्र चं ड कंटाळवाणं होतं. त्यातल्या त्यात कॅनसास अत्यंत बोअर आहे. नुसता सपाटच्या सपाट प्रदेश. आजूबाजूला काहीच दिसत नाही. त्यामुळे ९ वा टप्पा नीट प्लॅन करा.
धन्यवाद सगळ्याना.. दिवसाला
धन्यवाद सगळ्याना..
दिवसाला फक्त १२ तास ड्राईव्ह करायचा प्लॅन आहे. त्यानंतर pre booked हॉटेल मध्ये राहु. उदा salt lake city च्या २४ तास ड्राईव्ह मध्ये १२ तास झाल्यावर आयोवा मध्ये कुठेतरी राहायचे मग दुसर्या दिवशी १२ तास प्रवास करायचा .
आम्ही दोघ दिवसाला प्रत्येकी ६ तास गाडी चालऊ. मी न्युयार्क शिकागो ट्राफिक मध्ये गाडी चालवायला comfortable नसतो. पण ओपन रोड वर गाडी चालवायला खुप enjoy करतो. मुलगा तर कुठेही गाडी चालवायचे enjoy करतो.
तसेच ८ नंबर साठी १७ तास लागतात तर १२ तास प्रवास करुन कुठेतरी राहुन मग दुसर्या दिवसी ५ तास गाडी चालाउन अर्ध्या दिवसात Kansas City मधिल आर्च बघुन तिकडे राहयचा प्लॅन आहे.
अत्तापर्यन्त ओहायो ते न्यु जर्सी आणि परत असा १००० मैलाचा प्रवास ३ दिवसाचा लॉग विकेंड ला २-३ वेळा एकट्याने ड्राईव्ह केला आहे. पण हा ५५०० मैलाचा प्रवास असल्याने सल्ला पाहिजे आहे. आजुनही प्लॅन कंफर्म केला नाही आहे. विचार चालु आहे.
रेंटल कार कंपन्या २० वर्षाखालिल मुला-मुलीना additional driver म्हणुन add करुन घेत नाहीत. त्यामुळे मागच्या डिंसेंबर मध्ये ओरलॅडो - मियामी- key west - आटलंटा हा १५०० मैलाचा ड्राईव्ह मला एकट्याला करावा लागला होता. I was not comfortable to drive in Miami & Atalanta city & had tough time. My son was with me & comfortable to drive but he was not allowed to drive.
Kansas City मधिल आर्च बघुन
Kansas City मधिल आर्च बघुन >>>> आर्च सेंट लुईसला आहे, कॅनसिटीला नाही.
>>रेंटल कार कंपन्या २०
>>रेंटल कार कंपन्या २० वर्षाखालिल मुला-मुलीना additional driver म्हणुन add करुन घेत नाहीत.<<
त्याच्याकडे मेजर क्रेडिट कार्ड असेल तर मेक हिम ए प्रायमरी ड्रायवर. मेनी स्टेट्स लेट यु डु दॅट...
दिवसाला १२ तास ड्राईव्ह
दिवसाला १२ तास ड्राईव्ह जास्त नाही वाटत का? जेवण- खाण वगैरे थांबे घेऊन १४ तास होईल. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी. आम्हाला तरी एवढा वेळ झेपत नाही.
Why not fly to Vegas from
Why not fly to Vegas from Chicago and rent a car there?
The middle states are really boring and nothing to see there.
जेव्हा जेव्हा प्रवास कराल
जेव्हा जेव्हा प्रवास कराल तेव्हा महत्वाचे - जिथे जमेल तिथे कूझ कंट्रोल तसेच ड्रायव्हर बदल करा. साईट सीइंग च्या बाबत फार अग्रेसिव्ह राहू नका. जे जिथे जमेल तिथे नक्की एंजॉय करा.
बर्याच वेळा माळराने येतात. अश्या ठिकाणचे नकाशे, गॅस स्टेशन्स आणि इतर शॉप्स हेरून ठेवा. ज्या स्टेटला भेट द्याल तिथल्या विजिटर सेंटर मध्ये जाऊन आवश्यक नकाशे, पोचण्यास लागणारा वेळ, पुस्तके यासाठी नक्की वेळ काढा. Alternate routes, delays यामुळे बदलणारे प्लॅन्स लक्षात ठेवा.
वरील शहाण्पण ४ प्रेसिडेंट्स ला ५५०० मैल ड्राईव्ह करून गेलो तेव्हाचे आहेत. एका माळरानातल्या इकलौत्या शॉपमालकाकडे भल्ली मोठी रायफल होती. एका ठिकाणच्या वेंडिंग मशीनला पूर्णपणे साखळदंड घातले होते. एका ठिकाणी अजून संधीप्रकाश असतांना फ्रेश व्हायला उतरायची हिंमत झाली नाही!
घाबरवायचा हेतू नक्कीच नाही. सूचनांचा उप्योग व्हावा एव्हढेच!