खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं' जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला काय शिल्लक ठेवलं न्हाय. मग तुमी बसलात त्याच्या घराबाराचीच उपटत.
पण त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं.
आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली.
टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण थेट हायद्राबादेत पोचली. थेट तुमच्या डोळ्याम्होरं, घराण्याची इज्जत मातीत मिसळली.
जगणं सोपं वाटलं काय आयघाल्यास्नी. खायप्यायचे वांदे झाले. कुठं ती मऊमऊ गादी, आन कुटं ती कुबट वासाची गोधडी. किड्यामुंग्यासारखं खोपट्यात जगत राहिले वो.
वाघिणीसारखी पाटलाची पोरगी मांजर होऊन जगायला शिकली हो. आख्ख्या जगाला फाट्यावर मारुन त्या 'आळापण्या'चा संसार फुलवत बसली.
त्या आळापण्याचं जावू द्या, ते आपल्या मौतीनं मेलं. पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो?
महाराष्ट्रात जंगलराज नाहीये
महाराष्ट्रात जंगलराज नाहीये म्हणून जीवे मारण्याच्या घटनांचे प्रमाण कमी.. पण वृत्ती तीच...
Pages