पहिल्यांदाच लिहितोय मराठीत.... सांभाळून घ्या ..
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे कस काय शक्य आहे?
मला अजूनही विश्वास बसत नाहीये.
पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत?
But today it’s been 10 years.
म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे.
माझ्याच डोक्यात चाललेली हि कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित.
अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes.
मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते.
मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय. मती भ्रष्ट केली १५ मिनिटात.
बरोबर इथे उभा राहूनं मी ह्या शापिंग मॉल मध्ये माझ जे काही घरच समान घेतलं होत त्याच बिल भरत होतो. आणि अचानक मॉलच दार उघडल गेल (automatic तर होत) आणि मस्त परफ्युम माझ्या नाकपुड्यामध्ये शिरला.
अरे शहाण्या बाकीच्या सगळ्यांच परफ्युम सोडून तुला फक्त तो दरवाजा उघडल्यावरच बर वास आला रे.
तस नाही रे बाबा आता हे बिलिंग काउन्टर त्या दरवाज्याच्या समोरच तर आहे महणजे माझ्या पाठी .
आणि तू गप रे मध्ये मध्ये तोंड घालू नकोस.
हा तर मी असा इथे पैसे भरत होतो आणि मस्त सुरेख असा परफ्युम चा सुगंध माझ्या नाकात शिरला.
मी मागे वळून पाहिलं तर ती पाठमोरी मला दिसली. मनातल्या मनात तर आम्ही खुशच होतो सुंदर मुलीला पाहून . तिने काही कारणाने मगवळून पाहिलं. बहुतेक तिला कळाल असेल मी पाहतोय तिच्याकडे. मी झटकन तोंड फिरवल. पण साल तिचा चेहरा ओझरता दिसला मला आणि हादरलोच न. मी परत मागे वळून पाहिलं तर पोरगी गर्दीत गायब. आणि तेवढ्यात ती बिल वाली कल्मडली.
"Sir, would you like to pay by cash or card?" शिट रे.
तीच होती रे . I’m Sure. माझा पूर्ण विश्वास आहे की ती तीच होती म्हणून. पण साला तू आपल्यावर विश्वास नाही ठेवत.
कुठे गेली यार ती. आक्खा शोप्पिंग मॉल शोधून काढला.
ह्या सगळ्या लोकांना पण आजच यायचं होत गर्दी करायला .
केवढी गर्दी. त्यात साला तिला नीट पाहिलं पण नाही की तिने काय कपडे घातलेत ते.
आता कस शोधणार??
दोन वाजले रे. चाल आता . साल हे एवढ समान घेऊन हिंडत बसलायेस दिवसभर. तुला भास झाला असेल बाबा. घरी खूप काम बाकी आहे अजून. दोनच दिवस झालेत इथे येउन. घर साफ करायला पण वेळ भेटलेला नाहीये. आजची सुट्टी वाया नको घालवूस. नाहीतर परत ६ दिवस सुट्टी नाहीये. ऑफिसला रखडत जायचं. मरणाची भूक पण लागलीये. ती फ्लैटची मालकीण बाई बोलली होती न आज स्वयंपाकीण बाईला सांगते म्हणून भेटायला. काल तर वेळ भेटला नाही आज तरी भेटून घेऊ यार.
साल्या भूक लागलीये चल लव........
There she is..;....
बोललो होतो तुला ती भेटेल म्हणून. चल पटकन .
ती जी कॉफी पीत बसलीये ती? हो रे तीच . ..रुचा .रुचा...
यार १0 वर्ष झाली रे पण हि अजून जशीच्या तशीच दिसतीये.
तेच काळे केस …गुलाबी गाल……
नकट नाक आणि बेस्ट म्हणजे तीच निळे डोळे . फिदा आहे आपण तर तिच्या डोळ्यांवर.
गप रे साल्या , काय आता काय इथेच कविता लिहिणार आहेस का तिच्यावर???
तू डोक्यात कॅब्रे नको करू बर का आता. मला बोलायचं रे तिच्याशी. खूप काही सांगायच्य. साल पण कॉलेजच्या दिवसात हिम्मत नाही झाली आणि आता अचानक बाई समोर आलीये रे.
अबे कीती वेळ असा कोपर्यात उभा राहून बघत बसणार आहे. बैग उचलून माझे हात दुखातायेत. भुकेने पोटात कावळे आंदोलन करता आहेत. एक काम करू चाल त्या कॅफे मध्ये जाऊन बसू. काही तरी खाण्याची ओर्डर देऊ आणि मग पाहत बसू तुझ्या प्रिये कडे.
चांगलाच डोक खाजवतोस की रे तू
कल्पना तर भन्नाट आहे.
" What would you like to order Sir?"
" Get me one grilled chicken sandwich and fries."
" Anything to drink sir?"
"Coke"
अबे मेनू वर केवढ्याला आहे ते तर बघ एकदा ओर्डर करण्याआधी.
थंड घे रे जर. बघ ती कशी शांत पणे पुस्तक वाचत बसली आहे. यार काय बोलू मी तिच्याशी?? ती समोर आली की नुसती तंतरते रे. तोंडातून एक बाहेर निघाला तर शपथ.
आणि हे फिल्म वाले काहीही दाखवतात १ दिवसात पोरगी पटवतो हिरो. आमच्या लाइफ़ मध्ये अस का नाही होत. गेल्या १0 वर्षात एवढ्या मुलींशी बोललो पण अजूनही हिच्याशी बोलण्याची हिम्मत नाही होत राव.
अबे असा डोक खाली घालून काय बसलाय . हिम्मत कर . चल आगे अन लढ पठ्ठ्या हम हे न तुम्हारे साथ.
कर एकदाची हिम्मत. जे असेल ते बोलून तक एकदाच. जो होगा देखा जायेगा रे.
जादा से जादा काय होईल ती ओळख द्खावणार नाही. ठीक आहे न यार.
शेवटी बोलला हे समाधान तर राहील मनात.
Sandwich आल रे चल आधी ह्या पापी पोटाची श्रुधा भागवू.
"Here you go sir"
अरे पण बोलायला काही विषय तर हवा न यार. कॉलेज मध्ये ३ वर्ष होतो तिच्यासोबत . बाजूच्या बाकड्यावर बसायची. आणि एक शब्दही नाही बोललो रे तिच्यासोबत अजून. तूला तर माही........
"Excuse me, तू रोहन आहेस न?"
अबे आ वासून काय बसलाय तोंडातला घास संपव नाहीमाशी घुसेन. पाणी पी पाणी पी.
" अरे ठसका लागला वाटत. हे घे हे घे पाणी पी"
"तू रोहनच आहेस न??"
" मी ... मी .. हो..."
" अरे समंथा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग?? मी रुचा . रुचा पंडित ? अरे आपण एकाच कॉलेज मध्ये होतो?"
अबे बोल काहीतरी. नाहीतर तिला वाटेल मुका आहेस. का संधी सोडतोयेस. मंद माणसा.
" रुचा.. रुचा. एस एस रुचा. अरे वाह इकडे कशी?"
साल्या फेकाड्या हिच्यास मागे तर हिंडत होतास न .
" अरे मी इथे जोब करते. वर्ष झाल मी इथेच आहे सध्या. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं चला एकट्याने टाईम घालवावा. तू इथे कसा??"
अरे मेरी जान बोल. हीच वेळ आहे . हीच संधी आहे. नाही बोललास तर पस्तावशील.
"मी मी ...."
"काय झाल रे?? असा काय बोलतो आहेस मगासपासून ? तुला आवडला नाही का मी अस येण. ??"
अग ह्या मंद ची टरकली आहे . कधी अक्कल येणार काय माहित हिरो ला.
"नाही ग. अस अस काहीच नाहीये. एकदम ठसका म्लागाला त्यामुळे. I’m also surprised to see you here. मी पण आग इथेच शिफ्ट झालो २ दिवसापूर्वी. ट्रान्स्फर झाली ."
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इन्स्पेक्टर परब यांच्या चेहऱ्यावर असलेल्या भावांवरून किंवा कोणत्याही भावांच्या अभावावरून हवालदारांनी ताडले की प्रकरण हाताच्या बाहेर जायला लागलय...
इन्स्पेक्टर परब मात्र हातातील तिच्या मृत्युच्या दाखल्याकडे पाहत होते.
रुचा पंडित….
क्रमशः
ह्याच शिर्षक बदललतं का हो? कि
ह्याच शिर्षक बदललतं का हो? कि मीच चुकले वाचताना.
हो .........जरा माझाच घोळ
हो .........जरा माझाच घोळ झाला होता
ओके.
ओके.
वा . लिहा पटापट. डिटेक्टिव
वा . लिहा पटापट. डिटेक्टिव स्टोरी जास्त रेंगाळू नये.
वाचकांना आवडली तर लिहीन
वाचकांना आवडली तर लिहीन म्हणतो पुढची.....
लिहा पुढे.. आवडली.. आणि
लिहा पुढे.. आवडली.. आणि पहिल्यांदाच लिहित आहात तर वाचकांचा लोड घेऊ नका
मस्त मजा आली वाचायला. भाषा हा
मस्त मजा आली वाचायला.
भाषा हा usp आहे तुमच्या कथेचा. शुद्धलेखनाकडे नीट लक्ष दिले तर अजून मजा येइल वाचायला.
रच्याकने,
आईला ह्या पोरीने वेड लावलाय >>> या वाक्यात आइने अकबरीचे पोटेन्शिअल आहे
खूप छान लिहिलीय कथा...
खूप छान लिहिलीय कथा... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
ऋन्मेऽऽष ,
ऋन्मेऽऽष , निखिल.....
धन्यवाद....... लवकरच post करतो........
माधव..
धन्यवाद......
जरा मराठी टायपिंगची सवय होते आहे...
ऋन्मेऽऽष ,
ऋन्मेऽऽष , निखिल.....
धन्यवाद....... लवकरच post करतो........
माधव..
धन्यवाद......
जरा मराठी टायपिंगची सवय होते आहे...
ऋन्मेऽऽष ,
ऋन्मेऽऽष , निखिल.....
धन्यवाद....... लवकरच post करतो........
माधव..
धन्यवाद......
जरा मराठी टायपिंगची सवय होते आहे...
ऋन्मेऽऽष ,
ऋन्मेऽऽष , निखिल.....
धन्यवाद....... लवकरच post करतो........
माधव..
धन्यवाद......
जरा मराठी टायपिंगची सवय होते आहे...
ऋन्मेऽऽष ,
ऋन्मेऽऽष , निखिल.....
धन्यवाद....... लवकरच post करतो........
माधव..
धन्यवाद......
जरा मराठी टायपिंगची सवय होते आहे...
How delete these
How delete these comments?????
रच्याकने, आईला ह्या पोरीने
रच्याकने,
आईला ह्या पोरीने वेड लावलाय >>> या वाक्यात आइने अकबरीचे पोटेन्शिअल आहे
>>>>
खिक्क!