बहुचर्चित, बहुपुरस्कृत 'बाजीराव मस्तानी' परवा कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता.
'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोनपैकी एकच पाहायला जमणार होतं. प्रदर्शनाच्या एक आठवडाआधीच मी त्यावेळी 'दै. मी मराठी लाईव्ह'साठी लिहित असलेलं काम स्थगित करायचा निर्णय घेतला होता आणि तसं संबंधितांना कळवलंही होतं. पण मग त्यांनी मला एक शेवटचा चित्रपट 'कव्हर' करायला सांगितलं. मी 'दिलवाले' निवडला. कारण त्या काळात जितका रणवीर डोक्यात जात होता तितका शाहरुख जात नव्हता ! Eventually, 'मी मराठी लाईव्ह'ने मला 'राहू द्या' सांगितल्याने, 'दिलवाले'सुद्धा उगाच पाहिला गेला.
तर सांगायचा उद्देश हा की 'बाजीराव मस्तानी' तेव्हा टाळला नव्हता, त्यामुळे आत्ता जर फुकट पाहायला मिळणार होता तर का न पाहावा ? वेळ होता, पाहिला.
'दिलवाले' हा एक गरीब चित्रपट असेल, तर 'बाजीराव मस्तानी' दळभद्री म्हणावा, ह्या मताला मी आलो आणि शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माझा संयम संपला. मी टीव्ही बंद केला.
'बाजीराव मस्तानी'ची अनेक परीक्षणं येऊन गेली आहेत. आता इतक्या दिवसांनंतर मी परीक्षण लिहिणं तसं निरर्थकच. त्यामुळे काही टिपिकल लिहित नाही. थोडेसे, जसे आठवताहेत तसे मुद्दे मांडतो. हे लहान-मोठे किस्से समजा. जे मला जाणवलं ते सांगतो.
१. भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्यतेची साक्षात व्याख्या असते. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि अगदी गुजारीशमध्येही त्याने दाखवलेली भव्यता लक्षात राहणारी होती. त्यातून 'बा.म.' ऐतिहासिक चित्रपट. मग तर मोठमोठे सेट्स, भव्यता, श्रीमंती वगैरे दाखवायला आयतंच निमित्त होतं. पण सावरिया आणि राम-लीला मधले पूर्णपणे खोटे समजून येणारे सुमार सेट्स आठवले. सेट्समधली कृत्रिमता, खोटेपणा ठळकपणे जाणवत होता. गड, किल्ले, महाल, खोल्या, झाडं, पाणी, नदी, पाऊस काही म्हणता काहीही थोडंसुद्धा खरं वाटत नाही, इतकं गंडलं आहे. अत्यंत वाईट प्रकारे केलेली प्रकाशयोजना ह्यासाठी जबाबदार आहे की अजून काही, मला माहित नाही. पण जो काही End result आहे, तो शुद्ध बकवास आहे.
२. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वजनदार संवाद आले पाहिजेत. त्यांची तितकीच जबरदस्त फेकही आली पाहिजे. कसलं काय ! इथे तर सगळंच 'फेक' (Fake) ! 'बाजीराव ने मस्तानी से प्यार किया है, अय्याशी नही' हा सुमार डायलॉग संवादलेखनाची सर्वोच्च पातळी आहे. अत्यंत बाष्कळ, पोकळ, निरर्थक, सपक संवादांची तितकीच अभिनिवेशशून्य फेक 'अथ'पासून 'इति'पर्यंत ('इति' मी पाहिला नाही, पण बहुतांश पाहिला) आहे. 'पेशवीण पद म्हणजे आमराई' असे अनेक अत्यंत हास्यास्पद डायलॉग्स आपल्यावर आदळत राहतात. एका प्रसंगात काशीबाई उखाणा घेतात. त्यात 'कोहिनूर - हैं नूर' अशी यमकायमकी आहे. ह्यातला तांत्रिक दोष आज कुणालाही कळणार नाही आणि कळला तरी तो किरकोळच वाटेल. पण त्या काळात लोकांची काव्याची जाण इतकी भिकारडी नव्हती. असं सगळं ऐकता, पाहताना हसताही येत नाही. कीव येते लिहिणाऱ्याची.
३. त्याहून जास्त कीव येते गाणी लिहिणाऱ्याची. 'कडक तडक भडक झाली, चटक मटक वटक झाली, दुश्मन की देखो जो वाट लावली' (इथे 'झाली' आहे की 'साली'?) हे बाजीरावाचं शौर्यगान आहे. ह्यात वीररस असणं अपेक्षित होतं. ह्या निरर्थक आणि मवाली छाप शब्दांत कोणता रस आहे, माहित नाही. पण वीररसपूर्ण लिखाणाची ही जर सीमा असेल, तर त्या सीमेवरून गीतकाराने परत फिरूच नये. तसंच पुढे जात राहावं आणि आयुष्यात इतर सर्वांना क्षमा करावं.
४. बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी. ह्या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा समस्त चित्रपट युनिटमधील कुणाला तरी समजल्या असाव्यात का, अशी शंका येते.
बाजीराव हा एक हाडाचा योद्धा होता. महावीर होता तो. भारताच्याच काय, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक बाजीराव होता. त्याचं मस्तानीसोबतचं प्रकरण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यापायी तो वेडगळ झालेला दाखवायचं ? एक कर्तव्यदक्ष राजा (प्रधान) असलेला तो शेवटी शेवटी अगदी बिथरलेला दाखवला आहे. त्याची ती मनस्थिती सादर करतानाचा रणवीर सिंगचा अभिनय तर हास्यास्पदच वाटला. तो सतत दारूच्या नशेत बरळल्यासारखा बोलताना दिसतो. (की तसंच दाखवलंय, कळलं नाही.)
काशीबाई एक घरंदाज स्त्री होती की पोरगेलेशी, हाही मुद्दा बाजूला ठेवू. पण बाजीरावाच्या निजामाशी वाटाघाटी सफल ठरल्या, ही बातमी जेव्हा चिमाजी घेऊन येतो, तेव्हा ती ऐकून अत्यानंदाने ती टुण्णकन् उडी मारुन सासूबाईंच्या मांडीत जाऊन बसते, हे दृश्य पाहून तर माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसंच बाजीरावाचा शिरटोप वगैरे घालून 'हर हर महादेव' ओरडून त्याच्याभोवती नाचणं बागडणं म्हणजे थिल्लरपणा होता.
दुसरीकडे मस्तानी. दीपिकाच्या चेहऱ्यावर मस्तानी सादर करताना कायमस्वरूपी बारा वाजलेले आहेत. ती गोरी वगैरे न दिसता चक्क 'पांढरी' दिसते. रोगट वाटते. मस्तानी जर अशी हाडाडलेली, कुपोषित, निस्तेज होती तर आम्ही इतकी वर्षं तिचं भलतंच काही तरी वर्णन वाचत आलो आहोत. 'बाजीराव म्हणून रणवीर' आणि 'काशीबाई म्हणून प्रियांका' ह्यापेक्षा 'मस्तानी म्हणून दीपिका' हे कास्टिंग सपशेल फसलेलं आहे. दीपिका सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्यात दैवीपणाची झाक नाही. मस्तानीसाठी तीच अत्यावश्यक होती.
५. भन्साळीचा अभ्यास (केला असल्यास) अगदीच अपुरा पडला आहे. ना त्याला पेशवे, मराठाकालीन, महाराष्ट्रीयन, मराठी संस्कृती समजली आहे ना व्यक्तिरेखा. महालांचे सेट्स मुघलांचेच वाटतात. कुठे तरी एक गणेश वंदना असणं अत्यंत गरजेचं होतं, इतकी साधी बाब लक्षात आलेली नाही. 'कट्यार' मध्ये 'सूर निरागस हो'नेच एक माहोल बनवला जातो. तो 'बा.म.' मध्ये बनतच नाही.
'बा.म.' ही कुठली शौर्यगाथा किंवा कुणा व्यक्तीवर आधारित चित्रपट (Not exactly Biopic) नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि आपल्या कुवतीवर अचूक विश्वास ठेवत भन्साळीने ही कहाणी 'प्रेम कहाणी'च्या पुढे जाऊ दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत फालतू युद्धदृश्यं माफ करून टाकावीत म्हणतो. मात्र प्रेमकहाणी तरी कुठे व्यवस्थित मांडली आहे ? कुठल्याही क्षणी बाजीराव आणि मस्तानी, राम आणि लीला बनून 'लहू मूंह लग गया..' करत तोंडात तोंडं घालतायत की काय अशी एक विचित्र अनामिक भीती सतत वाटत राहते, इतकं सगळं वरवरचं झालं आहे.
६. सरसकट सगळे लोक, अगदी मराठी नट-नट्याही 'राऊ' न म्हणता 'राव' म्हणतात ! निवेदक इरफान खान 'बाजीराव बल्लाड' असा अगदी सुस्पष्ट उच्चार करतो. तेव्हा मात्र 'च' आणि 'भ' चे पाढे मनातल्या मनात सुरु झाले. इतकं सगळं उथळ करायचं होतं, तर काही शतकं मागे जायची गरज काय होती ? आजच्याच काळातली एखादी कहाणी गुंफायची होती ना ! अभ्यास करायचाच नव्हता, मेहनत घ्यायचीच नव्हती तर एक प्लॉट ज्याचं इतर कुणी तरी कदाचित सोनं केलं असतं, तो वाया का घालवला ? असा एक वैफल्यग्रस्त प्रश्न मला पडला.
७. हिमेश रेशमियाची अभिनयाची हौस आणि भन्साळीची संगीत देण्याची हौस एकसारखीच वाटते आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली एक तर एकसारख्याच किंवा इतर कुठल्या तरी गाण्यासारख्या किंवा थेट इस्माईल दरबारची नक्कल करणाऱ्या आहेत. 'अलबेला सजन आयो..' ची चाल मस्तच आहे. पण आयो' मधल्या 'आ' वरच्या जबरदस्त समेची अक्षरश: माती झाली आहे. वाद्यांचा इतका गोंगाट आहे की ती समेची जागा खरंच वाया जाते. इथे पुन्हा एकदा 'कट्यार'चा संदर्भ देतो. 'दिल की तपिश आज हैं आफताब..' मधल्या 'ता' (आफ'ता'ब) वर येणारी समेची जागाही अशीच दिलखेच आहे. पण सुरेख व अचूक प्रमाणातला वाद्यमेळ ही सम व्यवस्थित ठळक करतो. भन्साळी भसाभस वाद्यांचे आवाज ओततो आणि फक्त गोंगाट करतो.
एकंदरीत, अत्यंत रटाळ आणि सपशेल फसलेला चित्रपट म्हणूनच 'बाजीराव मस्तानी' ओळखला जाईल. मी 'दिलवाले' पाहिला ह्याचा तुलनात्मक का होईना मला आनंद होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता वाटतंय.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/bajirao-mastani-movie-not-review....
वाचला बिचारा मग रोजच मल्हारी
वाचला बिचारा मग
रोजच मल्हारी मल्हारी करत नाचवला असता अनु ने
दिपीकाने डोळ्यात पाणी आणून
दिपीकाने डोळ्यात पाणी आणून विनंती केली आणि मला बहिण नाही.या दोन माफक अडचणींमुळे लग्न क्यान्सल.
करीना कपूर मस्तानी असायला हवी
करीना कपूर मस्तानी असायला हवी होती असं वाटलं. >>> नको. एखाद्या सीन मधे उगाच उघडी पाठ वगैरे फालतूपणा करून तिने आणखी वाद निर्माण केला असता :). पूर्वी एक खानदानी लुक म्हणून प्रकार असे - आठवा प्रदीप कुमार, दुर्गा खोटे, पृथ्वीराज कपूर वगैरे. असे अभिनेते/अभिनेत्री आता नाहीत का कोणी? पूर्वी रेखा शोभली असती. उत्सव सारखी.
Aishwarya ... original choice
Aishwarya ... original choice pan ok hoti
MhaNaje.. ranveer barobar
MhaNaje.. ranveer barobar nahi.. pan mastani mhanun..
Jodha akbar madhe chhan watali hotee
दिपिका खुप खुप आवडते तरीही
दिपिका खुप खुप आवडते तरीही मस्तानी नवा चेहराच हवी होती. शोधावे लागले असते पण नक्की सापडली असती. ती पांढरट दिसते हे ट्रेलरवरुन जाणवले होते.
सिनेमा अजुन पाहिला नाही पण रसपनी लिहिल्याप्रमाणे संवाद उच्च राजघराण्याला शोभणारे नसतील तर अरेरे वाटले. सिनेमा पहाणार आहे कारण ते तिघेही आवडतात.
रेखा नको तितकी गूढ वाटते. ती
रेखा नको तितकी गूढ वाटते. ती उमरावजान म्हणूनच बरी. पण मस्तानी नाही. मस्तानी म्हणून मेनस्ट्रीम मधल्या कोणाला उभं करायचं - एकही नाव दिसत नाहीये.
दुर्गा खोटे काशीबाई म्हणून जास्त शोभल्या असत्या.
कतरीनाला घ्यायचे होते मस्तानी
कतरीनाला घ्यायचे होते मस्तानी म्हणून.. त्या पिंगा आयटम साँगमध्ये धमाल उडवली असती तिने .. आणि तिला घोडाही छान चालवता येतो असे तिच्या एका मुलाखतीत वाचल्याचे आठवतेय.
पण घोडा "चालवावायला " ते
पण घोडा "चालवावायला " ते बाजीराव मस्तानी बुद्धीबळ खेळणार का?
हा सिनेमा अजिबातच क्लासी वाटत
हा सिनेमा अजिबातच क्लासी वाटत नाही. जोधा-अकबर बराच बरा होता ह्यापेक्षा. मराठीतला रमा-माधव पण जास्ती आवडला.
परिक्षणाशी सहमत, पण तरिही डोकं बाजूला ठेउन पाहिल्याने पूर्न बघू शकले. पण तरिही काशीबाईंचा टूणकन सासूच्या मांडीवर उडी मारायचा सीन , पिंगा आणि मल्हारी गाणी बघताना मनाला फार फार यातना झाल्या.
सशल, बुद्धीबळात "घोडा"
सशल, बुद्धीबळात "घोडा" चालवायची गरजच काय, त्यात कोणाला टपकवायचे नसते तर फक्त चेक द्यायचे असते ना
काशीबाईंचा सासूच्या मांडीवर
काशीबाईंचा सासूच्या मांडीवर उडी मारायचा सीन कुठे बघायला मिळेल का यूट्यूब वगैरे .. फार चरचा ऐकतोय या सीनची पिक्चर रीलिईज झाल्यापासून
प्रियांका चोप्रा बसते की काय?
प्रियांका चोप्रा बसते की काय? की छोटी काशी?
प्रियंका चोप्रा च उडी मारून
प्रियंका चोप्रा च उडी मारून तन्वी आझमी च्या मांडीवर बसते. खुद्द काशीबाईंनीं तसं केलं असेल जर खरंच तर तेव्हा त्यांचं वय लहान असेल बरंच. आता आपली प्रिचो दिसली नाही तशी अल्लड, लहान त्याला काय करायचं?
पण घोडा "चालवावायला " ते
पण घोडा "चालवावायला " ते बाजीराव मस्तानी बुद्धीबळ खेळणार का? >>> हा 'क्लास' होता.
सशल . टोटली भा.
सशल :D. टोटली भा.
सशल
सशल
अर्र... ती चोप्रा त्या
अर्र... ती चोप्रा त्या तन्वीच्या मांडीवर भलीमोठी दिसली असेल म्हणुनच ते विचित्र वाटलं असेल. तन्वी धडपडत असेल नक्कीच त्या सीनमधे.
१-५ मुद्दे अगदीच पटले. बरोबर
१-५ मुद्दे अगदीच पटले. बरोबर लिहिले आहे. दिपीका ऐवजी 'विवाह' सिनेमातली हिरॉईन छान वाटली असती.
दिपीका ऐवजी 'विवाह' सिनेमातली
दिपीका ऐवजी 'विवाह' सिनेमातली हिरॉईन छान वाटली असती. >>>> अमृता राव. तिच्याकडे नाजुकपणा हाच काय तो प्लस पॉईंट आहे, पण उंचीत मार खाल्लाय त्यामुळे अजुन शाळकरीच वाटते. सतत लाजुन लाजुन चूर झाल्यासारखी डायलॉग्ज बोलते.
खरय
खरय
नाही आजिबात नाही. दिपीका
नाही आजिबात नाही. दिपीका परवडली पण अमृता आवर.
विवाह अपचन ओकारी शिणूमा आहे.
विवाह अपचन ओकारी शिणूमा आहे.
विवाह अपचन ओकारी शिणूमा आहे.
गेल्या आठवड्यात मस्तानीचे
गेल्या आठवड्यात मस्तानीचे वंशज पुण्यात येऊन पडक्या शनिवार वाड्यला भेट देऊन गेले अशी बातमी पेपरात वाचली.
मस्तानीचे वंशज ही काय भानगड आहे..? बाजिरावाचे वंशज असं असायला हवं ना..??
https://www.esakal.com/pune/mastani-descendants-visited-shaniwarwada-pun...
मस्तानीचे वंशज ही काय भानगड
मस्तानीचे वंशज ही काय भानगड आहे..? बाजिरावाचे वंशज असं असायला हवं ना..??>>>> बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा कृष्ण(समशेरबहाद्दर)याचे वंशज.नुसते बाजीरावाचे म्हटले तर नानासाहेब, राघोबादादा हे व त्यांचे सर्व वंशज include होतील
+१११११११११
+१११११११११
मनकर्निका मधे जरदोसी साडी! मोकळे केस!
हो मनकर्णिका मध्ये राणी
हो मनकर्णिका मध्ये राणी लक्ष्मीबाई यांना नाचताना दाखवले आहे
आणी डिझायनर ब्लाउज!
आणी डिझायनर ब्लाउज!
बाजिरावाचे वंशज असं असायला
बाजिरावाचे वंशज असं असायला हवं ना..??.... श्रीमंत बाजीव पेशवे हे छत्रपती शाहूमहाराजांचे प्रधान होते. त्यांनी छत्रपतींचं म्हणजेच मराठ्यांचं म्हणजेच आपल्या सगळ्यांचं राज्य चौफेर वाढवलं. श्रीमंत बाजीव पेशवे हे ४० वर्षांच्या आयुष्यात ४१ लढाया करुन अजिंक्य राहिलेले वीर योद्धा होते. त्यांचा एकेरी उल्लेख करायला ते आपल्या घरी गोट्या खेळायला येत नव्हते dj.
माबोच्या ईतर धाग्यांवर छ.
मस्तानीला एकेरी बोललेलं चालतं वाटतं अस्मानींना... एक स्त्री असुन एका स्त्रीची ही किंमत..!
Pages