Submitted by घायल on 21 April, 2016 - 11:46
मराठी प्रमाण भाषा म्हणजे काय ? ही किती लोकांकडे बोलली जाते ?
वेगवेगळ्या गावचं पाणी वेगळं म्हणतात. दर दहा कोसावर बदलत जाणा-या . मराठी भाषेत / बोलीत बोलणा-याने प्रमाण भाषेत व्यक्त व्हावे, मूठभरांनी लादलेले सभ्यतेचे संकेत पाळत लिखाण करावे अशी बंधने लादल्यास लहानपणापासून कानावर पडलेल्या बोलीला टाळून जी आपली नाही त्या संस्कृतोद्भव मराठीतून सकस आत्मलक्षी साहीत्य निर्मिती होऊ शकते का ? ज्याचे त्याचे अनुभवविश्व, अनुभूती हे परक्या भाषेत व्यक्त करणे प्रत्येकाला जमू शकते का ? अपवाद असतील. पण असा नियम होऊ शकेल का ?
ग्राम्य भाषेत लिहीणा-या सदस्याचे याबद्दलचे म्हणणे ऐकायची उत्सुकता आहे. त्यावर सर्वांची सर्वंकष मते जाणून घ्यायला आवडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लय म्हन्जी लय डोस्कां
लय म्हन्जी लय डोस्कां सटकविला!
बोली भाषेत हे कसे लिहिणारात? प्रश्न कन्फुज्ड वाटतोय.
नका त्रास देऊ डोस्क्यास. ही
नका त्रास देऊ डोस्क्यास. ही बोली तुमची नसावी...
निरर्थक धाग्यांच्या भडीमाराने
निरर्थक धाग्यांच्या भडीमाराने मायबोली धोक्यात येउ शकते
तुम्ही त्यावर वेगळा धागा
तुम्ही त्यावर वेगळा धागा काढा.
बुमरँग आणि स्लुलू (वेगवेगळे असाल तर ) .. मी आपल्या इतका विद्वान नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणे वावर आहे. काही चुकले तर आपले ज्ञानकण थोडे थोडे सांडू द्यात.
सुलू म्हणजे एका सदस्याला खूप प्रतिसाद देतो म्हणून शिवी दिलेले सदस्य का ? लक्षात आहे बहुतेक ते. तो सदस्य उडाला तुम्ही आहात. अभिनंदन !
हाहाहा कसला कल्पनाविलास
हाहाहा
कसला कल्पनाविलास
sulu | 14 August, 2015 -
sulu | 14 August, 2015 - 13:45
खडी साखर या आयडी ने बरेच ठिकाणी उगाचच संबंध नसताना धागे भरकटवणे, वैयक्तीक शेरेबाजी करणे, लोकांची टर उडवणे असले प्रकार केले आहेत. करतो आहे. त्याच्या लिखाणावरून अकलेशी त्याचा दूर-दूर वर संबंध नाही हे स्पष्ट दिसतेच.
म्हणतात ना, डुकरा बरोबर कुस्ती करण्यात अर्थ नसतो. एक तर तुम्ही चिखलात लोळता आणि डुक्कर एंजॉय करते. स्मित
काहीही हां खडी !
------------------------------------------------------------
इतकं पुरे !
या दोन्ही ठेवणीतल्या आयडींचे जीवितकार्य स्पष्ट झाले. या आता !
कथेतली पात्र जर
कथेतली पात्र जर गावकट्ट्यावरची असतील तर ग्राम्यच बोलणार.अमक्याचा चिरंजीव असा का वागतो यास अमक्याचा चिरगुट पिसाळलाय हेच म्हणणार.
ग्रामिन भाषेतील गोड्वा
ग्रामिन भाषेतील गोड्वा त्यांनाच जाणवनार जे ग्रामिन भागात राहतात.
शिव्या देण्यात पण आपलेपणा असतो.
मायला कुठे कडमडला होतास इतके दिवस .......आम्हाला इसरलास का.
या लेखातले अनेक मुद्दे
या लेखातले अनेक मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=BIGIy
<< शिव्या देण्यात पण आपलेपणा
<< शिव्या देण्यात पण आपलेपणा असतो.>> शिवाय, शिव्यांचा ठसका ['साऊंड इफेक्ट' ] हि तर त्यांची मक्तेदारीच आहे!
<< ग्रामिन भाषेतील गोड्वा त्यांनाच जाणवनार जे ग्रामिन भागात राहतात.>> हें मात्र तितकंसं नाही पटत. 'मालवणी' बोलीभाषा न जाणणारे अनेक शहरी लोक त्या भाषेच्या प्रेमात पडलेले पाहिलेत मीं.
संदर्भाने तरी अर्थ कळेल असे ग्रामीण /बोलीभाषेतील शब्द, वाक्यं प्रसंगानुरूप वापरणं यांत वावगं कांहींच नसावं. अर्थात, अश्लीलतेचे निकष अगदींच धुडकावून न लावतां .
भाऊ अमेरीकन सिनेमात सर्रास
भाऊ
अमेरीकन सिनेमात सर्रास f**k हा शब्द उच्चारला जातो. त्यावरून अनेक वाक्यच्या वाक्यं असतात. फास्ट अॅण्ड फ्युरीयस मधे तर सर्रास अशा शब्दांची रेलचैल असते. अशा सिनेमातल्या संवादांना चक चक असा आवाज करून दाद देणारे अनेक वीर मराठीतल्या ग्राम्य शब्दांना शिवराळ म्हणून नाकं मुरडताना पाहीलेले आहेत. हे असं का होतं याचा विचार केला तरी उत्तर सापडत नाही.
मराठीतल्या अनेक म्हणी या मूळच्या ग्राम्य शब्दांना प्रमाणित करून बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा मूळ अर्थ आणि परिणामकारकता हरवलेली आहे. एकच उदा. देतो.
पाहुण्याच्या काठीने साप मारणे
मूळ म्हण वेगळी आहे. मूळच्या स्वरूपात ती अत्यंत परिणामकारक आहे. थोड्या शब्दात शहाणपण असं म्हणींचं स्वरूप असतं. अशा प्रकारच्या भाषांतराने म्हणींचा उद्देशच नाहीसा होतो. मूळची म्हण अश्लील आहे हे या मंडळींना पचवायला जड जातं. कारण ती अश्लील अर्थाने घेतलीच जात नाही.
संदर्भाने तरी अर्थ कळेल असे
संदर्भाने तरी अर्थ कळेल असे ग्रामीण /बोलीभाषेतील शब्द, वाक्यं प्रसंगानुरूप वापरणं यांत वावगं कांहींच नसावं. अर्थात, अश्लीलतेचे निकष अगदींच धुडकावून न लावतां .<<<<<सहमत.
एकेकाळी लेखक दयापवार यांची बलुत कादंबरी डोक्यावर घेतली होती लोकांनी बरेच पुरस्कार पण मिळाले होते पण त्यातिल अश्लील भाषेमुळे मी ती वाचली नव्हती नंतर तश्या कादंबर्या लिहिन्याची फॅशन च झाली होती
असो प्रत्येकाची वैयक्तिक मते......
कोणत्याही प्रकारे शिव्यांचे
कोणत्याही प्रकारे शिव्यांचे समर्थन पब्लिक फोरमवर होऊ शकत नाही.
अशा प्रकारे प्रसिद्ध वर्तमानपत्रात लेख देऊन पहावा कोणीही. बघा छापतात का ते.
नेटवर मोकळीक असते त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
पण मग अशा वेळी आपला स्वतःचा ब्लॉग वगैरे चालू करून तिकडे काय ते शिव्या युक्त लिहिता येऊ शकते.
अर्थात ते पण चूकच आहे, पण तिथे लेखकच प्रशासक असतो आणि प्रसिद्धी कुठे कशी किती करायची हे त्याच्या ताब्यात असते.
ग्रामीण भाषा, बोली भाषा याला कोणाचाच विरोध असायचे कारण नाही पण अर्वाच्य शिव्या पब्लिक फोरमवर आल्याच नाही पाहिजेत. तिथे XXXXX असे काही सूचक लिहिता येऊ शकते.
असो, या विषयावर यापेक्षा अधिक लिहिण्यासारखे काही नाहीये. तस्मात इति लेखनसीमा.
कापोचेजी, चर्चेचा 'फोकस' आता
कापोचेजी, चर्चेचा 'फोकस' आता बोलिभाषेच्या वापरावरून अश्लील शब्द वापरण्याकडे झुकतो आहे, असं वाटतं. तो विषय स्वतंत्र आहे व त्याचा आवाकाही खूपच मोठा आहे.
तरी पण विषय निघालाच आहे , तर इतकंच वाटतं कीं एखादा अश्लील शब्द सर्रास वापरात रुळला कीं त्याचा शब्दशः अर्थ मागे पडतो. उदा. 'साला', 'च्याआयला' हेही शब्द माझ्या लहानपणीं निषिद्ध होते व आज ते कुणाला खटकतही नाहीत. पण असे शब्द रुळेपर्यंत तरी ते अश्लीलतेचा शिक्का घेवूनच मिरवणार. नाईलाज आहे !!
हा विषय जर सतिश वाघमारे
हा विषय जर सतिश वाघमारे यांच्या लिखाना वरुन असेल तर मला वाटते त्याच्या लिखाना कडे एक लेख व त्यानुसार लेखकाची शैली व त्याचे अनुभव या दृष्टीकोनातुन पहावे आवडत नसल्यास वाचु नये...मला त्यांचे लिखान आवडले त्यातिल आशय पाहता निव्वळ शिव्या वा अश्लील असे लेबल लावुने चुकिचे आहे.....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/8398
इथे आधी यासारख्याच विषयावर चर्चा झालेली आहे.
फार तर चित्रपट/टीव्ही कार्यक्रमांच्या सुरुवातीला एक कंटेंट वॉर्निंग असते तशी सावधगिरीची सूचना लेखनाच्या सुरुवातीला ठळक टाइपात टाकता येईल.
उदा : या लेखनात शारीर वर्णन, ग्राम्य भाषेतल्या शिव्या, लैंगिक उल्लेख, इ. यातले काहीही नाही. त्यामुळे वादविवादांची हौस असलेल्या अश्लीलमार्तंड वाचकांनी हे लेखन वाचायच्या भानगडीत पडू नये.
वादविवादांची हौस असलेल्या
वादविवादांची हौस असलेल्या अश्लीलमार्तंड वाचकांनी हे लेखन वाचायच्या भानगडीत पडू नये. >>> और ये लगा सिक्सर . नटराज फिर चॅम्पिअन
ज्यांना मायबोली "बालवाड्मय" म्हणून हवी असेल त्यांच्यासाठी तर खास वेगळा विभाग द्यावा.
महेश जावु दे. काहिंना गटारातच
महेश जावु दे. काहिंना गटारातच लोळायचे असेल तर आपण काय करणार. माबोचे गटार करायचे का नाही ते प्रशासक ठरवतील. तेव्हा थंड घ्या
वर ज्या बाफची लिंक दिलेली आहे
वर ज्या बाफची लिंक दिलेली आहे तिथे जवळ जवळ सर्व मुद्दे आलेले आहेत. ग्राम्य भाषेतील शब्द यासाठी ते चर्चा पुरेशी आहे.
त्या लेखातले नक्की काय दुखतेय
त्या लेखातले नक्की काय दुखतेय ते कबूल करायची यांची तयारी नाही, भाषा, अश्लिल वगैरे नाटके आहेत.
शिव्य न देताही सभ्य शब्दात
शिव्य न देताही सभ्य शब्दात कुणालाही दुखवता येतं तर कधी शिव्या देऊनही कुणाला हसवता येत.
शिव्या मग त्या कोण कुठे व कसे
शिव्या मग त्या कोण कुठे व कसे वापरते यावर अवलंबुन असावे. मी व माझ्या दोन मैत्रिणी पेपर देऊन येत होतो. माझा व माझ्या एका मैत्रिणीचा ( निशा) पेपर लवकर देऊन झाला. निशा एकदम कडक शिस्तीत वाढलेली. कॉलेज व ट्युशन झाली की घरी जाऊन अभ्यास करुन श्लोक वगैरे म्हणणारी.
तर आमची दुसरी मैत्रिण मनिषा लवकर न आल्याने वैतागलेली निशा एकदम ओरडली, "" तिच्या आयची साली कुलकर्णी, लवकर का येत नाही ही?"" ( एकतर दोघीना पेपर कठिण गेल्याने आम्ही वैतागलो होतो) हे चक्क निशाच्या तोंडुन ऐकल्यावर मी प्रचंड मोठ्याने हसले आणी गपकन खाली बसले. आमच्या वर्गातील मुले तिथुनच चालली होती, नशीब त्यानी ते ऐकले नाही. पण मुली सोबर का होईना पण शिव्या देतात हे मी पहिल्यांदा बघीतले. मी तिला विचारले की तू असे का बोललीस, तर म्हणाली की मुली-मुली असतील तर अशा टाईपचे बोलायला काय हरकत आहे!:फिदी:
'मालवणी' बोलीभाषा न जाणणारे
'मालवणी' बोलीभाषा न जाणणारे अनेक शहरी लोक त्या भाषेच्या प्रेमात पडलेले पाहिलेत मीं. >> भाऊ, इतकी प्रेमात पडले की मालवणी नवराच केला!
कापोचेजी, चर्चेचा 'फोकस' आता बोलिभाषेच्या वापरावरून अश्लील शब्द वापरण्याकडे झुकतो आहे, असं वाटतं. तो विषय स्वतंत्र आहे व त्याचा आवाकाही खूपच मोठा आहे. >> सहमत
लिखाणात गरज म्हणून एक दोन
लिखाणात गरज म्हणून एक दोन शिव्या असतील तर चालू शकेल (फुल्यांनी योग्य भावना कन्व्हे होत नसल्यास), पण खास तशा शिव्या लिहायची हौस भागावी म्हणून लिखाण नको.
एक तर मायबोली ही काही १८
एक तर मायबोली ही काही १८ वर्षाखालील मुलांसाठी बालवाड्मय साठी बनवली गेली नाही आहे हे "काहींनी" लक्षात घ्यावे. दुसरे म्हणजे वाघमारे यांच्या आधी सुध्दा बर्याच लेखकांनी स्वतःच्या कथेमधे विषयानुरुप शिव्यांचा, अलंकाराचा, अतितीव्र भाषेचा वापर सातत्याने केला होता. आणि त्यात कुणाला ही खटकले नाही व कोणी तेव्हा आक्षेप घेतला नाही. काहींची तर कविता सुध्दा दादा कोंडके स्टाईल होती (शोधल्यास सर्व सापडते). आता ती कंपूगिरी होती की अजुन काही हे देवास ठावूक पण मला वैयक्तिक त्यावर आक्षेप घ्यावासा अजिबात कधीही वाटला नाही. मात्र आता वाघमारे "काहींच्या" कंपूत नसल्याने तसेच त्यांनी आल्यावर "एका विचारसरणीवर" टिप्पणी केल्याने त्यांच्या विरुध्द कुंभाड रचणे चालू आहे. मुळात त्यांनी स्वतःहून ही धुराळे उठण्याआधीच अॅडमिनच्या विपूत जाऊन त्यांच्या भाषेबद्दल स्पष्टीकरण दिले होते जे सर्वांनी वाचलेले. त्यानंतर सुध्दा अशा प्रकारचे आरोप तक्रार करणे म्हणजे शुध्द कंपूगिरी अथवा मुद्दामुन त्यांच्या विरुध्द पसरवले जाणारे विखार असे म्हणायाला वाव आहे. असे स्पष्ट वाटत आहे.
लेख/कथा इ. मधे शिव्या नको - हा जर आक्षेप असेल तर प्रत्येकाच्या कथेतून शिव्या वगळाव्या अशी मागणी "काहींची" असती तर समजून घेण्यासारखे आहे परंतू काहींच्या कथांमधल्या "शिव्या" यांना काट्यासारख्या टोचतात आणि काहींच्या कथेमधल्या "शिव्या" यांना मात्र फुलासारख्या कोमल वाटतात.
किमान उत्कृष्ट कथेंमधे तरी "यांनी" कंपूगिरी करू नये असे वाटते. इतरत्र यांची चालू असतेच.
असे ही या प्रकारावर अॅडमिन समर्थ आहे. तेच निर्णय घेतील.
काहीही चालेल पण भेदभाव
काहीही चालेल पण भेदभाव नसावा.
जर ग्रामीण बोली भाषेतल्या शिव्या चालत असतील तर पुस्तकी मराठीतील किंवा आमच्या बंबैय्या मराठीतील शिव्या आणि अश्लील शब्दही चालून घ्यायला हवेत.
माझे तर बालपणच शिव्या देण्याघेण्यात गेले आहे. मला त्या ऐकताना कौतुक वाटत नाही. वाचताना मात्र जर उगाच आव आणत दिल्यासारखे असेल तर लगेच खटकते.
पण येसस माझेही हात आता काहीतरी शिव्यायुक्त लेख पाडायला शिवशिवत आहेत. पण मेंदू अजून त्यांना आदेश द्यायला मागत नाही. नैतिकता अनैतिकतेच्या गर्तेत मन अडकलेय ..
>> नैतिकता अनैतिकतेच्या
>> नैतिकता अनैतिकतेच्या गर्तेत मन अडकलेय<<
हाच फरक आहे रे तुझ्यात आणि (सो काॅल्ड) विद्रोहि लेखकांत...
<< सुलू म्हणजे एका सदस्याला
<<
सुलू म्हणजे एका सदस्याला खूप प्रतिसाद देतो म्हणून शिवी दिलेले सदस्य का ? लक्षात आहे बहुतेक ते. तो सदस्य उडाला तुम्ही आहात. अभिनंदन !
>>
संबंध नसलेले धागे जोडून राग काढायचा प्रयत्न! पण केविलवाणा!
असो, तो आयडी उडाला आणि आम्ही आहोत यातच काय तो बोध घेणे!
काहीही हां खडी! .. आपलं कापोचे!
प्रमाणभाषेतच व्यक्त व्हावे
प्रमाणभाषेतच व्यक्त व्हावे अशी कोणी सक्ती करताना पाहिले नाही. साहित्य, सिनेमा इत्यादित प्रसंग / स्थळानुरुप बोली भाषाच असते. अभ्यासक्रमात प्रमाण भाषा आहे. राज्यभरात संवाद साधण्यास ती उपयोगी पडेल.
सुलु किंवा तुम्ही जे कुणी
सुलु किंवा तुम्ही जे कुणी असाल ते...
तो धागा वाचला मी. हा एकच प्रतिसाद नाही. एखादा सदस्य प्रतिसाद देतो हा अॅडमिनच्या अखत्यारीतला विषय तुम्ही का हाती घेतलाय आणि एव्हढी शिवीगाळ का केलीये हे समजलेले नाही. इथेही पहिलाच प्रतिसाद मुद्दामून दिलेला आढळला. तुमच उद्देश लक्षात आलेला आहे हे सांगण्यासाठी एण्टरटेन केले. नाहीतर जो काही बोध व्हायचा तो झालेला आहे. मागच्याच प्रतिसादात या बाफचा उद्देश जुन्या एका बाफमुळे पूर्ण झाल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे धागा भरकटला तरी काही फरक पडणार नाही, उडाला तरी नाही.
व्यवस्थित प्रतिसाद द्यायचे असतील तर ठीक आहे.
तुम्ही आता जी दुरुस्ती केलीये ती तुमची मानसिक अवस्था स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. अतिशय विकृत . मी त्या आयडीचं लिखाण वाचलेलं आहे. तुमच्यासारखं घाणेरडं अजिबातच नाही.
त्या धाग्याची लिंक मुद्दामून देतो म्हणजे तुमचा पराक्रम आणि तुम्ही कोण आहात हे माझ्याप्रमाणेच सर्वांच्या ध्यानात येईल. एका आयडीने सोंगं घ्यायची आणि दुस-या आयडीने थयथयाट !!!
Pages