" अविका "
“ कबीर...डॉक्टरांनी पुढचे तीन दिवस आठवणीने कॉन्टॅक्ट ठेवा अस सान्गितलय. ” अविकाने कबीरच्या नजरेला नजर मिळवण्याच धाडस गोळा करत, एक एक शब्द जुळवत खालच्या आवाजात वाक्य पूर्ण केल. तिला माहीती होत. कबीर आता चिडणार. अविका आणि कबीर साठी हे आता फारस नवीन उरल नव्हत. पाच साडेपाच वर्ष झाली.
'कबीर...!' अविकान पुन्हा एकदा कबीरच लक्ष वेधाव म्हणून नाव घेतल.
अविकाच पहील वाक्य कबीरला ऐकू गेल नाही, अस नक्कीच नाही. जवळच तर बसला होता. बेडवर. लॅपटॉप मधे डोक खूपसून. ऐकू 'न' यायला काय झाल? ऐकूनही न ऐकल्या सारख केलय कबीरन, हेही अविकाला समजलपण. पण अविकाच्या वाक्यावर कबीर ने काही रिस्पोन्सच केल नाही. हे अविका ला आवडल नाही. अविकाने कबीर च्या जवळ जात त्याच्या बोटांना स्पर्श करत 'कबीर…!' अशी पुन्हा एक हळूवारशी हाक मारली.
कबीर ने झप्पकन लॅपटॉप चा स्क्रीन खाली करत तो बाजूला सर्कावून दिला. त्याच कपाळ त्रासीक आठ्यानी आकसून गेल.
'अविका...अवि, तुला माहितीय, आय एम् डन विथ ऑल धिस. आपण हे सगळ केलेल आहे. एक नाही दोन नाही गेले पाच वर्ष. लेट्स अकसेप्ट अविका. लेट्स आक्सेप्ट. नाही मूल तर नाही. दटस फाइन...’
'अरे कबीर, पण अस हाताश् होऊन कस चालेल...?'
'हताश ? हताश मी नाही अविका...तू झालीयस..हताश...! अग आपल्या दोघांमधला रोमॅन्स म्हणजे काय या डॉक्टरान्ना त्यांच्या लॅबोरेटरी मधला एखादा एक्सपेरिमेंट वाटला की काय? आणि मी आणि तू त्यांच्या एक्सपेरिमेंट चे गिनिपिग्स ? कमॉन अवि, ग्रो अप '
कबीर अरे असा काय बडबडतोयस वेड्या सारखा? अरे यु नो इट. प्रॉब्लेम नाही आहे आपल्यात. ना तुझ्यात ना माझ्यात. आपण दोघेही नॉर्मल आहोत. आणि डॉक्टरांनी सान्गितलय ना, की - यु बोथ हॅव नो रिझन टू गिव इट अप."
' अवि...स्टॉप इट. ते सगळ मला माहिती आहे. मीही ह्या सगळ्यातून गेलोय...तुझ्या इतका नसेन, पण मीही तुझ्या इतकच फेस केलय. मला ही माहिती आहे. प्रॉब्लेम माझ्यात नाही, आणि तुझ्यात ही नाही. आणि आपली केस त्यांच्या दृष्टीने सो कॉल्ड अनएक्सप्लेंड ईनइंफेरटिलिटीच्या केटेगरी मधे मोडते. अविका मला आपली केस त्यांच्या दृष्टीने कोणत्या केटेगरी मधे बसवतात ह्याच्याशी आता फारस देणघेणच राहिलेल नाही. त्यांनी सांगितल...की आता पुढचे दोन दिवस कॉंटॅक्ट ठेवा...की मी आणि तू...इच्छा असो नसो...ट्रीटमेंट घेतल्या सारख...जवळ यायच, आणि आपल्या दोघांचे शरीर म्हणजे यांना काय...? खेळ करून टाकलाय सगळा अविका तुझ्या आणि माझ्या मधल्या हळूवार प्रणयया चा...?...? शिट...अविका अग ही काय फॅक्टरी आहे काय...की मी आणि तू म्हणजे एखाद मशीन. आणि प्रॉब्लेम असला ग त्यात आलाय? नाही झाल मूल तुला आणि मला तर कसला आलाय त्यात प्रॉब्लेम? सगळ्यांना जगातली सगळी सुख मिळायलाच पाहिजेत हा अट्टाहसाच कशासाठी? एखाद्याला सक्खा भाऊ नसतो, एखाद्याला सक्खि बहीण नसते. तस मला मूल नाही. थ्ट्स इट. त्याचा एवढा मोठा बाऊ कशासाठी करत बसायच ? अविका, मुळात हा प्रॉब्लेम आहे हेच डोक्यातून काढून टाक आता. वी हॅव लॉट मेनी थिंग्ज़ डू इन लाइफ. लॉट मेनी, अज वेल अज लॉट ब्यूटिफुल.
मला माझ्या स्टूडीयोच अपग्रडेशन करायचय. नवीन क्लाइयेंट्ल येत आहेत. टेकनोलॉजी प्लॅटफॉर्म बदलताहेत...ते शिकायचेत... तूला ही आता नवीन रोल मिळालाय. तुझ ही ऑफीस मधल बर्डन वाढलय. ट्रेनन्निंग ला जाय्चय तुला...फ्रांस ला...जुलै मधे..ए काही म्हण हा, पण माझ्या आधी तू अब्रॉड जाणार...आय एन्व्ही यू...!’ कबीर ने हळूच अविच्या कपाळावर ओठ ठेवत किस केल. ए अवीक्...हे बघ मी दुपारी स्टुडिओ मधे बसल्या बसल्या काही जुन्या कॅसेट्स आणि होत्या विलायत खा साहेबांच्या...त्यांच्या डिजिटल फाइल्स केल्यात. जरा फिल्टरिंग केल, की मग झाल...मी पुढच्या महिन्यात फिल्म इन्स्टिट्यूट च्या स्टूडेंट्स ना डेमो देणार आहे...साउंड रेकॉर्डिंग मधला नवीन एक्सपेरिमेंट आहे...पाहु...!’ कबीर ने आपण फारच जास्त रिॅआक्टिव होतोय अस वाटून वातावरणातला तणाव कमी करण्याच्या आपल्या दृष्टीन प्रयत्न केला. पण अविकला ते विषयांतर वाटल.
' कबीर...’ अविका चा आवाज आता शुष्क झाला. अविकाला का कुणास ठाऊक , कबीर पटायचा नाही अलीकडे. कदाचित तिच्या पेक्षा तिच्यातल्या स्त्रीला तो पटायचा नाही.
'कबीर तुला आठवतय...पुर्वी तू आणि मी आपल नवीन लग्न झाल होत तेंव्हा, खाली बागेत जात असु संध्याकाळी बसायला. तेंव्हा, तिथे पाच सात महिन्याची छोटी छोटी बाळ यायची. दूडू दूडू खेळायला. तू ही त्यांच्या कडे पाहत बसायचास. म्हणायचास, अविका...आपल बाळ होईल तेंव्हा त्याला मी मस्त पैकी लहान पणा पासूनच त्याला माझी म्यूज़िक थेरपी करणार. अगदी एक दिवसाचा असल्या पासून. का? एक दिवसाचा का? माझ्या पोटात असल्या पासून. तू माझ्या पोटापाशी तुझा कीबोर्ड धरून तुझ्या कुठल्याश्या त्या वेस्टर्न क्लॅसिकल च्या ट्यून्स वाजवणार होतास. त्याला झोप आली की तू रेकॉर्ड केलेले सतारिचे वेग वेगळ्या स्केल चे ड्रोन चे मंद स्वर बारीक श्या आवाजात लावून मग त्याच्या शेजारी आपण दोघे झोपणार होतो. त्याच्या चेहर्या कडे पाहत....तो जेंव्हा माझ्या छातीला बिल्गेल भूक लागल्यावर दूध प्यायला...तेंव्हा आपण...!
"अवि बास कर....अवि..." दोन शब्द बोलता बोलता कबी रच्या घशाला कोरड पडली.
खोली भर एक प्रकारची विचित्र शांतता पसरली. अवि आणि कबीर यांच्या श्वासाशिवाय खोलीत काहीच ऐकू येईनासे झाले. स्वत: च्या अक्षाभोवती गर गर फिरणारा फॅन ही दोघांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागला. अविकाने , कबीरच्या छाती वर डोक ठेवल. तिच्या डोळ्यांमधून उतरलेला एक उष्ण थेंब घरंगळत त्याच्या छाती वर जाऊन पसरला. त्यालाही तो जाणवला.
तिच्या कानांना कबीर च्या स्पंदांनाची धडधड ऐकू येऊ लागली. थोडी वाढलेली. पहिल्या रात्री कबीर तिच्या जवळ आला, तेंव्हा ही अशीच धडधड कबीर च्या छातीत झालेली तिला आठवली. पण तो स्पर्श नवा, त्वचे वरचे रोम नवे, एकमेकांची फारशी सलगी नसताना..एकमेकांना आपली शरीर बहाल करण वेगळ...मुग्धता वेगळी, आनंद वेगळा...सुख वेगळ...! कुठलाही हेतू नसताना मिळालेल सुख. सहवास हाच आनंद. त्याला कुठला सोस नाही. अपेक्षा नाहीत त्या प्राणया कडून...एकमेकात विलीन होण्याच, निसर्गान दिलेल्या शरिरान निसर्गाच्या जवळ जाण्याच शरीर हे फक्त एक माध्यम.
आज तीच दोन शरीर. तीच दोन स्पंदन. पण उर्मि नाही...फक्त अपेक्षा उरलेल्या एकमेकां कडून - एकमेकांच्या शरिराकडून. कुणीतरी सांगीतलय म्हणून प्रणय करायचाय. सहजसुलभ नाही. कुणालातरी सांगण्यासाठी. त्यातून काहीतरी घडाव म्हणून. त्यात कुठलाही आवेग नाही. एखादी प्रक्रिया असावी तशी. एक अनोखा आनंद आता अवीकाच्या आणि कबीर च्या ट्रीटमेंटचा फक्त एक भाग झाला होता.
“ कबीर, माझी गरज समजून घे कबीर...! ” अविका च्या आवाजातली विषणणता खोलीभर पसरली. आविका चे आर्जवी स्वर, कबीरला सहन झाले नाहीत.
कबीरने आपल्या मनातला तिटकारा झटकला. पंख्याची गरगर फिरणारी सावली छतावर विक्शिप्तपणे भिरभिरत होती. ती दिवा विझवल्यावर तत्क्षणी बंद झाली. दोन अनावृत्त देह, एकमेकांना बीलगले. काही तरी आशा उरी ठेऊन. निरव्याज पणा कधीच संपलेला होता...!
चारूदत्त रामतीर्थकर
पुणे,१७एप्रिल२०१६