अमेरिका- सेंट लुईस (मिझोरी) मधील मायबोलीकर

Submitted by अल्केमिस्ट on 13 April, 2016 - 06:55

नमस्कार,

शैक्षणिक कामानिमित्त मी सेंट लुईस (मिझोरी) येथे स्थलांतर करणार आहे.
इथे वास्तव्यास असलेल्या मायबोलीकारांकडून माहिती (उदा. घर शोधणे, ई ) हवी होती.
कृपया आपल्यापैकी कोणी मायबोलीकर तिथे असल्यास मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर कोणी तिथे सध्या राहणारे मला माहित नाहीत.
पण इथे पहा http://www.stlmarathimandal.org/ . त्यांना काँटक्ट केल्यास माहिती मिळेल .
शैक्षणिक कामासाठी शुभेच्छा !

अरे वा !
मी मागे सेंट लुईस ला होतो. थोडीफार माहिती देऊ शकेन. संपर्कातून मेल करा..
ममं चांगलं आहे. लहान पण वेल कनेक्टेड. ते नक्कीच देतील माहिती.

अमेरिकेत ४ माणसाच्या कुटुंबाचा मासिक खर्च अंदाजे किती आहे अर्थात तिथल्या राहणीमानाप्रमाणे!
कृपया सुचवा

कुठे राहणार आहात त्यानुसार खर्चात खुप फरक पडेल त्यामुळे त्याप्रमाणे त्या गावातल्या ग्रुप वर टाका. किंवा अमेरिकेतील आयुष्य वर वेगळा धागा काढा म्हणजे सगळे प्रश्न एकदम विचारता येतील.

http://www.maayboli.com/node/3532

sneharajan | 28 December, 2016 - 12:05 नवीन
अमेरिकेत ४ माणसाच्या कुटुंबाचा मासिक खर्च अंदाजे किती आहे अर्थात तिथल्या राहणीमानाप्रमाणे!
कृपया सुचवा >>>>>>

हा तिथे राहाणार्‍या माझ्या मित्रा करवी ऐकिव अंदाज आहे..!! तिथे राहाणार्‍यानी योग्य बदल सुचवावा...

भाड्याचे घर (2bhk ) = ९०० ते ११००
विज = १५०
पाणी (येणारे आणि जाणरे ) = ५०
सेल फोन = ५०
इंटरनेट / केबल TV / घरचा फोन = १०० ते १५०
ग्रोसरी व घरखर्च = ५००

असा अंदाजे १९०० च्या आसपास येउ शकतो...

(
या मध्ये
- ऑफिस येणे जाने
- रेन्टर इन्शुरन्स
- कार इन्शुरन्स
पकडलेले नाही
)

तिथे म्हणजे सेण्ट लुईस का? इतर राज्यांत शहरात रेण्ट मधे सर्वात जास्त फरक पडतो. इतर खर्चात खूप नाही.

हो मेडिकल चा खर्च, मुलांच्या डे केअर चा खर्च हे मोठे आयट्म्स आहेत. रेन्ट ठिकाणाप्रमाणे बरेच बदलते उदा. आमच्या गावात ९०० ला नाही १८०० आसपास जाईल, काही इतर ठिकाणी २५०० असू शकतो. कम्युट चा खर्च ही कुठे जावे लागते त्यानुसार बराच बदलेल.

माझ्या माहिती प्रमाणे..

मेडीकल खर्च : हा खर्च हेल्थ इन्शुरन्स ने कव्हर होतो.. आणि हेल्थ इन्शुरन्स हा एम्प्लॉयर मार्फत दिला जातो.
मुलांची शाळा : हा खर्च नसतो.. कारण १ ते १२ पर्यन्त शाळा मोफत आहेत (खागजी सोडल्यास ज्या ५% आहेत)
डे केअर चा खर्च : House wife असाल तर हा खर्च नाही..

हेल्थ इन्शुरन्स ने १००% कव्हर होतोच असे नाही. जसा प्लॅन असेल त्याप्रमाणे आणि बरेच प्लॅन्स हे ८० % कव्हर आणि २०% तुम्ही स्वतः हे असतात.

शाळा मोफत असली तरी इतर खर्च होतात शाळेच्या बरोबर त्यामुळे ते गृहीत धरावेच लागतात.