आम्रखंड

Submitted by मृणाल साळवी on 10 April, 2016 - 08:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ग्रीक दही = १ किलो
आंब्याचा पल्प = ५०० ग्रॅम
पिठीसाखर = ४५० ग्रॅम
मिक्स ड्रायफ्रुट्स = १/४ वाटी किंवा आवडीनुसार
विलायची पावडर = १/२ चमचा
केशर = ४-५ काड्या
मिठ एक चिमटी

क्रमवार पाककृती: 

१. दही एका फडक्यात बांधुन रात्रभार टांगुन ठेवावे, त्यामुळे त्यातील सगळे पाणी निथळुन जाईल.
२. एका बाऊलमधे हे दही घेउन त्यात आंब्याचा पल्प टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

p1p1p1

३. ह्यात पिठीसाखर टाकुन परत एकत्र करावे. तुम्ही आवडेप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता.

p1

४. ह्यामधे मिक्स ड्रायफ्रुट्स, केशर, विलायची पावडर व एक चिमटी मिठ टाकुन एकत्र करावे.
५. सर्व निट मिक्स करुन बाउल १-२ तासासाठी फ्रिज मधे ठेवुन द्यावे.

p1

६. तुम्ही हे आम्रखंड पुरीसोबत किंवा नुसते serve करु शकता.

p1p1

वाढणी/प्रमाण: 
५-६
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय वापरलं शेवटी? म्हणजे देशी दहीच ना? आणि कुठल ब्रँड?

मला ते फाये वगैरे आवडयचं नाही/आवडत नाही. पीठ टाकल्यासारखं... नाहितर दूधाची भुकटी.... नुसती तोंडात फिरते. अगदीच नाईलाज म्हणून करायची आणि खायची सुद्धा पण ते आळस म्हणून...
घरच्याच दह्याला खरेच पर्याय नाही.

काय वापरलं शेवटी? म्हणजे देशी दहीच ना? आणि कुठल ब्रँड?>>>>>> हो देशी च दिप ब्रँड आणि एक मलई दही म्हणून मिळाले ते पण थोडे मिक्स केले.

मी साधं दही, सावर क्रीम व एक लेब्ने नावाचे केफिर दही मिळते ते तिन्ही एकत्र टांगून चक्का करते. खूप मस्त होते श्रीखंड!!

Pages