Submitted by मृणाल साळवी on 10 April, 2016 - 08:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
ग्रीक दही = १ किलो
आंब्याचा पल्प = ५०० ग्रॅम
पिठीसाखर = ४५० ग्रॅम
मिक्स ड्रायफ्रुट्स = १/४ वाटी किंवा आवडीनुसार
विलायची पावडर = १/२ चमचा
केशर = ४-५ काड्या
मिठ एक चिमटी
क्रमवार पाककृती:
१. दही एका फडक्यात बांधुन रात्रभार टांगुन ठेवावे, त्यामुळे त्यातील सगळे पाणी निथळुन जाईल.
२. एका बाऊलमधे हे दही घेउन त्यात आंब्याचा पल्प टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
३. ह्यात पिठीसाखर टाकुन परत एकत्र करावे. तुम्ही आवडेप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता.
४. ह्यामधे मिक्स ड्रायफ्रुट्स, केशर, विलायची पावडर व एक चिमटी मिठ टाकुन एकत्र करावे.
५. सर्व निट मिक्स करुन बाउल १-२ तासासाठी फ्रिज मधे ठेवुन द्यावे.
६. तुम्ही हे आम्रखंड पुरीसोबत किंवा नुसते serve करु शकता.
वाढणी/प्रमाण:
५-६
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो एकदम भारी! टम्म
फोटो एकदम भारी!
टम्म फुगलेल्या पुर्या पण भारीच!
ऐन वेळी दही आणुन त्याचे लगेच श्रीखंड होणार नाही. मी सुद्धा दही रात्रभर टांगुन ठेवले होते.>> १०-१५ मि टांगुन मग हाताने हलकासा दाब देत पाणी पिळून काढायचे.
व्हिएन्नाच्या फ्ली मार्केट मध्ये मी पण खूपदा भटकले आहे.
ऐन वेळी करायचं झाल्यास
ऐन वेळी करायचं झाल्यास बाजारात मिळणार्या दह्याला टांगून ठेवून केलं आम्रखंड तर कसं होईल? >> चांगलं होतं दक्षिणा. फक्त ते दही गाळण्यात टाकून फ्रिजमधे ठेवावं लागतं. बाहेर राहिलं तर दह्याला पिवळट झाक येते असं आपलं माझं निरीक्षण. मी अमूल दह्याचा प्रयोग केला होता, त्या दह्याला घरच्या दह्यापेक्षा कमी पाणी सुटतं त्यामुळे कमी वेळात चक्का होतो.
मी श्रीखंड केलं होतं, आम्रखंड नाही.
मला अगदी तेच विचारायचं होतं
मला अगदी तेच विचारायचं होतं की चक्का वगैरे घरी करत बसण्यापेक्षा बाहेरून विकतचं दही आणून त्याचं श्रीखंड होईल का( अगदी रात्रभर टांगून पण)
ऐन्वेळी म्हण्जे घरी चक्का करण्याला फाटा असं
अहो ताई मग चितळ्यांकडून
अहो ताई मग चितळ्यांकडून चक्काच आणा की..
दक्षिणा... आम्हाला इथे चक्का
दक्षिणा... आम्हाला इथे चक्का कुठे आलाय रेडिमेड मिळायला. सगळे स्वतः करायला लागते.
ग्रीक योगर्ट सॉलिड लागत. मस्त
ग्रीक योगर्ट सॉलिड लागत. मस्त क्रिमी असत. मृणाल, तुझे प्रयोग पाहुन थक्क व्हायला होतं.:स्मित: आम्रखंडाला मस्त तलम पोत आलाय. वरुन ड्रायफ्रुटस मस्त दिसतायत. पुर्या पण जबरी झाल्यात.
मन्जुडे प्रयोगशील असण्याचा
मन्जुडे प्रयोगशील असण्याचा प्रयत्न करते. चक्क्याचं श्रीखंड कोण पण करेल,
दह्याचं करू तो जाने
जबरदस्त फोटो आणि पा. कृ...
जबरदस्त फोटो आणि पा. कृ...
फोटो जबरी आहेत!
फोटो जबरी आहेत!
delicious photos...!!!
delicious photos...!!!
मला आम्रखंड या पद्धतीने
मला आम्रखंड या पद्धतीने करायचं आहे. तर १८-१९ लोकांसाठी किती आणू ग्रीक योगर्ट?
आधी वाटले होते की देसी दहीचा डबा आणून करावा पण गेल्या वेळी एकदा ट्राय केलं तर नुसतं दह्यात पल्प घालून खाल्यासारखं लागलं (टांगून ठेवले होते तरी रात्रभर)
तर आता हा ग्रीक चा प्रयोग करून पाहते. फक्त अंदाज सांगा प्लीज.
अंजली_१२, एकदा ग्रीक दही थोडे
अंजली_१२, एकदा ग्रीक दही थोडे आणून ट्राय करा प्लीज. आमच्याकडे ग्रीक दह्याच्या श्रीखंडाची चव अजिबात आवडली नव्हती कोणाला.
ओह हो का? बरं झालं कळले ते...
ओह हो का? बरं झालं कळले ते... साधारण कशी लागते टेस्ट ग्रीक योगर्ट ची? पावडरी असते जरा ऐकलंय पण वाटलं घट्ट दिसतंय फोटोत तर करून पहावं
मी मध्यंतरी कॅबटच्या ग्रीक
मी मध्यंतरी कॅबटच्या ग्रीक दह्याचं श्रीखंड केलं होतं. चव आवडली. किंचीत आंबटपणा चालला असता असं घरातल्या काहींचं म्हणणं होतं. मला एरवी ग्रीक योगर्ट खाववतही नाही.
(No subject)
फाये ग्रीक योगर्टचं बरेचदा
फाये ग्रीक योगर्टचं बरेचदा करतो. आणखी आंबट हवं असं वाटतं.
मला आम्रखंड या पद्धतीने
मला आम्रखंड या पद्धतीने करायचं आहे. तर १८-१९ लोकांसाठी किती आणू ग्रीक योगर्ट?
आधी वाटले होते की देसी दहीचा डबा आणून करावा पण गेल्या वेळी एकदा ट्राय केलं तर नुसतं दह्यात पल्प घालून खाल्यासारखं लागलं (टांगून ठेवले होते तरी रात्रभर)
तर आता हा ग्रीक चा प्रयोग करून पाहते. फक्त अंदाज सांगा प्लीज.>>
देसी दह्याचा चक्का करुन केलेलं ना ? मग चांगल व्हायला पाहिजे खरतरं. चक्का छान गुळगुळीत होईपर्यंत फेटलेला का? मी देसी दह्याचा किंवा घरी दही लावून चक्का करून घेते. फेटुन घेते. साखर घालून परत थोड फेटुन मग त्यात आंब्याचा पल्प (हापुसच . दुसरा कुठला नको. आणि तोही रत्ना/ देसाई बंधू) मिक्स करून . जर तरीही मिश्रण घट्ट वाटल तर दुध पळी भर घालून परत मिक्स करून केशर वगैरे फ्रीज मध्ये ठेवल कि छान होते. घरी लावलेल्या दह्याच अल्टिमेट होत श्रीखंड. वेळ पाहिजे थोडा खरं.
प्लेन (केशर पिस्ता घालून) करायच असेल तर २/३ पळ्या दुध घातलच पाहिजे. नाहीतर खुप घट्ट होत श्रीखंड आणि गिळत नाही.
ग्रीक योगर्ट जास्त पल्प घालून खाल्ल्यासारख लागत उलट अस मला वाटतं.
३२ आउंस चे ४ डबे तरी लागतील
३२ आउंस चे ४ डबे तरी लागतील माझ्या मते. मी चोबानी चं ग्रीक योगर्ट आणून केलं होतं एकदा ते फारसं आवडलं नव्हतं
देशी दहीचं चांगलं लागतं त्या मानाने
अरे क्या सायोबेन. ग्रीक
अरे क्या सायोबेन. ग्रीक योगर्टचा प्रोटिन सोर्स म्हणून फार मोठं योगदान आहे बुवा घराण्यात.
खरं तर ते ग्रीक योगर्ट आधीच टेक्शचर मध्ये अगदी श्रीखंडासारखच असतं. त्यात थोडी साखर टाकली की श्रीखंडासारखच लागतं.
फोटो भारी आहे बाकी!!!
फाये (fage) यांचं दही आणून
फाये (fage) यांचं दही आणून पहा. ते श्रीखंडाकरता चांगले लागते.
नानक चं दहि वापरून पहा.
नानक चं दहि वापरून पहा. त्याचाही चक्का आणि श्रीखंड झकास होतं p
मेधा, फा-ये (FAGE) टोटल चं
मेधा, फा-ये (FAGE) टोटल चं वापरुन बघ मस्त लागतं...
फाये (fage) यांचं दही आणून
फाये (fage) यांचं दही आणून पहा>>>>>>>>>>> ते छोट्या प्रमाणात ट्राय करायला आणेन नक्की नेक्स्ट टाईम...
धन्यवाद मंडळी, इथली चर्चा वाचून मी नानकच आणले देसी दही... टेस्टेड आणि प्रुव्हन दिसतेय तर म्हटले परत एकदा ट्राय करू... यावेळी जाळीदार पंचा आणला होता नवीन आयकिया चा त्यात बांधलेय...मागच्या वेळी जेंट्स रुमालात बांधल्यामुळे चांगले नसेल झाले असा माझा अंदाज... बघु आता रिझल्ट लागला की कळवेनच...:) आईने घरच्या हापूस आंब्याचा आटवलेला गोळा घालून आम्रखंड करेन त्यामुळे यावेळी तरी विकतचा पल्प नो नो.
पन्चा बेस्ट किवा चिझ क्लॉथ पण
पन्चा बेस्ट किवा चिझ क्लॉथ पण! आई घरी श्रिखन्ड करायची ते आठवल, चक्का बान्धायचा तिचा पन्चा ठरलेला असायचा त्याच्यात बान्धुन ताटाळाच्या एका टोकाला तो बान्धायचा त्याखाली एक भान्ड पाणी गोळा व्हायला ..त्यावेळी काही फ्रिज वैगरे नव्हता, आम्हीही गावापासुन लान्ब राहत असल्याने दहि पुलावर तेवढ्यासाठी कुठे जा अस व्हायच? मग छान गुळगुळित खन्डासाठी चक्का आणी साखर पुरणयन्त्रातुन काढले जायचे , त्यात वेलची पुड/जायफळ पुड (आत्या आली असेल तर जिलेबीचा रन्ग खालुन पिवळ केलेल, ) किवा सिझन असेल तर आमरस घालुन पातेल गार पाण्यात ठेवल जायच , नैदेद्य आरती झाले की पुरी -श्रीखन्ड खावुन जनता पन्ख्याखाली आडवी व्हायची!
हो गार पाण्यात पातेली ठेवणं
हो गार पाण्यात पातेली ठेवणं हाच आमच्याकडचा फ्रीज होता.
टी टॉवेल्स किंवा फ्लोअर सॅक
टी टॉवेल्स किंवा फ्लोअर सॅक टॉवेल्स म्हणुन पांढर्या रंगाचे कॉटनचे टॉवेल्स मिळतात. अगदी चीप असतात. पर्फेक्ट आहेत ते चक्क्याला.
ओव्हनच्या पुढे जो बार असतो (डबल अवन असेल तर अगदी उंच असतो) त्याला बांधून ठेवायच चक्क्याच गाठोड. आणि खाली पाणि गोळा करायला भांड असा सेट अप मस्त वर्क होतो. रात्रभरात छान चक्का तयार होतो.
बीटर ने अगदी कमी स्पीड वर बीट केल तर अगदी छान गुळगुळीत होतो चक्का.
मला नव्याने कळलेल्या युक्त्या
मला नव्याने कळलेल्या युक्त्या. दही फडक्यात बांधून गाठोडं सूपस्ट्रेनरमध्ये ठेवायचं. वर वजन ठेवायचं आणि हे सगळं मोठ्या खोलगट भांड्यात ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवायचं. दही आंबट न होता चक्का लवकर तयार होतो. जास्त मेहनतीची हौस असेल तर चक्का सूप स्ट्रेनरमधून गाळायचा. (पुरणयंत्राचा उपयोग फक्त बोटं चिमटवण्यासाठी)
त्यात साखर , आमरस , इ. घालून चांगलं ढवळायचं. आता मात्र स्ट्रेन करायचं.च .गुळगुळीत चकचकीत श्रीखंड तयार.
मी पण असच करते भरत.
मी पण असच करते भरत.
चक्का करताना मी दही कधी ही बाहेर ठेवत नाही. मुंबईच्या हवेमुळे चक्का फार आंबट होतो बाहेर टांगून ठेवलं तर असा माझा अनुभव .
हे मी केलेलं गोकुळच्या फुल क्रिम दुधाच वरच्या पद्धतीने चक्का करुन . चक्का घरी केलेलं श्रीखंड चवीला अप्रतिम लागत ह्यात शंकाच नाही.
मी ग्रीक योगर्ट वापरून नेहमी
मी ग्रीक योगर्ट वापरून नेहमी करते श्रीखंड . मस्त होतं एकदम चवीला.
हे काही दिवसांपूर्वी केलेलं केशर-पिस्ता-इलायची श्रीखंड.
मिक्स करायच्या आधीचा फोटो आहे.
चांगलं झालं होतं मंडळी
चांगलं झालं होतं मंडळी आम्रखंड
सगळ्या टीप्ससाठी धन्यवाद.... फोटो काढायचा रहिला मात्र 
Pages