प्रत्युष्या बॅनर्जीच्या आत्महत्याच्या चर्चेत एका ब्रेकअप झालेल्या सेलेब्रेटीची आत्महत्या असाही सुर आहे. पण ब्रेकअप हे फक्त एकच कारण नाहीये, अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. प्रत्युश्याकडे फक्त एक सेलेब्रेटी म्हणून न बघता आत्ताच्या तरूण पिढीची एक प्रतिनिधी म्हणून ही बघावे लागेल आपल्याला.
वयाच्या १८ व्या वर्षी बालिकावधू सारखी मालिका तिला मिळाली. एखादा सामान्य माणूस वयाच्या २२/२३ व्या वर्षी एका वर्षात मिळवेल एवढा पैसा एका महिन्यात तिला मिळत होता. वयाच्या २४ व्या वर्षी ब्रेकअप बरोबरच कर्ज वसूली करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप तिने केला होता. तो आरोप खरा खोटा ह्या वादात न पडता कर्जवसूली अधिकारी तिच्या घरी येतो ही गोष्ट खटकते मला.
आपल्या आयुष्याचे यशापयश हे आता करीअर मधल्या अचिव्हमेंट्स न राहता तिथून मिळाणारा पैसा , राहणीमान हे झालेय. ज्या गोष्टी साधन असायला हव्यात त्या आता साध्य झाल्यात. उदाहरणार्थ मोबाईल फोन हे संपर्कात राहयचे साधन न राहता तुम्ही किती कमविता याचा मापदंड झालाय. तुम्ही अॅपल 5S वापरत असाल तर तुम्हाला नंतरचा फोन 6S च लागतो. नाहीतर तुमचे तितके बरे नाही चाललेय असं तुम्हाला आणि इतरांनाही वाटायला लागते.
हेच प्रत्येक बाबतीत, तुम्ही वापरत असलेले कपडे, चप्पल, घड्याळ, गाडी एवढेच नव्हे तर तुम्ही राहत असलेल्या घराचा पत्ता. सगळे सगळे तुमचे अचिव्हमेंट म्हणून पाहिले जाते.
प्रत्युष्याच्या बाबतीत पण तिच्या अभिनयातील प्रगती वर किती बोलले गेले? आजच्या भागातील तिचा अभिनय लाजवाब होता वगैरे. ह्या मालिका 3/4 वर्षे चालतात आणि बंद होतात.
आपल्या मनोरंजनाची व्याख्या पण किती बदललेली आहे. आम्हाला फक्त हलकंफुलकं पहायचेय. शेजारच्या बैठकीत डोकावून पहाण्या पलीकडे आता आम्हाला मालिकेंमधल्या वेगवेगळ्या कुटुंबाच्या बेडरूममध्ये, किचनमध्ये काय चालते, हे आम्हाला पाहयचेय. बालिकावधू सोडल्यावर तिने Big Boss, काही रिअॅलिटी शोज केले. त्याचा आणि अभिनयाचा काय संबंध..? बालिकावधू सोडतानाची काही गणितं चुकली किंवा चॅनलच्या राजकारणात ती फसली असेल.
अश्या वेळी तुमची सपोर्ट सिस्टीम किती भक्कम आहे यावर तुम्ही यातून कसे बाहेर येता हे ठरते. तसे तर एका वर्षात चार चार ब्लॉकब्लास्टर देण्यार्या दिपीका पदुकोनला पण निराशेने ग्रासले होतेच की. पण ते तिने मान्य केले, खरं तर अश्या गोष्टी दुसर्यासमोर मान्य करण्याआधी स्वःताशी मान्य करणे जास्त अवघड असते.
अश्यावेळी व्यावसायिक मदत घेवून किंवा तिच्या वडिलांच्या खेळाडू असण्याचा.. अप्सडाऊनला सामोरे जाण्याचा अनुभव मुळे तिला यातून बाहेर यायला जमले असेल.
नाहीतर सर्वोच्च भागीदारीचा विक्रम करणार्या दोन खेळाडूमधील एक कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होतो आणि दुसरा मात्र वाटेत कुठेतरि हरवून जातो, असं का? सचिनच्या यशात त्याला कुटुंबाकडून मिळालेला सपोर्टही तेवढाच महत्वाचा वाटतो मला.
आपल्या मुलांना पण ह्या रस्त्यावरूनच प्रवास करायचा आहे. सचिनला लवकर समजले की खेळामुळे मिळणारे पुरस्कार, पैसा, जाहिराती, राहणीमान ही आपली मिळकत नसून खेळामधील विक्रम, तंदुरुस्ती, स्टॅमीना ह्या महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी ह्या याच्या पाठोपाठ आपोआप येणार आहेत.
कुटुंबाच्या भक्कम आधारा सोबतच व्यावसायीक मदत लागली तर घ्यायला काय हरकत आहे ?त्यात कमीपणा न मानता. आजकाल प्रत्येक बाबतीत व्यावसायीक मदत आपण घेतच असतो अगदी घरातले कार्यक्रम पण आपण इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांच्या हातात देतो. मग आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या स्वतः बाबतीत पण अशी गरज लागली तर ती नक्की घ्यावी. कृष्ण हा अर्जुनाचा personal counselors च होता नाही का...? ह्या स्पर्धात्मक जगात तरून जायला आपल्या प्रत्येकाला एका कृष्णाची गरज आहे एवढे खर!!!!!
साभार :- एका मित्राकडून प्राप्त संदेश
सेलेब्रेटीची आत्महत्या
Submitted by उडन खटोला on 6 April, 2016 - 03:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलेय ... पण यावर एकही
छान लिहिलेय ...
पण यावर एकही प्रतिसाद कसा नाही विचार करतोय.
<<<<<सचिनला लवकर समजले की खेळामुळे मिळणारे पुरस्कार, पैसा, जाहिराती, राहणीमान ही आपली मिळकत नसून खेळामधील विक्रम, तंदुरुस्ती, स्टॅमीना ह्या महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी ह्या याच्या पाठोपाठ आपोआप येणार आहेत.>>>>
हे पटले !
<<<<<<त्याला कुटुंबाकडून मिळालेला सपोर्टही तेवढाच महत्वाचा वाटतो मला.>>>>
हे देखील पटले.
कुटुंब, जवळचे लोकं जर तुमच्यापासून मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी यावरच डोळा ठेवून असले तर आणखी कठीण होऊन जाते.
प्रियांका चोप्राही
प्रियांका चोप्राही आत्महत्येच्या विचारांत होती अशीही बातमी वाचली नुकतीच.
मधुर भंडारकरने फॅशन वगैरे चित्रपट काढलेले ते सही सही होते म्हणजे..
सचिन आणि कांबळीचा विषय
सचिन आणि कांबळीचा विषय निघालाच आहे तर ... कांबळीची स्वताची चूक असो वा नसो, पण मला त्याच्याबद्दल बरेचदा अशक्य वाईट वाटते .. तो आयपीएलच्या जमान्यात असता तर वाह्यातपणा करूनही त्याने बरेच पैसे कमावले असते. आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचल्यावर त्याच्याजागी कोणालाही फ्रस्ट्रेशन सहज आले असते.
चान्गल लिहलय.
चान्गल लिहलय.
पटण्यासारखे लिहीले आहे. यांना
पटण्यासारखे लिहीले आहे. यांना असे काउन्सेलर्स मिळतात की नाही कोणास ठाउक?
लेख पटला.
लेख पटला.
चांगले लिहीलेय. अशा सर्वांनी
चांगले लिहीलेय.
अशा सर्वांनी मायबोलीवरच्या काही धागेखोरांकडून शिकण्यासारखे बरेच आहे. एखादा धाग्याने शंभरच्या आत मान टाकली तरी नव्या जोमाने नव्या धाग्याची जुळवाजुळव ते करत राहतात.
चांगले लिहिलेय. कृपया त्या
चांगले लिहिलेय. कृपया त्या मूळ लेखक मित्राचेही नाव द्या.
चांगले, विचार करायला लावणारे
चांगले, विचार करायला लावणारे लेखन आहे.
भ्रामक गोष्टींचा भुलभुलैय्यात अडकायला होते, मग तो निम्न स्तरावरील म्हणजे "गल्लीदादा/गुंड/सडकछाप " वगैरे स्वरुपातील असेल, वा उच्चवर्गिय रहाणीमानाचा असेल, आकर्षण वाटतेच, कित्येकदा त्यात यशही मिळते, पण ते क्षणभंगुर इतकेच नसुन पायारहित आहे हा "मध्यमवर्गीय/मध्यममार्गी" विचारच शेवटी तारुन नेतो..... असे माझे मत.
प्रत्युषाचेबाबतीत झाले ते फारच वाईट झाले. ते तसे का झाले, याची कारणमिमांसा करण्याची माझी कुवत नाही, मी तो प्रयत्न करीत नाहीये.
चंद्रपुरच्या जंगलात अरुंद,
चंद्रपुरच्या जंगलात अरुंद, कच्च्या रस्त्यावरून रात्रीं जात असताना एकदां आमच्या जीपच्या प्रकाशझोतांत अचानक एक कोल्हा आला. जवळजवळ एक-दोन किलोमीटर तो जीपच्या समोर प्रकाशझोतांत जीवाच्या आ़कांताने पळत होता पण एक छोटीशी उडी बाजूला घेवून त्या काळोखात गडप होण्याचं धाडस कांहीं त्याच्याने झालं नाहीं. आम्हालाच दया येवून , जीप थांबवून आम्ही लाईट बंद केले तेंव्हां तो कोल्हा निघून गेला.
सेलिब्रीटींच्या आत्महत्या व इतरांच्या आत्महत्या यांत बव्हंशीं हाच फरक असावा; संपत्तिच्या झगमागाटातून व प्रसिद्धीच्या प्रकाशझोतातून बाहेर फेकले जाण्याच्या भितीचं प्रचंड दडपण घेवूनच ते जगत असावेत. ही भिती व त्यातूनच उदभवलेलीं व्यसनं, कर्जबाजारीपणा , तडजोडी इत्यादींचा एकत्रित परिणाम आत्महत्येची प्रवृत्ति जोपासण्यात होत असावा. कौटुंबिक संस्कार व आधार हा त्यावर एक चांगला उपाय असला तरीही अनपेक्षित प्रमाणात मिळालेली संपत्ति व प्रसिद्धी मनाचा तोल संभाळून हाताळण्याची मानसिक तयारी सर्वांत महत्वाची असावी. त्याकरतां, सुरवातीसच योग्य सल्ला, तज्ञांची मदत मिळणं/घेणं हितावह. निदान सचिनसारख्यांचे आदर्श तरी सतत समोर ठेवणं अत्यावश्यकच.
खरे आहे.
खरे आहे.
चांगला लेख. पटला.
चांगला लेख. पटला.
खरं आहे. भाऊ >+१ अगदी!
खरं आहे.
भाऊ >+१ अगदी!
भाऊ, नेमके मांडलेत...
भाऊ, नेमके मांडलेत...
मंडळी अतिशय आभार अन
मंडळी
अतिशय आभार अन धन्यवाद
मला हे आर्टिकल मेसेज स्वरुपात आलेले होते . त्याच्या मूळ लेखिका चैत्राली मेणकर यां आहेत ,त्यांनी पोस्ट फेसबुकवर टाकली होती व ती गुगल प्लस / whatsapp /फेसबुक वरुण मग व्हायरल झाली
त्यांचे आभार्स
चैत्रालीने छानच लिहिला आहे
चैत्रालीने छानच लिहिला आहे लेख.
आणि भाऊंचं कोल्ह्याचं उदाहरण अगदी चपखल.
आजच FB वर एक mysterious deaths असा लेख वाचला. वेगवेगळ्या सेलेब्रेटिजनी केलेल्या आत्महत्यांवर होता. खरंच एवढा पैसा, प्रसिद्धी आणि सौदर्य असुन इतक्या टोकाच्या निराशेमधे कसे अडकत असतील. किंवा मग सगळंच मिळतं आहे म्हटल्यावर एखादी सुद्धा deficiency एवढा टोकाचा निर्णय घ्यायला लावत असेल?
मला विचारात पडायला झालं कारण यादीमधल्या बहुतेक सेलेब्रेटिज स्त्रिया होत्या, अतिशय सुंदर होत्या आणि बहुतेकांनी ब्रेक अप्स नंतर आत्महत्या केल्या होत्या. ज्या सेलेब्रिटीज अनेक हजारो/लाखो पुरुषांसाठी desirable आहेत त्यांनी एखाद्या पुरुषासाठी जीवनच संपवायचं? what an irony of life !
मनुष्याच मन किती
मनुष्याच मन किती गुन्तागुन्तिच रसायन आहे हे कळतय...भाऊ.. मस्त पोस्ट.
भाऊ प्रकाशझोताचे उदाहरण
भाऊ प्रकाशझोताचे उदाहरण छान.
या आत्महत्यांची आणि नैराश्य येण्याची अनेक कारणे असू शकतात.
वर चढताना जर तुम्ही शिडी लाथाडत वर गेलात तर खाली उतरायची वेळ येते तेव्हा दणकन जमिनीवर आदळण्याशिवाय पर्याय नसतो.
त्याचबरोबर लोक काय म्हणतील ही भिती प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात असते. जेव्हा जास्त लोकं ओळखू लागतात तेव्हा ही भितीही त्याच पटीत वाढू लागते.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/balika-vadhu-stars-fan-kil...
सेलिब्रीटींच्या आत्महत्या व
सेलिब्रीटींच्या आत्महत्या व त्यांच्या फॅन्सच्या आत्महत्या याची सर्वसाधारण कारणमीमांसा खूपच भिन्न असावी.
एक सर्व सामान्य समज आहे, की
एक सर्व सामान्य समज आहे, की पैसा, प्रसिद्धी आणि पॉवर आली की नैराश्य कशाला?
पण नैराश्य कोणालाही येवु शकते. अगदी लहान चार वर्षाच्या मुलाला सुद्धा नैराश्य असू शकते.
त्यासाठीच , तुमची वैचारीक वाढ कशी आहे? भावनिक / मानसिक क्षमता कशी विकसित झाली तुमच्या वाढत्या वयात. तुमच्या आई वडीला किम्वांवा जी काही उपलब्ध असलेल्या पालकांकडून मदत होती/ मार्गदर्शन होते का हे महत्वाचे.
ते लहान वयातच सुरु होणे चांगले. इथे आई वडीलांनी वारंवार मदत करावी असे नाही. काही काळानंतर मार्गदर्शक पेक्षा एक मैत्री करून मित्र असणे जरूरी आहे. हे खूपच पुस्तकी वाटेल. पण घरातील व्यक्ती जर तसा संवाद साधत असतील तर त्यांना कळू शकते. नाहितर जवळ राहून सुद्धा पालक दुरावले असतात संवाद हरवल्याने.
त्याच बरोबर लहानपणापासूनच पैशाचे वळण जरूरी आहे.
जरासे हरले तर काय त्यात म्हणून पुढे जाणे महत्वाचे हे कित्येक पालक करतात? आजकाल तर जीवघेणी स्पर्धा आहे जिथे तिथे.....
सगळे त्याच परीस्थितीचे पडसाद आहेत.
झंपी, अगदी बरोबर.. शाळेतल्या
झंपी, अगदी बरोबर..
शाळेतल्या स्पर्धेत लहान मुलांपेक्षा त्यांचे पालकच जास्त एक्साईट झालेले दिसतात आणि मुले एखाद्या कठपुतळीसारखी परफॉर्म करत असतात.