वाचन का करावे?

Submitted by निमिष_सोनार on 31 March, 2016 - 05:40

"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही"
"इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!"
"मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!"
"पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?"
"अरे! सगळे अनुभव नाही लागू होणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, लेखक हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या भावना आणि आयुष्याच्या अवस्था- उदाहरणार्थ - प्रेम, लोभ, मत्सर, सुख, दु:ख, तारुण्य, बालपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या माणसांच्या भावना शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या माणसांना लागू होणार नाहीत का? लेखक एलियन थोडेच असतो? माणूसच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि पुस्तकातून विचारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुचित विचारांतून बाहेर पडून नवनवीन विचार स्वीकारायला शिकतो! आपल्या विचार कक्षा रुंदावतात!
"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!"
"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"

- निमिष सोनार (एक पुस्तक प्रेमी आणि वाचन समर्थक!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं!