शक्यता उरते कुठे गमवायची ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 March, 2016 - 14:59

चूक झाली सोडचिठ्ठी दयायची
यातना परतून नाही यायची

अंतरावर राखल्यावरती तुला
शक्यता उरते कुठे गमवायची ?

व्हायचो अस्वस्थ दोघेही तसे
सर उन्हाला जस-जशी बिलगायची

एकदा ऐन्यात होती पाहिली
वेदना डोळ्यांमधे उमटायची

भेटलो होतो पुन्हा रस्त्यामधे
वेगळी होती दिशा चालायची

सांगताना सांगते ....आहे बरी !
रीत ही आहेच ना बोलायची ?

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>अंतरावर राखल्यावरती तुला
शक्यता उरते कुठे गमवायची ?

व्हायचो अस्वस्थ दोघेही तसे
सर उन्हाला जस-जशी बिलगायची <<<

वा वा