Submitted by विद्या भुतकर on 29 March, 2016 - 11:45
कित्येक वर्षात पहिल्यांदा सुलभाकाकू लेकाकडे एकट्या गेल्या. कधी वेळ पडली नाही आणि आली तरी नवऱ्याला घेतल्याशिवाय गेल्या नाहीत. नात आजारी आहे म्हणून कळल्यावर मात्र हातचं काम सोडून धावल्या. रोज पोरगा सून नोकरीला गेले की काकांना फोन लावायच्या. 'अहो, गोळ्या घेतल्या ना?', 'सखू येऊन गेली का पोळ्याला?', 'धोब्याला सांगा वेळेत इस्त्रीचे कपडे आणून द्यायला.' अशा अनेक सूचना द्यायच्या, जमेल तसं आठवून विचारायच्या, सावरून घ्यायच्या. काका आपले, 'हो, झालं', 'केलं', 'ठीक आहे', इतकंच उत्तर द्यायचे.
आज सकाळीही असाच फोन झाला. ठेवता ठेवता काका म्हणाले,"ए ऐकतेस का?", बोलू की नको या विचारात पुढे बोलले, " हैप्पी बर्थडे हां."
काकूनीही 'हां, हां, ठान्क्यू' म्हणत फोन ठेवला आणि लाजून तोंडाला पदर लावला.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं
मस्तं
(No subject)
(No subject)
छान
छान
(No subject)
आआआआआव्व्व्व्व्व्व्व्व!! शो
आआआआआव्व्व्व्व्व्व्व्व!! शो क्युट !
सर्वान्चे आभार एक प्रयोग
सर्वान्चे आभार एक प्रयोग म्हणून इतकी छोटी गोश्ट लिहिली.
विद्या.