माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)
मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?
दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.
तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.
हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.
सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.
बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.
शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?
असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!
बस्कू, बिग हग! वॉरियर तू
बस्कू, बिग हग!
वॉरियर तू आहेसच! सो प्राउड ऑफ यू.
बस्कू हॅटस ऑफ !
बस्कू हॅटस ऑफ !
अगं, काय सांगतेस, बस्के... हे
अगं, काय सांगतेस, बस्के... हे कधी डोक्यातही आलं नसतं... सलाम तुला!
सांगून टाकलंस ते बरं केलंस. आता पूर्वापार ओळखीच्या माबोकरांशी ऑटिझमबद्दल अधिक मोकळेपणाने बोलू शकशील.
तुझा लढवय्या बाणा असाच कायम राहू दे...
You are a warrior and we all
You are a warrior and we all are with you.>> १०१
मवॉ चं लिखाण कळकळीचं आहे. अशा आयडीमागे कोण आहे हे माहीत असण्याची गरज नाही.>> १०१
बस्के! काय लिहावं कळत
बस्के!
काय लिहावं कळत नाही.
तुला आणि कुटूंबाला खूप शुभेच्छा!
मदर वॉरियर नाव अगदी सार्थ आहे.
आम्ही नेहमी तुझ्या लढ्यात तुझ्याबरोबर आहोत.
एक बिग हग बस्कुला आणि नीलला
एक बिग हग बस्कुला आणि नीलला !
फार छान वाटलं तू हा निर्णय घेतलास ते पाहून.
आम्ही सगळे कायमच तुझ्या सोबत
आम्ही सगळे कायमच तुझ्या सोबत आहोत बस्के
मो़क्ळी झालीस बरे झाले, सगळे आपलेच आहेत. मला तुझा अभिमान वाटतो. ते सग्ळे लेख मी वाचत आलेली आहे, द्रवेळी प्रतिसाद दिला नसला तरी.
बस्कू, तुला आणि नीलला एक बिग
बस्कू, तुला आणि नीलला एक बिग हग
आणि तुला एक दंडवत पण. हे सगळं सगळं सांभाळून तू आंतर्जालावर इतकं काय उभं केलं आहेस, करत आहेस.
षतशा_/\_
षतशा_/\_
वरील सगळ्यांशी मनाच्या अगदी
वरील सगळ्यांशी मनाच्या अगदी खालच्या कप्प्यापासुन सहमत. देव तुमच्या कार्याला भरघोस यश देवो हीच प्रार्थना आणी शुभेच्छा !
बस्कू! तुला सलाम! कधी विचारही
बस्कू!
तुला सलाम!
कधी विचारही नसता केला, पण तू हे सांगून खूप बरं केलंस. मोकळं वाटलं असेल. आम्ही तुझ्या बरोबर आहोत. वरच्या सगळ्या पोस्ट्सना + १००!
मवॉ चे सगळे लेख वाचलेत.
मवॉ चे सगळे लेख वाचलेत. प्रत्येकवेळी प्रतिसाद दिला नसला तरी तुमच्या कार्यात यश यावे अशी प्रार्थना केली आहे.
तुम्हाला आणि तुमच्या पिलुला शुभेच्छा.
आयडीमागे कोण आहे हे माहीत असण्याची गरज नाही.>>> +१
बस्के! कधी कधी ओळख न देता
बस्के! कधी कधी ओळख न देता लिहिणे जास्त सोपे होते, तू त्या आयडीने लिहिलेस यात काहीही गैर नाही. तुला दोन आयडी बाळागल्याचा गिल्ट वाटत असेल तर मनातून काढून टाक! तुला राहवले नाही यावरून इट जस्ट शोज दॅट यू आर अ गूड पर्सन! तुला आणि नील ला खूप खूप शुभेच्छा !
"मदर वॉरिअर.." ~ आय.डी.च इतका
"मदर वॉरिअर.." ~ आय.डी.च इतका प्रभावी वाटला मला सर्वप्रथम मायबोलीच्या यादीत आलेला पाहिलावर की नंतर त्यातील तो ऑटिझमचा विलक्षण आणि सविस्तररित्या मांडलेला विषय....त्याची व्याप्ती आणि त्याद्वारे त्याच्याविरूद्ध लढा देणारी एक माता...ही रुपे इतकी भावली की मग मी मदर वॉरिअर यांचे लिखाण नेहमी वाचण्याच्या यादीत घेतले आणि खूप अभ्यासही करायला मिळाला त्यामुळे.
म्हणजेच आयडी अॅडिशनल आहे आणि तो का घेतला गेला ? याच्याही पेक्षा या मदर वॉरिअरने आपल्याला वाचनाचा कशाप्रकारे आनंद दिला, किती आणि कोणती माहिती दिली.. ही बाब महत्त्वाची.
मै ला +१११ अजिबात गिल्ट ठेवू
मै ला +१११
अजिबात गिल्ट ठेवू नकोस.
तुझ्यातली सकारात्मकता अशीच कायम राहो बस्के!
मैत्रेयी ची प्रतीक्रिया
मैत्रेयी ची प्रतीक्रिया आवडली. खूप प्रगल्भ वाटली. प्रत्येक वेळेस मदर वॉरीयरचा लेख आला. ऑटीझम ची माहिती आली की प्रतीक्रिया काय द्यावी ते कळायचेच नाही..कारण आधी काही माहित नव्हते.
पण एकच सान्गावेसे वाटतेय की ड्यु आय घेतल्याचा गिल्ट खरच मनातुन काढुन टाका. मायबोलीकर खरच प्रेमळ आहेत, समजून घेणारे आहेत. आय डी ड्यु असला तरी भूमिका आणी मन स्वच्छ आणी प्रामाणीक असणे महत्वाचे.
मनातुन हे गिल्ट काढुन टाका आणी पूर्वीसारख्याच मोकळ्या व्हा. तुम्हाला व तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा.
बस्के, खुप खुप आदर वाटतोय मला
बस्के, खुप खुप आदर वाटतोय मला तुझ्याबद्दल. मदर वॉरियर म्हणुन तुझं आयुष्य इतकं बिझी असतानाही तु इतर अॅक्टीव्हीटीज सुद्धा स्वतःला झोकुन देऊन करतेय्स.... खरंच सलाम तुला.
आयडीमागे कोण आहे हे माहीत
आयडीमागे कोण आहे हे माहीत असण्याची गरज नाही.
>>>> बस्केनं हे लिहिलंय ते आपल्याला कळवायला लिहिलेलं नाहीये. तिनं तिच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा पार पाडलाय आणि हे उघड करण्याची हिंमत दाखवली आहे.
(No subject)
बस्के आणि मदर वॉरीयर या दोन
बस्के आणि मदर वॉरीयर या दोन आयडीज ना मी वेगवेगळं ओळखत होते... मदर वॉरीयर म्हणून तू आधी स्वतःला सावरून आणि नंतर तुझ्यासारख्याच गोंधळलेल्या, धडपडणार्या, चुकत माकत शिकणार्या कित्येक मातांसाठी दिपस्तंभ उभा केला आहेस! आयडीज मध्ये किंचीत गोंधळ झाला तरी एक आई म्हणून तू खरंच ग्रेट आहेस, तुझ्या मुलासाठी आणि त्या समस्त चुकत माकत शिकणार्या मातांसाठी!! कधी कधी ओळख न देता लिहिणे जास्त सोपे होते, तू त्या आयडीने लिहिलेस यात काहीही गैर नाही. >> +१
मदर वॉरियरने लिहीलेले लेख हे खरंच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत, फक्त ऑटीझमग्रस्त मुलांच्या मातांसाठीच नव्हे तर समस्त मातांसाठी! तुझ्या संयमाला सलाम!! कुठल्याही आयडीने लिही, लिहीत राहा! तुला आणि तुझ्या पिल्लूला खूप खूप शुभेच्छा!!
बस्कु/मदर वॉरीयर / हूएव्हर यू
बस्कु/मदर वॉरीयर / हूएव्हर यू आर,
तू तर एक 'दीपस्तंभ'आहेस कैक जणांसाठी.
तुला एक कडक सॅल्युट आणि शुभेच्छा !
ओके मन्जूडी. तरीही माझ्या
ओके मन्जूडी. तरीही माझ्या प्रतीक्रियानी कोणी कळत-नकळत दुखावले गेले असेल तरी नक्कीच मनापासुन सॉरी म्हणतेय.
>>तू तर एक 'दीपस्तंभ'आहेस कैक
>>तू तर एक 'दीपस्तंभ'आहेस कैक जणांसाठी. >>+१
मन्जूडी, धन्यवाद तत्परतेने
मन्जूडी, धन्यवाद तत्परतेने लक्षात आणुन दिल्याबद्दल. मलाही स्वतःला काहीतरी खटकत होते, पण कळत नव्हते.
दोन्ही आयडीने तुझे लिखाण
दोन्ही आयडीने तुझे लिखाण वाचले आहे. दुसरा आयडी घेणे तेव्हा अपरिहार्य झाले असावे, आणि नंतरचा तुझा गोंधळही खरा. आता तू ते सॉर्ट आऊट करून इथे लिहिलेस, त्यासाठी अभिनंदन. तुझ्या आणि नीलच्या लढ्यासाठी सदैव शुभेच्छा आहेतच!
रश्मी, माझ्यासारखी हस आता
रश्मी, माझ्यासारखी हस आता सगळीकडे
मवॉ चे लिखान वाचले एकंदर आयडी
मवॉ चे लिखान वाचले एकंदर आयडी डू आहे याची कल्पना होतीच ! आता अशाच प्रकारचे लिखान तुमच्या कडून झाले तर माबोकर कितपत स्विकारतील . असो. छान निर्णय घेतला.
बस्कू, हॅट्स ऑफ! तुला आणि
बस्कू, हॅट्स ऑफ! तुला आणि नीलला खूप खूप शुभेच्छा! तू खरोखर वॉरीयर आहेस. आम्ही आहोत तुझ्या सोबत. जालावर 'मैत्रीण' च्या रुपात तू जे उभे केलेस त्याबद्दल तुझा खूप अभिमान आणि कौतुक वाटायचे. आता तुच मवॉ आहेस कळल्यावर वाटणारे कौतुक, अभिमान व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत! _/\_
तुला आणि कुटूंबाला खूप
तुला आणि कुटूंबाला खूप शुभेच्छा!
मदर वॉरियर नाव अगदी सार्थ आहे.
आम्ही नेहमी तुझ्या लढ्यात तुझ्याबरोबर आहोत. >>> सहमत, बस्के. ऑल द बेस्ट. आधी मला वाटले असे उघड करण्याची गरज नव्हती पण वरती तुझा खुलासा वाचून लक्षात आले.
ओके मन्जूडी.
ओके मन्जूडी.:फिदी:
Pages