Submitted by विद्या भुतकर on 23 March, 2016 - 18:55
प्रेम म्हणालं पावसाला,
गम्मत आहे, नाही ?
तुझा माझा तसा,
संबंध आहे का काही?
तू गरज, मी श्वास
तू दृश्य, मी भास
मी अचल तर तू प्रवाही
सांग बरं, साम्य आहे का काही?
प्रेमात पडल्यावर
तुझ्यात भिजल्यावर,
तुझ्या माझ्यावर,
लोकांनी, लिहिल्या कविता तरीही.
कधी असतोस मनात,
कधी असतोस डोळ्यांत,
कधी दाटून येतोस
तिची आठवण काढण्यात.
पाऊस म्हणाला, काय करणार?
आहेच मी पाण्यासारखा,
ज्या रंगात टाकशील
त्यात मिसळून जाणारा .
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>प्रेम म्हणालं
>>>प्रेम म्हणालं पावसाला,
गम्मत आहे, नाही ?
तुझा माझा तसा,
संबंध आहे का काही?
तू गरज, मी श्वास
तू दृश्य, मी भास
मी अचल तर तू प्रवाही
सांग बरं, साम्य आहे का काही?>>>ईथपर्यंत सुंदर झालिये...आवडली!
मस्त...
मस्त...