बार्ली + मिक्स मिलेट इडली

Submitted by राजसी on 22 March, 2016 - 07:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बार्ली - १ वाटी
मिक्स मिलेट(अ‍ॅमेझॉनवर मिळाले) -१ वाटी
उडीद डाळ -१ वाटी
मीठ - चवीनुसार
पातळ तूप - इडलीपात्राला लावायला

क्रमवार पाककृती: 

दुपारी बार्ली + उडीद डाळ भिजत घाला. मिक्स मिलेट वेगळे भिजवा.
रात्री बार्ली + उडीद दळून घ्या. मिक्स मिलेट थोडा वेळ मिक्सरमधून फिरवून घ्या.
सगळे एकत्र मिसळून + मीठ उबदार जागी ठेवा.
सकाळी नेहमीसारख्या इडल्या करा. सकाळी लगेच इडल्या करायच्या नसतील तर लगेच पीठ फ्रिजमध्ये ठेवा.
मी १० वाजता इडल्या केल्या तर जास्त आंबट वाटल्या.

१०मि. वेळ दळायचा + २० मि. वेळ वाफवायचा.

वाढणी/प्रमाण: 
३० इडल्या झाल्या माझ्या इडलीपात्राच्या मापाच्या.
माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users