>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पहिल्या भागाच्या शेवटी समजलेली साधीसोपी गोष्ट म्हणजे प्रेमात जो आमोरेसामोरे खुल्लमखुल्ला भिडतो तोच सरस ठरतो. लेटरमधून व्यक्त केलेले प्रेम तिला कळलेच नाही, किंवा फोनवरून व्यक्त केलेले तिच्यापर्यंत पोहोचलेच नाही, अश्या पळवाटांना ईथे तिलांजली मिळते. तसेच विश्वसनीय अनुभवी सुत्रांकडून मला मुलगी पटवायचे अजून एक सूत्र समजले होते ते असे, की मुलींनाही डेअरींग दाखवत थेट प्रपोज करणारी मुलेच आवडतात. ज्या मुलात प्रेम व्यक्त करायचीच हिंमत नाही तो प्रेम निभावणार काय. असे साधेसोपे गणित यामागे असते.
पण हे समजून उमजून फायदा काय. कारण जिच्यावर हा प्रयोग करायचा ती कुठेच आसपास सापडत नव्हती. नव्हे तब्बल चौदा महिने कोणीच सापडली नाही. याला चौदा महिन्यांचा वनवास म्हणा किंवा चौदा महिन्यांचा ऊपवास म्हणा. पण आठवीचे वर्ष कुठेही मन न गुंतता सरले. माझे आठवीचे प्रगतीपुस्तक याची साक्ष देऊ शकते. जेव्हा आपण नापास होतो तेव्हा आपले एक वर्ष फुकट गेले असे साधारणपणे म्हटले जाते. मला त्या वर्षी नेहमीपेक्षा उत्तम गुण मिळूनही ते वर्ष फुकट गेल्यासारखे वाटले. कारण त्या आठवीच्या गुणांना आज कोणी कोणी विचारणार नाहीये. पण तेच त्या वर्षात एखाददुसरे लफडे केले असते तर आज तुम्हाला आणि उद्या माझ्या नातवंडांना सांगायला काही किस्से माझ्याजवळ असते.
अर्थात यात माझ्या एकट्याचीही काही चुकी नव्हती. कारण सातवीपर्यंत मुले-मुली एकत्र असलेली आमची शाळा आठवीपासून अचानक मुलामुलींसाठी वेगळी झाली. वेगळे वर्गच नव्हे तर दोन वेगवेगळ्या ईमारतींमध्ये भरू लागली. पण तरीही, आदल्या वर्षी (आठवीला) पडलेल्या दुष्काळानंतर या वर्षी प्रेमसागराला भरती येणार आहे याची कल्पना मला नववीत प्रवेश करताना नव्हती. बॉईज स्कूल म्हटले की अपेक्षा तरी काय ठेवणार होतो. पण माझ्या आईवडीलांना माझ्या दहावीच्या वर्षाची चिंता नववीतच भेडसावू लागली आणि त्यांनी माझे आयुष्य पालटवणारा निर्णय घेतला. त्यांनी मला ‘नववीपासूनच दहावीची तयारी’ अशी नववी-दहावी कॉम्बो ऑफर असलेल्या क्लासमध्ये घातले. माझ्या सुदैवाने आमच्या शाळेतील कैक मुलींच्या आईवडीलांनीही अगदी हाच निर्णय घेतला. त्यामुळे ज्या मुली मधल्या सुट्टीत मैदानाच्या कुठल्यातरी कोपर्यात उभे राहत उसासे सोडत बघितल्या जायच्या, त्या आता माझ्याच क्लासमध्ये एखाद दुसरा बाक पुढे मागे बसलेल्या दिसणार होत्या.
भिन्नलिंगी आकर्षणाला हायड्रॉलिक्सचे नियम लागू होतात. जसे वाहत्या पाण्याला तुम्ही बांध घातला तरी ते आपला रस्ता कुठूनतरी शोधतेच आणि तो रस्ता छोटासाच असला तर तिथून दुप्पट वेगाने उसळी घेते. त्याचप्रमाणे आमच्यातील ज्या वाढत्या प्रेमभावनेला शाळेने बांध घातला होता, ती आता शाळा सुटल्यानंतर क्लासला तासाभराच्या वेळेत, दुप्पट वेगाने उफाळून यायची.
पहिल्याच दिवशी मी ‘माझीवाली’ निवडली. जास्त विचार करायला वेळच नव्हता. त्या वयात यारीदोस्तीचेही काही उसूल असायचे. एकाने अमुकतमुक मुलगी आपल्याला आवडल्याचे डिक्लेअर करताच ईतरांनी तिथे नंबर न लावता त्याला मदत करायची. जो तसे करणार नाही तो गद्दार, दोस्ती तुटली.
तर क्लासमधील सर्वात सुंदर मुलगी मी निवडली होती. अर्थात ईतरांनाही ती पहिल्याच फटक्यात आवडली असावी. पण तिच्या डोळे दिपवणार्या सौंदर्यापुढे ते बिचारे ईतके वरमून गेले असावे की ही मुलगी मला आवडलीय आणि मी इथे ट्राय मारणार आहे हे कोणत्या तोंडाने सांगावे, आपले हसे तर होणार नाही ना अशी भिती त्यांना वाटली असावी.
दुसर्याच दिवशी मी अनोख्या पद्धतीने माझा क्लेम जगजाहीर केला. क्लास भरायच्या आधी ती ज्या बाकावर बसली होती, एकटीच, सरळ तिथेच तिच्या बाजूला जाऊन बसलो. मुले मुली वेगवेगळ्या बाकांवर बसतात असा क्लासचा अलिखित नियम आहे हे माहीत असूनही बिनधास्त बसलो.
क्लास भरला. क्लास चालू झाला. क्लास सुटला. पण वर उल्लेखलेला नियम अलिखितच असल्याने ना ती तिथून उठली, ना कोणी मला तिथून उठवले. मात्र तो क्लास संपताच मी तिच्या प्रेमात पडलो आहे, तिच्याशीच लग्न करणार आहे (अर्थात, २१ वर्षे पुर्ण झाल्यावर), आणि तिला पटवण्यासाठी मी काहीही करू शकतो हे मी मित्रांमध्ये घोषित करून टाकले. आता कोणीही आपला हात वर करायचा प्रश्नच उद्भवत नव्हता, कोणाला जरी ती आवडलीही असावी तरी ती वेळ आता निघून गेली होती. आता माझ्या मित्रांची सारी कायनात आम्हा दोघांचे कसे जुळेल याचाच प्रयत्न करणार होती.
मला तिच्या नावावरून चिडवण्यापासून जी सुरुवात झाली, ते आमच्या नावांची आद्याक्षरे धूळ बसलेल्या गाडीच्या काचांवर लिहिण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पुढे "रिशी तिरका बाण कली" पर्यंत प्रगती झाली. कली हे तिचे तिच्या आईबाबांनी नाही, तर माझ्या मित्रांनी ठेवलेले नाव होते. त्यामुळे ती ज्या गलीतून जायची तिथे तिला ‘रिशी-कली’ हे नाव लिहिलेले दिसायचे, पण हे दोघे नक्की कोण आहेत याची तिला खबर नसायची. वेळ येताच ते मी तिला स्वत: सांगणार होतो.
ती वर्गात शिरताच चार चार जणांनी एकसाथ मला हाक मारणे, तिला सरांनी काही विचारल्यास क्लासमधील निम्म्या डोळ्यांनी माझ्याकडे बघून हसणे, ती रस्त्यात दिसताच मी सोडून आमचा अखंड ग्रूप अचानक खिदळायला लागणे, आणि तोपर्यंत खिदळत असलेलो मी अचानक लाजराबुजरा होत शांत होणे. ईत्यादी व्यवच्छेदक लक्षणांवरून ती जे काही समजायचे ते महिन्याभरातच समजून गेली होती. अजून एक महिना थांबून मी तिला विचारायचे ठरवले. नाहीतर पुढे परीक्षा जवळ आल्या तर उगाच तिच्या आयुष्याचे ध्येय काही काळासाठी बदलायचे आणि वाट पहा, पहातच रहा, असे उत्तर मला मिळायचे.
रविवारची सुट्टी. एक्स्ट्रा क्लास. स्पेशल लेक्चर. स्पेशल कामासाठी मी स्पेशल दिवसच पकडला. कारण आज शाळा सुटल्यावर शाळेच्या गणवेषातच क्लासला भरती व्हायची गरज नव्हती. घरून छानछौके कपडे घालून, सजून धजून, एकटाच नाही तर मित्रांची वरात घेऊन मी तयार होतो. नर्वस तर होतोच, पण जीन्स आणि टीशर्ट घातले की मला खूप भारी फिलिंग यायचे, ते तसे आलेही होते. आणि अहो आश्चर्यम, तिला सुद्धा जीन्स टी-शर्ट पहिल्यांदाच घातलेले बघून मी हा देवाचाच संकेत समजलो. माझ्यापेक्षा तब्बल तेरा ते चौदा पटींनी ती सुंदर दिसत होती. मी केव्हाच स्वप्नात पोहोचलो होतो. क्लास सुटल्यावर मित्रांचा शिवाजी पार्कात फिरायला जायचा प्लान होता. मी मनोमन तिच्यासोबत दादर चौपाटीचा प्लान बनवून टाकला. तो भेळेचा वास, तो लाटांचा आवाज, तो वाळूचा स्पर्श.. (अॅडल्ट मोड ऑन - तिच्या केसांचा गंध, ओठांची चव..) हे सारे सारे मी क्लास मध्ये बसल्या बसल्या कल्पनेने अनुभवत होतो.
क्लास सुटला. मित्रमैत्रीणींचा घोळका जमला. थोडावेळ रमला. आणि घरी जाण्यासाठी पांगापांग झाली. नेहमीसारखेच ती तिच्या मैत्रीणीसोबत घरी जाण्यास निघाली. मोजकेच चार मित्र घेऊन मी तिच्या पाठीपाठी निघालो. बरोबर ठरलेल्या जागी चालण्याचा वेग वाढवत तिला गाठले. तिच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि तिच्या मैत्रीणीला म्हणालो, "मला जरा हिच्याशी बोलायचे आहे.."
माझीवाली जागीच थबकली आणि मैत्रीण तशीच सरळ चालत निघून गेली. काय पण दहशत होती माझी. इथेच हुरूप वाढला. पण ... पण पुढचे एवढेही सोपे नव्हते.
पहिल्यांदा तिच्याकडे बघताना माझी छाती धडधडत होती. पहिल्यांदा तिच्या नजरेला नजर मिळवताना एका डोळ्याची पापणी अलगद लवत होती. प्रत्येक आवंढ्यागणिक घसा कोरडा होत होता. जेव्हा तळहातांनाही पाणी सुटायला लागले, तेव्हा एका भयाण शांततेनंतर माझ्यातील रिशी पकूर जागा झाला ..
अॅण्ड येस्स.. दोज फोर गोल्डन वर्डस !! अखेर माझ्या तोंडातून बाहेर पडले,
.
.
.
.
.
.
मला लाईन देशील का?
....
............................
मग काय. अशी मिळते होय. खेळ खल्लास!
पुढे रीतसर माझी तक्रार झाली. तिने स्वत:च केली. त्या तक्रारी दरम्यान तिचे वडील पोलिसखात्यात आहे हे मलाच नाही तर आम्हा सर्वांना समजले. सरांनी सुका खाऊ देतात तसा मला सुका दम दिला. प्रकरण माझ्या घरापर्यंत न जाता एवढ्यावरच संपले हे आवडले मला. त्याहून जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तिचे वडील मुंबई पोलिस असल्याने माझा पत्ता कट झाल्यानंतर आता ईतर कोणीही तिच्या मागे लागणार नव्हते. त्याने माझा अहंकार शाबूत राहणार होता. तसेच या सर्वाचा साईडईफेक्ट असा झाला की पोलिसाच्या मुलीला भिडला म्हणजे काय, या ऋनम्याला मानला पाहिजे अशी माझी डॅशिंग इमेज तयार झाली. आणि हे सगळ्यात बेस्ट झाले. कारण,
... कारण पुढच्या प्रपोजच्यावेळी माझी हिच इमेज माझ्या कामाला आली
क्रमश:
ऋन्मेष:
माझे सव्वीस प्रपोज ! (मुलामुलींची नावे बदलून)
भारी आहे! आणि ते लिहिलं आहेस
भारी आहे!

आणि ते लिहिलं आहेस ना की एकाने एखादी निवडली की बाकीच्यानी तिचा विचार सोडून द्यायचा असं आमच्यात पण असायचं.
पुढचा भाग टाक लवकर.
मस्त आहे.... पुढच येउ द्या
मस्त आहे.... पुढच येउ द्या लवकर.
मस्तं
मस्तं लिहीलंय.
आवडलं.
लहानपणीच्या मज्जा मज्जा आठवल्या.
दहावीपर्यंतची 'लाईन' खरोखरची बायको होण्याचं प्रमाण किती याचा सर्वे केला पाहिजे एकदा!

मस्तं लिहीलंय. मि पन एकदा
मस्तं लिहीलंय.
मि पन एकदा माझ्या मीत्रां सोबत असा पराक्रम केला आहे. जुने दिवस आठवले.
पुढच येउ द्या लवकर.
>> ती वर्गात शिरताच चार चार
>> ती वर्गात शिरताच चार चार जणांनी एकसाथ मला हाक मारणे, तिला सरांनी काही विचारल्यास क्लासमधील निम्म्या डोळ्यांनी माझ्याकडे बघून हसणे, ती रस्त्यात दिसताच मी सोडून आमचा अखंड ग्रूप अचानक खिदळायला लागणे, << अगदी अगदी

आम्ही पण केलेत हे प्रकार मित्रांना चिडवायला
मला लाईन देशील का? अरारारा
मला लाईन देशील का?
अरारारा ऋन्म्या अशक्य हसतेय मी. अस विचारत असतात
आणि काय रे, हे रिशी पकुर तेव्हापासुन का? उगा फकाल्या नको मारु..
छान लिहिलयंस. खुप आठवणी
छान लिहिलयंस.
खुप आठवणी आल्या.
आमोरेसामोरे>>>???
टीना तु तं लयच सीरीयसली घेउन
टीना तु तं लयच सीरीयसली घेउन राह्यली त्याला
सही है ये भी. आन्दो और
सही है ये भी.
आन्दो और
टीना, रिशी पकूर हे नाव असेच
टीना,
रिशी पकूर हे नाव असेच लिहिलेय. पण त्यामागच्या भावना आणि एकंदरीतच किस्सा लाईन देशील का या वन लाईनर प्रपोजसह खरा आहे. मित्रांमध्ये हा बकवास प्रपोज आणि ही लाईन खूप फेमस झालेली, मला खूप चिडवायचे यावरून.. माझे कन्सेप्ट तेव्हा खूप वेगळे होते. आय लव्ह यू वगैरे मला खूप फिल्मी वाटायचे आणि मी जो प्रपोज केलेला त्यात आपलेपणा आहे असे वाटलेले.
आणि अहो आश्चर्यम, तिला सुद्धा
आणि अहो आश्चर्यम, तिला सुद्धा जीन्स टी-शर्ट पहिल्यांदाच घातलेले बघून मी हा देवाचाच संकेत समजलो. माझ्यापेक्षा तब्बल तेरा ते चौदा पटींनी ती सुंदर दिसत होती.
हे कसं मोजलं, की आपलं हे पण तसचं अँ.............................
तेरा ते चौदा पटींनी>>> खरंच
तेरा ते चौदा पटींनी>>>
खरंच कसं मोजलं?
फेअर एण्ड लवलीच्या स्केलवर
फेअर एण्ड लवलीच्या स्केलवर
ऋन्मेऽऽष तुम्ही एक अफ़लातुन
ऋन्मेऽऽष तुम्ही एक अफ़लातुन लेखक आहत..... Hats off to you...
..... इतकी हसले कि office मधले सगळे मज़ा कडे पाहत आहेत .... 
मला लाईन देशील का?
लय भारी! ॠन्मा...तुला भावना
लय भारी! ॠन्मा...तुला भावना शब्दात मस्त मांडता येतात...
अवांतर..तू राजा शिवाजी आणि जी डी रेगेज ला जायचा का?
सारेगमप धन्यवाद, राजूजी,
सारेगमप धन्यवाद,
राजूजी, दोघांपैकी एक बरोबर एक चूक
निखळ मनोरंजन आणि वाचणार्यांना
निखळ मनोरंजन आणि वाचणार्यांना आपल्या पूर्वायुष्याची सफर घडवण्याचे कसब हे तुझ्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे लिहित राहा. शुभेच्छा !!!
असे प्रतिसाद देऊ नका
असे प्रतिसाद देऊ नका मित्रांनो मला इमोशनल कराल
धन्यवाद
मला लाईन देशील का? >>>>.
मला लाईन देशील का? >>>>. सीरीयसली.. असच विचारतात मुल . डायरेक्ट लाईन ???
पण आवडला हा किस्सा..
नववीत होतो हो.. आणि
नववीत होतो हो.. आणि प्रपोजच्या बाबतीत दुसरीतच होतो. अनुभवाने सुधारत गेलो.
मला लाईन देशील का? >>>>
मला लाईन देशील का? >>>> हाहाहा
अशक्य हसतेय मी..
कब आयेगा रे अगला भाग इसका....
कब आयेगा रे अगला भाग इसका....
)
('कब खून खौलेगा रे तेरा...' च्या धरतीवर वाचावे
माझा एक मित्र पण अकरावीत
माझा एक मित्र पण अकरावीत असताना एकीला असाच भिडला होता. त्याने "लव्हशिप देशील का?" असं विचारलं होता. तिने नाही म्हणल्यावर "मग निदान फ्रेंडशिप तरी... " अशी तडजोड करायला तयार झाला. बेक्कार हसलो होतो आम्ही सगळे

अरे गणपतीत कसले माझे प्रपोजचे
अरे गणपतीत कसले माझे प्रपोजचे लेख वर काढताहेत....
तिथे मी कोविड लेखन स्पर्धेत पोरांवर लेख लिहून माझी ईमेज सुधारायच्या प्रयत्नात आहे आणि तुम्ही ईकडे माझ्या अतीतमधून कांड बाहेर काढत आहात
तुम्ही ईकडे माझ्या अतीतमधून
तुम्ही ईकडे माझ्या अतीतमधून कांड बाहेर काढत आहात Proud>>>>>>
खरंतर मला तुमचे आधीचे लेख
खरंतर मला तुमचे आधीचे लेख वाचायचे होते,मी विचारणारच होते.
मी ओरकूट भेट आणि परी जन्मा वेळेस चा वाचले आहेत. छान आहेत दोन्ही.
मला कुठे मिळतील लेख?