Submitted by बेफ़िकीर on 17 March, 2016 - 12:54
सारे काही अज्ञातात विखुरले आहे
एक रिकामेपण हाताशी उरले आहे
अगम्य माझी मनस्थिती ही पाहिलीस का?
तुझा विषय नसलेले काही स्फुरले आहे
तितक्यावर तर हजार गालिब झाले असते
तुझ्या नि माझ्यामध्ये जितके उरले आहे
डोळ्यांमध्ये काही केल्या येईना ते
कुठेतरी खात्रीने पाणी मुरले आहे
आठवले तर ठीक, न आठवले तर उत्तम
कोणासाठी युगे युगे मन झुरले आहे
ओठ म्हणाले होते 'आता सर्व थांबवू'
डोळे सांगत होते 'मी आतुरले आहे'
ऐकवायला बसलो तर संपेल जन्म हा
मनात जे मी खूप खोलवर पुरले आहे
फार दिवस 'बेफिकीर' होणे जमले नाही
नवीन काहीतरी इथे अंकुरले आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह वा ! एक एक शेर लाजवाब
वाह वा ! एक एक शेर लाजवाब !
धन्यवाद !
तितक्यावर तर हजार गालिब झाले
तितक्यावर तर हजार गालिब झाले असते
तुझ्या नि माझ्यामध्ये जितके उरले आहे>>>व्वा व्वा
अप्रतिम!
बाकी सर्वच शेर एकापेक्षा एक सरस ,,,,!
गजल आवडली.
वाह वाह..... जबरदस्त आहे
वाह वाह..... जबरदस्त आहे पुर्ण रचना....आवडली
गझल आवडली !
गझल आवडली !
व्वा सुंदर गझल पहिले तीन शेर
व्वा
सुंदर गझल
पहिले तीन शेर खास
हजार गालिब खासच!!
हजार गालिब खासच!!
ऐकवायला बसलो तर संपेल जन्म
ऐकवायला बसलो तर संपेल जन्म हा
मनात जे मी खूप खोलवर पुरले आहे
फार दिवस 'बेफिकीर' होणे जमले नाही
नवीन काहीतरी इथे अंकुरले आहे
खुप सुंदर..
गालीब
गालीब



छान आहे गजल.
छान आहे गजल.
मस्त!!
मस्त!!
Bahot badhiya...
Bahot badhiya...
मस्त गझल !
मस्त गझल !
>>>अगम्य माझी मनस्थिती ही
>>>अगम्य माझी मनस्थिती ही पाहिलीस का?तुझा विषय नसलेले काही स्फुरले आहे>>>क्या बात है!
>>>डोळ्यांमध्ये काही केल्या येईना ते
कुठेतरी खात्रीने पाणी मुरले आहे>>>वाह् व्वा!
>>>आठवले तर ठीक, न आठवले तर उत्तम
कोणासाठी युगे युगे मन झुरले आहे>>>मस्त,बढिया!
हजार गालिब आणि मक्ताही खासंच!
'ऐकवायला बसलो तर...' हा जरा विधानात्मक झाल्यासारखा वाटला मला!(तीट)
धन्यवाद!
(अवांतर—वाट पहायला लावलीत ब्वा नविन गझलेसाठी!)
<<नवीन काहीतरी इथे अंकुरले
<<नवीन काहीतरी इथे अंकुरले आहे>>
----- छान.
पूर्ण गझल आवडली.
_/\_
_/\_
_/\_ वाट पहायला लावलीत ब्वा
_/\_
वाट पहायला लावलीत ब्वा नविन गझलेसाठी!<<< +१
कडक!! आयुष्याचा वास खमंग आला
कडक!!
आयुष्याचा वास खमंग आला आता
दु:ख जरासे ह्रदयावर भुरभुरले आहे
खूप आवडली.
दर्जा एकदम
दर्जा एकदम
डोळ्यांमध्ये काही केल्या
डोळ्यांमध्ये काही केल्या येईना ते
कुठेतरी खात्रीने पाणी मुरले आहे
अप्रतीम....